You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हिमाचल प्रदेशात शालेय बस दरीत कोसळली, 27 जणांचा मृत्यू
हिमाचल प्रदेशच्या नूरपूर जिल्ह्यातील मल्कवाल परिसरात एक स्कूल बसला झालेल्या अपघातात 25 विद्यार्थ्यांसह 27 जणांचा मृत्यू झाला आहे.
मृतांमध्ये सर्वाधिक शालेय विद्यार्थीच आहेत. या बसमध्ये जवळपास 60 मुलं होती. ही बस नुरपूरच्या वजीर राम सिंह स्कूलची होती.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सोमवारी साडेचार वाजता ही बस दरीत कोसळली. मृतांमध्ये एक ड्रायव्हर, दोन शिक्षक आहेत. उर्वरीत सर्व विद्यार्थी आहेत.
दरीत कोसळलेल्या बसला घाटातील रस्त्यावरून बघणंही कठीण होतं. यावरूनच दुर्घटनेची गंभीरता लक्षात येऊ शकते. जवळपास 100 मीटर दरीत ही बस कोसळली आहे.
कांगडाचे उपायुक्त संदीप कुमार यांनी बीबीसी पंजाबीचे प्रतिनिधी सरबजीत धालीवाल यांना माहिती देताना सांगितलं की, सहा जखमींना पठाणकोट इथल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे.
इतर जखमींवर स्थानिक हॉस्पिटलमध्येच उपचार सुरू करण्यात आले आहेत, असं संदीप कुमार म्हणाले.
वजीर राम सिंह मेमोरीय पब्लिक स्कूलचे हे सर्व विद्यार्थी होते. 23 विद्यार्थ्यांसह 2 शिक्षक, बसचा ड्रायव्हर आणि एका महिलेचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे. मृत 23 विद्यार्थ्यांमध्ये 13 मुलं आणि 10 मुलींचा समावेश आहे.
स्थानिकांनी इतरांना वाचवण्यासाठी मोठी मदत केल्याचं पोलिसांनी सांगितलं.
या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत देखील जाहीर करण्यात आली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)