अजित पवार EXCLUSIVE: 'सुप्रिया मुख्यमंत्री झालेली आवडेल, पण...'

फोटो स्रोत, Facebook
- Author, मयुरेश कोण्णूर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
माझी बहीण सुप्रिया मुख्यमंत्री झालेली मला पाहायला आवडेल, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. बीबीसी मराठीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. पण राज्याचं राजकारण मी बघतो आणि तिला केंद्रात रस आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. ही संपूर्ण मुलाखत तुम्ही बातमीच्या तळाशी पाहू शकता.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेच्या निमित्तानं अजित पवार यांनी औरंगाबादमध्ये बीबीसीला दिलेल्या मुलाखतीमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या.
'राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून सुप्रिया सुळे यांना पाहायल आवडेल का?' असा प्रश्न विचारल्यावर अजित पवार म्हणाले, "नक्कीच आवडेल! कारण शेवटी ती माझी बहीण आहे, माझी बहीण राज्याची प्रमुख झालेली का नाही मला आवडणार?"
"मला राज्याच्या राजकारणात रस आहे, सुप्रियाला राज्यात रस नाही. तिला दिल्लीतच्या राजकारणात रस आहे. तसं आमच्यात ठरलेलं आहे. इतर कुटुंबांमध्ये जे घडलं, ते राष्ट्रवादीत होणार नाही," असं म्हणत त्यांनी दोघांमध्ये शीतयुद्ध असल्याच्या अफवांना खोडून काढलं.

फोटो स्रोत, Sharad Badhe/BBC
2019 सालच्या निवडणुकांआधी राष्ट्रवादी एक चेहरा पुढे करणार नाही. सत्तेत आलो तर आमदार आणि शरद पवार निर्णय घेतील, असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं.
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त, 1
अजित पवार यांनी राज्यभर फिरून हल्लाबोल मोर्चे काढले. त्याची सांगता आज औरंगाबादमध्ये झाली.
"आम्हाला विश्वासार्हता कमवावी लागणार आहे. आमचे प्रतिनिधी निवडून येतील, तेव्हाच ती कमावली, असं आम्ही मानू," अशी कबुली त्यांनी दिली, पण सिंचन घोटाळ्याविषयी बोलायला नकार दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करणार का आणि ते तुमचं नाव असणार का असं विचारल्यावर अजित पवारांनी नाही असं उत्तर दिलं. "आम्ही लोकशाही मानणारे कार्यकर्ते आहोत. जास्तीत जास्त जागा राष्ट्रवादीच्या नावावर कशा निवडून येतील याचाच विचार आधी करणार", असं ते म्हणाले.
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार राष्ट्रवादी जाहीर करणार का, या प्रश्नावर अजित पवार नेमकं काय म्हणाले ते ऐकण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त, 2
सगळ्या आमदारांनी एकत्र येऊन विधीमंडळ नेता निवडण्याचा राष्ट्रवादीचा इतिहास आहे, याची आठवणही त्यांनी करून दिली.
"अशा प्रकारचे निर्णय वरिष्ठांनी घ्यायचे असतात", अशी पुस्ती त्यांनी जोडली.

फोटो स्रोत, Sharad Badhe/BBC
त्यांच्या मुलाखतीतले इतर महत्त्वाचे मुद्दे :
1. सिंचन घोटाळा - "त्याबद्दल चौकशी समितीसमोर बोलेन. कोर्टाने विचारलं तर माझे वकील बोलतील, मी याविषयी माध्यमांशी बोलणार नाही."
या सिंचन घोटाळ्याबद्दल अजित पवार नेमकं काय म्हणाले ते या व्हीडिओमध्ये पाहा.
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त, 3
२. भाजप मित्र की शत्रू? - "२०१४ साली पुन्हा निवडणुका होऊ नयेत, म्हणून आम्ही तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला... नंतर लक्षात आलं की हे सरकार अपयशी ठरतंय. त्यानंतर आम्ही बोटचेपी भूमिका घेतली नाही. विधिमंडळात आणि बाहेर सतत टीका करत आहोत."
३. शिवसेना - " शिवसेना खूप काळानंतर सत्तेल आली आहे. त्यांना सत्तेची गरज आहे. ते सत्तेतून बाहेर पडणार नाहीत. तो हिंदुत्ववादी पक्ष असल्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत जाऊ शकत नाही."
4. राजू शेट्टींसोबत युती? - "राजकारणात कुणी कायमचं शत्रू नाही, मित्र नाही. त्या त्या वेळची परिस्थिती पाहून बेरजेचं राजकारण केलं जातं."
5. एकनाथ खडसे - "खडसेंच्या कानात जे सांगितलं ते योग्य वेळी सांगेन."
6. ट्वीट का नाही करत? - "मी कामाला महत्त्व देतो, गरज असेल तेवढंच सोशल मीडियाला महत्त्व देतो. सोशल मीडिया दुधारी हत्यार आहे."
7. शेतकरी - कर्जमाफी आणि इतर मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही, म्हणून आम्हाला प्रतिसाद मिळत आहे.

अजित पवार यांची संपूर्ण मुलाखत इथे पाहू शकता
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त, 4

हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








