पाहा फोटो : या फोटोंमधून जाणून घ्या, आठवड्याभरात देशात काय घडलं!

शेतकरी मोर्चा

फोटो स्रोत, Siddharth

फोटो कॅप्शन, ठाणे - नाशिकहून हजारो शेतकरी मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत. मुंबईला पोहोचेपर्यंत निरनिराळ्या भागातून शेतकरी या मोर्चात सहभागी होणार आहेत. 12 मार्चला हा मोर्चा मुंबईमध्ये विधानभवनावर धडकणार आहे. त्यांच्या मागण्या सरकारच्या कानावर पोहोचतील का, त्यावर काही ठोस तोडगा निघेल का?

महिला दिन, शेतकरी मोर्चा यांच्याबरोबरच सुवर्ण मंदिराच्या सुवर्ण कलशाला झळाळी देण्याचे काम सुरू झालं आहे. या आठवड्यातील अशा काही ठळक घडामोडींवर एक नजर.

FOG

फोटो स्रोत, Swati Rajgolkar

फोटो कॅप्शन, कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर दा़टलेल्या धूक्यामुळे ऐन उन्हाळ्यात वेगळेच चित्र पाहायला मिळाले.
line
Tibet

फोटो स्रोत, MONEY SHARMA/AFP/Getty Images

फोटो कॅप्शन, नवी दिल्ली - चीनच्या दूतावासाबाहेर निदर्शनं करणाऱ्या तिबेटी नागरिकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. 9 मार्चला चीनविरुद्धच्या उठावाचा वर्धापनदिन साजरा केला जातो.
line
Rajasthan

फोटो स्रोत, HIMANSHU SHARMA/AFP/Getty Images

फोटो कॅप्शन, अजमेर - राजस्थानमध्ये शीतला सप्तमी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
line
Gujarat's first all-women

फोटो स्रोत, Kalpit Bhachech

फोटो कॅप्शन, मणीनगर - आंतरराष्ट्रीय महिला दिन, 8 मार्चपासून अहमदाबादमधलं मणीनगर हे रेल्वे स्टेशन पूर्णपणे महिलांच्या नेतृत्वाखाली काम करणारं आणखी एक स्टेशन झालं.
line
Balkrishna Doshi

फोटो स्रोत, YSF

फोटो कॅप्शन, अहमदाबाद - स्थापत्यशास्त्रातील नोबेल म्हणजे प्रिटस्कर पारितोषिक बाळकृष्ण दोशी यांना जाहीर झाला आहे. हा मान मिळवणारे ते पहिले भारतीय स्थापत्य विशारद आहेत. त्यांच्या कामाची ही झलक आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची वास्तू.
line
Revolutionary Students Youth Federation

फोटो स्रोत, ARUN SANKAR/AFP/Getty Images

फोटो कॅप्शन, चेन्नई - त्रिपुरामध्ये लेनिन यांचा पुतळा पाडण्यात आल्याच्या निषेधार्थ चेन्नईमध्ये रिव्होल्यूशनरी स्टुडंट्स यूथ फेडरेशननं निदर्शनं केली. पुतळा पाडण्याच्या घटनेचे देशभर ठिकठिकाणी पडसाद उमटले.
line
Indian army soldier

फोटो स्रोत, ARUN SANKAR/AFP/Getty Images

फोटो कॅप्शन, चेन्नई - लष्कराच्या जवानांनी केलेल्या चित्तथरारक कवायतींनी प्रेक्षकांना श्वास रोखून धरायला लावला. हे दृश्य चेन्नईतलं प्रशिक्षण अकादमीतलं.
line
Golden Temple

फोटो स्रोत, NARINDER NANU/AFP/Getty Images

फोटो कॅप्शन, अमृतसर - बर्मिंगहॅमवरुन आलेल्या स्वयंसेवकांनी अमृतसरच्या सुवर्ण मंदिराच्या सफाई मोहिेमेत भाग घेतला.
line
woman transports brick

फोटो स्रोत, SHAMMI MEHRA/AFP/Getty Images

फोटो कॅप्शन, जालंधर - महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर टिपलेलं हे वास्तव. वीटभट्टीत काम करणारी महिला म्हणजे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून संसाराचा गाडा ओढणाऱ्या तमाम महिलांचे प्रतीकच.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)