मुंबईत संविधान बचाव मोर्चा आणि तिरंगा यात्रा

मुंबईतला प्रजासत्ताक दिन मोर्चा आणि यात्रेनं गजबजला होता. विरोधी पक्षांनी संविधान बचाव मूक मोर्चा काढल्यावर त्याला तिरंगा यात्रेनं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजपकडून करण्यात आला.

मुख्यमंत्र्यांनी झेंडा फडकवून संविधान सन्मान तिरंगा रॅलीचं सभेत रूपांतरित केलंय

संविधान बचाव मोर्चाला सुरुवात झाली डॉ. आंबेडकर चौकातून. गेट वे ऑफ इंडियाला हा मोर्चा संपला. या मोर्चासंदर्भातले लाईव्ह अपडेट इथं वाचा.

शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, राजू शेट्टी आदी नेते सहभागी झाले. मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वी राजू शेट्टी यांनी हा मोर्चा अराजकीय असल्याचं सां

एका बाजूला हा संविधान बचाव मोर्चा सुरू असताना सत्तारूढ भारतीय जनता पक्षाच्या पुढाकारानं तिरंगा यात्राही सुरू होती.

'संविधान के सन्मान में भाजपा मैदान में' अशा आशयाच्या गांधीटोप्यांचं रॅलीत वाटप करण्यात आलं.

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ही तिरंगा यात्रा निघाली. दादरच्या चैत्यभूमीपासून या यात्रेला सुरुवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही यात्रा सुरू झाली. भाजपचे आमदार, खासदार, नेते या यात्रेत सहभागी झाले होते. परळच्या कामगार मैदानात या यात्रेची सांगता होणार आहे.

भारतमाताकी जयचा जयघोष करत या यात्रेत 6 चित्ररथ सामील झाले. जय जय जय शिवाजीच्या आणि बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणा सुरू होत्या.

बीबीसीच्या प्रतिनिधीनं दिलेल्या माहितीनुसार देशभक्तीपर गीतांचे डीजे वाजवत ही रॅली निघाली. शिवाजी पार्क येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून रॅलीला सुरुवात झाली.

संविधान बचाव मोर्चाची सांगता गेट वे ऑफ इंडियाला होणार आहे. या मूक मोर्चात शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, राजू शेट्टी आदी नेते सहभागी झाले. मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वी राजू शेट्टी यांनी हा मोर्चा अराजकीय असल्याचं सांगितलं.

संविधान बचाव मोर्चाच्य नेत्यांची पत्रकार परिषद मुंबईत सुरू आहे.

कुठलीही घोषणाबाजी न करता मूक मोर्चा निघाला. संविधान बचाव यात्रेची सांगता गेट वे ऑफ इंडियाला झाली. या वेळी मोर्चाच्या नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

राजू शेट्टी पवारांसोबत 'संविधान बचाव मोर्चा'त सहभागी झाले होते. त्यांची राजकीय भूमिका काय आहे? पाहा या व्हीडिओमध्ये

मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वी राजू शेट्टी यांनी हा मोर्चा अराजकीय असल्याचं सांगितलं.

त्यांनी मांडलेले मुद्दे -

१. सध्याच्या काळात देशात अस्वस्थेचं वातावरण आहे, कारण केंद्रीय मंत्रिमंडळातला एक मंत्री, जो ज्येष्ठ खासदारही आहे, तो खुलेआम म्हणतो की, आम्ही सत्तेत आलो ते केवळ घटना बदलण्यासाठी, आम्हाला तो अधिकार आहे. 19 राज्यात आमची सत्ता आहे, आम्ही ते बदलू शकतो तो आम्हाला आधिकार आहे.

२. विकासाच्या मुद्द्यावर, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर, बेरोजगारीच्या मुद्द्यावर, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर त्यांनी निवडणूका लढवल्या, त्यात संविधान कुठेही न्हवतं, आता भाजप आपला छूपा अजंडा बाहेर काढत आहे. - राजू शेट्टी

३. संविधान बदलणं हा भाजपचा छूपा अजंडा, आधी माहित असतं तर मित्रपक्ष याच की नाही याचा विचार केला असता.

४. बहुमत मिळाल्यानंतर छूपा अजंडा अशा प्रकारे बाहेर काढणं त्यांना शोभत नाही.

तर, काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनी संविधान वाचवण्यासाठी हा प्रयत्न आहे, असं स्पष्ट केलं.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)