डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील कसा झाला पराभूत? : पाहा क्षणचित्रं

61व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शुक्रवारी सनसनाटी निकाल पाहायला मिळाला.

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटीलला यंदा पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. हिंगोलीच्या गणेश जगतापनं चंद्रहारला अवघ्या दीड मिनिटांत चीतपट केलं.

पुण्याच्या मुळशी तालुक्यातील भुगावच्या स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत या स्पर्धेचा आखाडा सजला आहे. 'महाराष्ट्र केसरी' किताबाची लढत ही 86 ते 125 किलो या वजनी गटात खेळवली जाते.

या गटातील माती आणि मॅटवरील विजेत्यांमध्ये महाराष्ट्र केसरी किताबासाठी लढाई रंगते. येत्या २४ तारखेला संध्याकाळी महाराष्ट्र केसरी किताबासाठी अंतिम लढाई खेळवली जाईल.

चंद्रहार पाटीलच्या कामगिरीविषयी महाराष्ट्रातल्या कुस्तीप्रेमींमध्ये उत्सुकता होती, पण त्याला पहिल्याच फेरीत पराभव स्वीकारावा लागला.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)