पाहा फोटो : शोभायात्रांच्या माध्यमातून गुढीपाडव्याचा आनंद

महाराष्ट्रात आज गुढीपाडवा हा सण जल्लोषात साजरा केला जात आहे. मुंबईतल्या गिरगाव इथे दरवर्षीप्रमाणे यंदाही नववर्ष शोभायात्रा काढण्यात आली. यात अबालवृद्धांसह सारेच या शोभायात्रेत सहभागी झाल्याचे दिसते आहे.

गिरगावातल्या शोभायात्रेची सुरुवात ढोल-ताशा पथकाच्या वादनाने झाली. या वेळी उपस्थितांनीही या पथकाच्या भोवती फेर धरून जल्लोषाला सुरुवात केली.

नाशिकमध्येही गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेचे ड्रोनद्वारे टिपलेलं दृश्यं.

पारंपरिक पद्धतीने साड्या नेसून स्त्रिया या बुलेट व अन्य दुचाकींवर स्वार होऊन शोभायात्रेत सहभागी झाल्या आहेत.

महाराष्ट्र सरकारने गुढीपाडव्यापासून प्लॅस्टिकवर बंदी घातली आहे. यामुळे गिरगाव इथल्या शोभायात्रेतील एका चित्ररथावर प्लॅस्टीक मुक्तीचा संदेश देण्यात आला होता.

प्लॅस्टीकबंदी व्हावी यासाठी या संस्थेमार्फत रस्त्यावरील नागरिकांना कागदी पिशव्यांचं वाटप करण्यात आलं.

एकीकडे प्लॅस्टिक वापरापासून परावृत्त करण्याचे संदेश दिले जात होती. प्लॅस्टिक मुक्तीचा संदेश देणारी पत्रकंही वाटण्यात येत होती. प्लॅस्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून कागदी पिशव्या वाटण्यात आल्या. पण विरोधाभास म्हणजे या पत्रकांच्या आणि संदेशाच्या जवळच असा प्लॅस्टिकचा कचरा जमला होता.

मोठ्यांसह लहान मुलींनीही झेंडा घेऊन या शोभायात्रेत हजेरी लावली आहे. या मुलीही पारंपरिक पद्धतीने साड्या नेसून शोभायात्रेत सहभागी झाल्या आहेत.

गुढीपाड्व्यानिमित्त महाराष्ट्रात ठिकठिकाणी नववर्ष शोभायात्रा निघतात. पारंपरिक पोशाखात सहभागी झालेली तरुणाई हे हल्लीच्या शोभायात्रांचे आकर्षण असते. मुंबई आणि नाशिकमधल्या शोभायात्रांची ही काही दृश्यं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)