मुंबई : 14 जणांच्या मृत्युला कारणीभूत 5 अधिकारी निलंबित, सुरक्षारक्षक ठरला तारणहार

फोटो स्रोत, Amol rode
मुंबईच्या लोअर परळ भागातल्या एका हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत 14 जण ठार झाले आहेत. या आगीला कारणीभूत ठरल्याच्या कारणावरून पाच अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.
निष्काळजीपणामुळे एवढ्या जणांच्या मृत्युला कारणीभूत ठरलेल्या इतरांवरही कारवाई करण्यात येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
गुरुवारी मध्यरात्री 12.30च्या सुमारास कमला मिल कंपाउंडमधल्या ट्रेड हाऊस बिल्डींगच्या गच्चीवर एका पबमध्ये ही आग लागली, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली. मृत 14 जणांपैकी 11 महिला आहेत.

जखमींपैकी KEM रुग्णालयात 06 जणांवर, भाटिया हॉस्पिटलमध्ये 12, तर दोन जणांवर सायनच्या लोकमान्य टिळक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
एका जखमीला ऐरोली बर्न सेंटरला हलवण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त 7 जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याचं आपत्कालीन विभागाने सांगितलं.

फोटो स्रोत, JANHAVEE MOOLE/BBC
अग्निशमन दलानं आग नियंत्रणात आणल्याची माहिती आपत्कालीन विभागानं दिली आहे. आगीचं नेमकं कारण अजून कळलेलं नाही.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
मुंबई महानगरपालिका आयुक्त अजय मेहता यांनी घटनास्थळी तसंच केईएम हॉस्पिटलमध्ये पाहणी केली.

फोटो स्रोत, AMOL RODE
कमला मिलच्या आवारात कॉर्पोरेट ऑफिसेस, प्रसारमाध्यमांची कार्यालयं, पब आणि रेस्टॉरंट्स आहेत.
या परिसरात बांधकामंही सुरू आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 4
वन अबव या रूफ-टॉपवरच्या हॉटेलमध्ये लागलेली आग नंतर शेजारच्या बिल्डिंगमध्ये असलेल्या मोजो आणि लंडन टॅक्सी या बारमध्येही पसरल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.
मुंबईत रूफ टॉपवरील हॉटेलांना नोव्हेंबरमध्ये पालिकेनं परवानगी दिली आहे.

सुरक्षा रक्षक ठरला तारणहार
याच इमारतीत काम करणारे सुरक्षारक्षक महेश साबळे आज किमान 100-150 जीवांचे तारणहार ठरले. आग लागली तेव्हा महेश यांनी तत्काळ लोकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली.
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त
याच इमारतीत असलेल्या हॉटेल मोजोस, वन अबव आणि लंडन टॅक्सी यांचा बराच भाग या आगीने वेढला. एका वृत्तानुसार, आत अडकलेल्या काही लोकांनी आगीचं कळताच बाथरूमकडे धाव घेतली, आणि अनेकांचा तिथेच मृत्यू झाला.

फोटो स्रोत, Janhavee Moole / BBC
पण प्रवेशद्वाराशी असलेल्या महेश यांनी वेळ न दवडता लगेच लोकांना खाली उतरण्यास सांगितलं.
खाली त्यांचे दोन गार्ड सहकारी, सूरज गिरी आणि संतोष होतेच. त्यांनाही त्यांनी सतर्क केलं आणि लोकांना खाली उतरण्याचा मार्ग दाखवला.
बीबीसी प्रतिनिधी जान्हवी मुळे यांना मिळालेल्या माहितीनुसार, महेश साबळे यांनी जवळपास 100-150 लोकांचा जीव या आगीतून वाचवला.

फोटो स्रोत, AMOL RODE
रुफ टॉपवरील रेस्टॉरंटमध्ये एका 28 वर्षीय महिलेच्या वाढदिवसाची पार्टीही सुरू होती. मृतांपैकी बहुतांश त्या पार्टीसाठी जमलेले होते. जिचा वाढदिवस होता तिचंही निधन झाल्याची माहिती तिच्या आजोबांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला दिली.
आगीचे गोळे पडत होते
ज्या बिल्डिंगच्या गच्चीत आग लागली तिथंच 'TV 9' या मराठी या वाहिनीचं कार्यालय होतं. तिथं आउटपूट डेस्कवर असलेले पत्रकार स्वप्नील चव्हाण यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, "आम्ही नाईट शिफ्टचे कर्मचारी सकाळच्या बुलेटीनचं काम करत होतो. 12.15 ला गोंधळाचा आवाज आला. पण त्या भागात पार्ट्या होत असल्यानं त्याचाच आवाज वाटला."
"पण 12.25ला धावपळ सुरू झाली. आम्हाला मुख्य दरवाज्यातून बाहेर पडता आलं नाही, कारण वरून आगीचे गोळे पडत होते. त्यामुळे आम्ही आपत्कालीन दरवाज्यातून बाहेर पडलो. पुढच्या भागात आलो तर रूफटॉप हॉटेलचं छत खाली पडलं. ते माझ्या बाईकवरच पडलं."

मुंबईतील गेल्या काही काळातल्या दुर्घटना -
31 ऑगस्ट - भायखळा इथं पाच मजली बिल्डिंग कोसळून 22 जण ठार.
29 सप्टेंबर - एलफिन्स्टन रोड स्टेशनवरील पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत 23 ठार.
18 डिसेंबर - मुंबईच्या साकीनाका परिसरात फरसाणाच्या दुकानाला लागलेल्या आगीत 12 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.
आणखी वाचा
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)