गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी आणि डीजेवरील बंदी कायम - मुंबई उच्च न्यायालय

गणेश विसर्जन सोहळ्यादरम्यान डॉल्बी आणि डीजेवरील बंदी मुंबई उच्च न्यायालयानं कायम ठेवली आहे.

गणेश विसर्जन सोहळ्यात डीजेवरील बंदी उठवावी अशी याचिका 'पाला' या संघटनेनं केली होती.

मुंबई हायकोर्टानं ती फेटाळली आहे. एएनआयनं यासंबंधी ट्वीट केलं आहे.

ध्वनी प्रदूषणाच्या मुद्यावर परवानगी देण्यास राज्य सरकारनं यापूर्वीच डीजेवरील बंदी उठवण्यास नकार दिला होता.

येत्या 4 आठवड्यात त्यावर सखोल सुनावणी होणार आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)