गुजरातमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार - सर्व 7 एक्झिट पोल्सचा अंदाज

फोटो स्रोत, Kevin Frayer
गुजरातमध्ये झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत भाजप आपली सत्ता कायम राखेल असा अंदाज सर्व एक्झिट पोल्सनी व्यक्त केला आहे. भाजपला 100हून जास्त जागा मिळतील, असा अंदाज सर्वांनी व्यक्त केला आहे. गेल्या वेळी भाजपला 117 जागा मिळाल्या होत्या.
काँग्रेसला 70 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काँग्रेसला 2012 सालच्या निवडणुकीत मित्रपक्षांसोबत 63 जागा मिळाल्या होत्या.
बहुमतासाठी 92 जागांची आवश्यकता आहे. हे आकडे खरे ठरले, तर भाजपला गुजरातमध्ये पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळू शकेल.
आणखी वाचा:
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)




