पोटनिवडणूक निकाल : उद्धव म्हणतात 'स्वबळावर' तर फडणवीस म्हणतात 'सेनेसह लढू'

फोटो स्रोत, @shivsena, @CMOmaharashtra
सोमवारी पार पडलेल्या पालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकांचे निकाल आता लागले आहेत.
पालघरमध्ये सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेमध्ये लढत होती, तर भंडाऱ्यात राष्ट्रवादी आणि भाजप एकमेकांसमोर ठाकले होते. पालघरमध्ये भाजपचा विजय झाला आहे.
महाराष्ट्रातल्या पालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकाचे निकाल लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची पत्रकार परिषद होत आहे.
शिवाय, उत्तर प्रदेशच्या कैराना आणि नागालँडमध्ये लोकसभेच्या जागांसाठी लढत होत असून, देशभरातल्या इतर 10 विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकांचाही निकाल आज लागले आहेत.
उत्तर प्रदेशच्या कैराना मतदारसंघात भाजपच्या उमेदवार पिछाडीवर असून राष्ट्रीय लोकदलाच्या उमेदवार आघाडीवर आहेत.
मतदान यंत्रामध्ये बिघाड झाल्याने काही ठिकाणी बुधवारी फेरमतदान घेण्यात आलं होतं. तेही निकाल आज लागणार आहेत.
भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे पालघरची जागा रिकामी झाली होती, तर भाजपला सोडचिठ्ठी देत नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुका झाल्या.
दिवसभर अशाप्रकारे झाल्या घडामोडी
सायंकाळी 6.40 - 'EVM बिघाडाचा सगळ्यात मोठा फटका भाजपला'
EVM बिघाडाचा सगळ्यात मोठा फटका भाजपाला बसला अशी तक्रार पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

फोटो स्रोत, BBC/PrashantNanaware
मुख्यमंत्री म्हणाले -
- पालघरमध्ये निवडणुकीच्या काळात निर्माण झालेला कडवटपणा आमच्याकडून संपला आहे.
- सरकारमध्ये असलेल्या दोन पक्षांनी अशा पद्धतीनं निवडणुका लढवाव्यात का यावर विचार करण्याची गरज आहे.
- भंडारा-गोंदियामध्ये दुष्काळाचा फटका बसला. पुढील निवडणूक भाजपच जिंकेल.
- EVM मधील बिघाडाची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घ्यायला हवी. मतदारांना मतदानाचा हक्क मिळायलाच हवा.
- EVM मधील बिघाड हा भाजपवरील नाही निवडणूक आयोगावरील आहे. त्याचं उत्तर निवडणूक आयोगाला द्यायचं आहे.
- लोकशाहीमध्ये विरोधात मतं न पडता कोणीच निवडून येत नाही.
- भाजपने युतीला कधीच नकार दिला नाही. आम्हीच नेहमी पुढाकार घेतला.
- बाळासाहेबांना आम्ही युतीचा शिल्पकार मानतो.
- भाजप-शिवसेनेच्या विचारधारेमध्ये समानता आहे. त्यामुळे आम्ही एकत्र लढलं पाहिजे असं आम्हाला वाटतं.
सायंकाळी 5.05 - उद्धव ठाकरे यांची भाजपवर चौफेर टीका
उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद शिवसेनाभवनात झाली.
त्यात, भाजपला आता मित्रांची गरज नाही. शिवरायांचा अपमान योगींनी केला. त्याबद्दल भाजपनं खुलासा केलेला नाही, असं ठाकरे म्हणाले.
निवडणूक आयोगाच्या भू्मिकेबद्दल ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

हा मी पराभव मानत नाही, असंही ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद लाइव्ह येथे पाहता येईल.
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त
दुपारी 4.40 - समविचारी पक्षांना कौल मिळाला - अजित पवार
"भंडारा-गोंदियामध्ये आघाडीसाठी सगळं जुळून आलं. नाना पटोले स्वत: उमेदवार असल्यासारखे लढले. समविचारी पक्षांनी मतविभागणी होणार नाही हे पाहिलं पाहिजे. पालघरमध्ये मात्र काँग्रेसचे कार्यकर्ते असलेले राजेंद्र गावित हे अगदी कालपर्यंत पक्षात होते. त्यांना भाजपमध्ये घेऊन उमेदवारी देण्यात आली. आघाडीचा उमेदवार पहिल्यापासून मागे पडला होता. " असं अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

