सोशल : 'शरद पवारांचे घरी बसण्याचे दिवस आहेत, तरुणांना संधी द्या'

फोटो स्रोत, RAVEENDRAN/AFP/Getty Images
शरद पवार हे 2019 मध्ये पंतप्रधान होऊ शकतात, असं भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी वर्तवलं आहे. कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरात बोलताना त्यांनी असा दावाही केला की 2019 हे वर्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं असेल.
आम्ही बीबीसी मराठीच्या वाचकांना विचारलं की "प्रफुल्ल पटेल यांच्या या भाकिताविषयी तुम्हाला काय वाटतं?"
त्यावर अनेकांनी आपली मतं व्यक्त केली आहेत.
सचिन कर्डक म्हणतात "शरद पवार यांचे आता घरी बसायचे दिवस आले. तरुण पिढीला संधी मिळायला पाहिजे."

फोटो स्रोत, facebook
"प्रत्येक निवडणुकीआधी प्रफुल्ल पटेल हे असंच काही वक्तव्य करतात. त्यात नाविन्य काहीच नाही," असं भाई उनमेश खंडागळे यांनी म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Facebook
तर अनेकांनी शरद पवार देशाचे पुढचे पंतप्रधान होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे.
रामेश्वर पाटील यांनी म्हटलं आहे की, "शरद पवार आजपर्यंत एकाही निवडणुकीत पराभूत झाले नाहीत. काँग्रेसने जर पवारांना पंतप्रधानपदाची उमेदवारी दिली तर 2019ची निवडणूक काँग्रेस नक्की जिंकेल."

फोटो स्रोत, Facebook
प्रथमेश पाटील म्हणतात, "प्रत्येक वर्षं हे शरद पवारांचंच असतं. 2019 असं काय वेगळं असणार?"

फोटो स्रोत, Facebook
नयन खिडबिडे यांनी म्हटलं आहे की "त्यांचं सरकार आलं तर शरद पवार नक्कीच पंतप्रधानपदाचे दावेदार असतील."

फोटो स्रोत, Facebook
हितेन पवार म्हणतात, "राजकारणात काहीही होऊ शकतं. पवार हे मुरलेले राजकारणी आहेत. त्यांच्या मनात आलं तर ते नक्कीच पंतप्रधान होतील."

फोटो स्रोत, Facebook
सचिन पाटील मापारी यांनी शरद पवारांच्या नावाचे गोडवे गायले आहेत. ते म्हणतात, "कर्जमाफी करण्यासाठी रक्तात दानत असावी लागते. पवारांनी नुसत्या एका सहीत शेतकऱ्यांना कर्जमाफी करून दिली होती."

फोटो स्रोत, Facebook
सरकार चालवण्यासाठी जे कौशल्य लागतं ते सर्व काही पवारांमध्ये आहे, असं नंदकुमार कांबळे यांनी सांगितली. पवार पंतप्रधान झाले तर देशाचं भलं होईल, असंही ते म्हणाले.

फोटो स्रोत, Facebook
पवारांचे सगळ्या पक्षांशी चांगले संबंध असल्याने सगळे पक्ष जर एकत्र आले तर पवार नक्कीच पुढचे पंतप्रधान होऊ शकतात, असं डॉ. विशाल पाटील यांनी म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Facebook
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जर एकत्र आले तरचं शरद पवार पंतप्रधान होऊ शकतील. नाही तर शक्यता कमी असल्याचं गणेश लटके यांनी म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Facebook
देवेंद्र परदेशी यांची ही प्रतिक्रिया - "पवार जर खरंच पंतप्राधन झाले तर देशातील प्रत्येक राज्यात सिचंन घोटाळाफेम अजित पवार, सुनील तटकरे, तुरुंगवासी छगन भुजबळ, राम शिंदेंसारखे नेते आपल्या भावी पिढीसाठी नक्कीच काही काम करतील."

फोटो स्रोत, Facebook
शरद पवार 2019मध्ये पंतप्रधान होतील, हे "पटेलांचं दिवास्वप्न" आहे, असं मत ब्रम्हेंद्र दिंडे आणि बांबूराव यांनी ट्विटरवरून नोंदवलं आहे.

फोटो स्रोत, Twitter
शरद पवार पंतप्रधान होऊ शकतील का, यावर युवराज जाधव, जगदीश पाटील, स्मीता पवार, सचिन वाघ यांना 'हो' असं उत्तर दिलं आहे. तर अनेकांनी "काय जोक करता राव!!" असं म्हटलं आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








