सोशल : 'फटाके फोडताना सुप्रीम कोर्टाचा विचार नाही मग फराळ करताना कॅलरीचा का?'

सर्वांसाठी दिवाळीच्या आनंदाची व्याख्या ज्या बाबतीत समान होते ती गोष्ट म्हणजे फराळ. दिवाळीची कितीही तयारी करा, फराळाशिवाय ती अपूर्ण आहे.

दिवाळीनिमित्त प्रत्येक भारतीय घरात फराळ तयार होतो. पण नाही म्हटलं तरी फराळावर खूप ताव मारणं आरोग्याला थोडंफार हानिकारक आहेच.

बीबीसी मराठीने आज वाचकांना विचारलं होतं की दिवाळीच्या फराळावर ताव मारताना कॅलरीजचा विचार करावा का?

प्रतिक्रियांवरून लक्षात आलं की एकंदरीतच फार कमी जण दिवाळीत कॅलरीजचा विचार करायच्या मूडमध्ये आहेत.

प्रवीण सागर म्हणतात की फराळ घरचा असेल तर कॅलरीजचा विचार करायची गरज काही गरज नाही.

'महिला मंडळ फोंडाघाट' या अकाऊंटने प्रतिक्रिया दिली आहे की 'दिवाळी पाच दिवस असते. यथेच्छ ताव मारा.'

सुदर्शन व्यवहारे म्हणतात की विचार करत बसलात तर फराळ मिळणार नाही.

"फराळावर ताव मारायला हरकत नाही. फक्त कॅलरीज बर्न करायला हव्यात," असं म्हटलं आहे विशाल पाटील यांनी.

मकरंद कुलकर्णी म्हणतात की पुर्वी फक्त सणावारालाच गोडधोड व्हायचं. पण आता तसं नाही त्यामुळे जरा जपूनच फराळ खावा.

मात्र विनय टेमकरांना कॅलरीजची चिंता नाही. "आम्ही फटाके फोडताना सुप्रीम कोर्टाचा विचार करत नाही तर कॅलरीजचं काय घेऊन बसलात?"

पुष्कर हाते म्हणतात की जसा दिवाळीत फटाके वाजवताना वर्षभर होणाऱ्या प्रदूषणाचा विचार करावा तसंच दिवाळीत फराळ खाताना कॅलरीजचाही विचार करावा.

जयदीप भोसलेंनी ट्वीट केलं आहे की एक दिवस कॅलरीज विचार करायची गरज नाही.

सुमीत कामेकर मात्र म्हणतात की कॅलरीजचा विचार करायलाच हवा, कारण हार्ट अटॅक विचार न करता कधीही येतो.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)