बीबीसीच्या नावाने पसरवला जात असलेला कर्नाटकाचा सर्व्हे खोटा

बीबीसी

फोटो स्रोत, Getty Images

बीबीसीच्या नावाने एक सर्व्हे सध्या व्हॉट्सअॅपवर सर्वत्र फॉरवर्ड केला जात आहे. हा सर्व्हे खोटा असून आम्ही भारतात निवडणुकीआधी कोणतेही सर्व्हे करत नाही, असं बीबीसी न्यूजने एका प्रसिद्धिपत्रात म्हटलं आहे.

'कर्नाटक निवडणुकांविषयीचा एक खोटा सर्व्हे व्हॉट्सअॅपवर पसरवला जात आहे आणि त्यात दावा केला आहे की हा सर्व्हे बीबीसी न्यूजने केला आहे. आम्ही स्पष्ट करत आहोत की हा सर्व्हे खोटा आहे आणि बीबीसीने केलेला नाही. आम्ही भारतात निवडणूकपूर्व सर्व्हे करत नाही. #fakenews'

Fake survey
फोटो कॅप्शन, फेक सर्व्हे

या सर्व्हेमध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजप कर्नाटकाच्या मावळत्या विधानसभेत मुख्य विरोधी पक्ष आहे.

या मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे की 10 लाखांहून अधिक लोकांशी बोलून हा सर्व्हे करण्यात आला आहे. या मेसेजसोबत बीबीसी न्यूजच्या इंग्रजी वेबसाईटच्या इंडिया पेजची लिंक देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे.

यापूर्वीही बीबीसीच्या नावाने असे मेसेज पसरवण्यात आले होते. व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीला शोधणं कठीण असल्यामुळे असे अनेक खोटे मेसेज सर्रास पाठवले जातात.

बीबीसी न्यूज मराठीने कर्नाटक निवडणुकांचं केलेलं वार्तांकन तुम्ही इथे पाहू आणि वाचू शकता -

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : बेळगावमधले लोक कोणाला कुंदा वाटणार आणि का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)