फोटो स्रोत, Facebook
दुपारी 4.10 - उध्दव ठाकरे यांची पत्रकार परिषद
पालघरच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यात ते काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.
दुपारी 4.00 - 'पुढे जाण्यासाठी दोन पावलं मागे यावं लागतं'
पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवावर प्रतिक्रिया देताना गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, "मोठी झेप घेण्यासाठी दोन पावलं मागे यावं लागतं. आम्ही भविष्यात मोठी झेप घेऊ."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
दुपारी 3.00 - पालघरमध्ये भाजप विजयी
भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांना पालघर मतदार संघात विजय मिळवला आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
दुपारी 1.00 - पालघरमध्ये EVM मशीनमध्ये दोष असल्याची सेनेची टीका

फोटो स्रोत, TWITTER/ANI
#पालघर पोटनिवडणुकीत मतदार याद्यांचे घोळ होते. 50 ते 60 हजार मतदारांची नावं यादीतून गायब होती. मतदान संपल्यानंतर 12 तासांच्या आत निवडणूक आयोगानं मतदानाची टक्केवारी बदलली. हे सगळं शंकास्पद आहे, असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
दुपारी 12.40 - पालघरमध्ये कौल स्पष्ट
#पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत 16 व्या फेरीअखेर भाजपच्या राजेंद्र गावित यांनी स्पष्ट आघाडी घेतली आहे. 22000 मतांची ही आघाडी आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 4
सकाळी 11.45 - केरळच्या जागेवर CPIMची मुसंडी
#केरळच्या चेंगान्नूर मतदारसंघातल्या पोटनिवडणूक निकालाचा कल स्पष्ट होऊ लागला आहे. मतमोजणीच्या पहिल्या काही फेऱ्यांमध्ये CPIMने 14229 मतांनी आघाडी घेतली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 5
सकाळी 11.40 - कर्नाटकातील एका जागेवर काँग्रेस आघाडीवर
#कर्नाटकातल्या राजराजेश्वरी नगर मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारानं 46218 मतांची आघाडी घेतली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 6
सकाळी 11.35 - पालघरमध्ये भाजपच्या गावितांना 17 हजारांची आघाडी
#पालघर : मतमोजणीच्या नवव्या फेरीनंतर भाजपचे राजेंद्र गावित यांनी 17843 मतांची आघाडी घेतली आहे. शिवसेनेचे श्रीनिवास वनगा पिछाडीवर आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 7
सकाळी 11.15 - कैरानामध्ये भाजप पिछाडीवर, रालोदला मोठी आघाडी
#कैराना : लोकसभा पोटनिवडणुकांमध्ये महाराष्ट्राबाहेर कैराना मतदारसंघाकडे साऱ्या देशाचं लक्ष होतं. इथे राष्ट्रीय लोक दलाच्या उमेदवार तबस्सूम हसन भाजपच्या उमेदवार मृगांका सिंग यांच्यापेक्षा 16 हजार मतांनी आघाडीवर आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 8
सकाळी 11.00 चौथ्या फेरीनंतर भंडारा- गोंदियात राष्ट्रवादी आघाडीवर
#भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीनंतरची मतमोजणी सुरू झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस अल्पशा का होईना आघाडीवर आहे. मतमोजणीच्या चौथ्या फेरीनंतर ही आघाडी 3959 मतांची आहे. दुसऱ्या क्रमांकावर भाजप आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 9
सकाळी 10.15 भंडारा गोंदियात राष्ट्रवादी आघाडीवर, भाजप दुसऱ्या स्थानावर
#भंडारा- गोंदिया मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस सध्या 3100 मतांनी आघाडीवर आहे. भाजप दुसऱ्या स्थानावर आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 10
सकाळी 10.00 : पालघरमध्ये भाजप आघाडीवर
#पालघर - पहिल्या काही फेऱ्यांचे निकाल बाहेर आले असून त्यानुसार पालघर मतदारसंघात भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित आघाडीवर आहेत. शिवसेनेच्या वनगा यांच्यापेक्षा 10,000 मतांनी गावित आघाडीवर आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 11
सकाळी 8.40 : देशभरात निकालांबद्दल उत्सुकता
कर्नाटक, पश्चिम बंगाल, पंजाबमध्येही महत्त्वाच्या पोटनिवडणुकांचे निकाल आज अपेक्षित.
सकाळी 8.32 : भंडारा गोंदियात मतमोजणी

फोटो स्रोत, Getty Images
भंडारा गोंदियात मतमोजणीला सुरू झाली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 12

सकाळी 8.26 : पालघरमध्ये मतमोजणी
पालघरमध्ये मतमोजणीला सुरू झाली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 13

सकाळी 8 : मतमोजणीला सुरुवात
देशभरातल्या चार लोकसभा आणि 10 विधानसभा पोटनिवडणुकींचे निकाल आज लागणार. मतमोजणीला सुरुवात
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)