#WomenBoycottTwitter: महिला का घालत आहेत ट्विटरवर बहिष्कार?

व्हीडिओ कॅप्शन, निर्मात्याकडून हॉलीवूडमध्ये अभिनेत्रींचा लैंगिक छळ?

रोझ मॅकगोवन या हॉलिवूड अभिनेत्रीचं ट्विटर अकाऊंट बारा तासांसाठी बंद करणाऱ्या ट्विटरला आता महिलांचा रोष पत्कारावा लागत आहे. भारतातही शुक्रवारी सकाळी सुरू झालेला #WomenBoycottTwitter हा हॅशटॅग सर्वाधिक ट्रेंड करत होता.

रोझ मॅकगोवनने हॉलिवूडचा निर्माता हार्वी वाईनस्टेन याने केलेल्या कथित लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवला होता. त्याच्याविरोधात पहिल्यांदाच कोणीतरी असं काहीतरी बोललं होतं.

रोझने यासाठी ट्विटरची मदत घेतली आणि या घटनेसंदर्भात ट्वीट करत एक फोन नंबर शेअर केला.

रोजने या ट्वीटमध्ये एक खाजगी फोन नंबर शेअर केला होता. हे आमच्या नियमांचा उल्लंघन आहे, असं म्हणत ट्विटरने तिचं अकाऊंट बारा तासांसाठी ब्लॉक केलं.

ट्विटरवर बहिष्कार

फोटो स्रोत, Twitter

अकाऊंट ब्लॉक करताना ट्विटरने फक्त तिला डायरेक्ट मेसेज करण्याचीच सुविधा सुरू ठेवली होती. नंतर ट्विटरने रोजचं अकाऊंट पुर्ववत करत सांगितलं की फोन नंबर असलेलं ते ट्विट डिलीट करण्यात आलं आहे.

मॅकगोवनचं नाव न्यूयॉर्क टाइम्सच्या एका लेखात आलं होतं, ज्यात तरुण अभिनेत्रींवर काही दशकांपासून होणाऱ्या कथित लैंगिक अत्याचारांविषयीचा खुलासा करण्यात आला होता.

ट्विटरविरोधात उमटले पडसाद

ट्विटरने हॉलिवूड अभिनेत्रीचं अकाऊंट ब्लॉक केल्याचा प्रकार अनेकांना रुचला नाही. ट्विटरने एक महिलेला मदत करण्याऐवजी तिचाच आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, अशी भावना ट्विटर वापरणाऱ्यांच्या मनात निर्माण झाली.

गेल्या दोन दिवसांपासून याचे पडसाद उमटत होते.

भारतातही गुरूवारी #WomenBoycottTwitter हा हॅशटॅग ट्रेंड व्हायला सुरूवात झाली आणि बघता बघता तो टॉप ट्रेंड झाला.

प्रसिद्ध पत्रकार बरखा दत्त यांनी शुक्रवारी सकाळी 9.40 वाजता या हॅशटॅगसह ट्वीट केलं - "या विरोधात एकत्र या आणि निषेधामध्ये सहभागी व्हा. आम्ही ट्विटरकडून अधिक चांगल्या छळवणूकविरोधी धोरणांची आणि चांगल्या लोकशाहीची मागणी करतो आहोत."

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

या ट्वीटवरही अनेकांनी त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.

रोझ मॅकगोवन हिनेही काही सर्मथकांचे ट्विट रिट्वीट केले आहे. या मोहीमेत आम्हीही सहभागी होत आहोत, असं त्यात म्हटलं आहे.

रोझ मॅकगोवन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रोझ मॅकगोवन

अमेरिकन मॉडल ख्रिस्टीन टायगेन हिनेही या बहिष्कारात सहभागी होण्याचं आवाहन करत ट्वीट केलं -

"महिलांनो, चला ट्विटरवर बहिष्कार टाकूया. हे मी ट्विटरचा व्देष करते म्हणून नाही म्हणत आहे. उलट मला तर हे व्यासपीठ आवडतं आणि त्यामुळे यात सुधारणेला वाव आहे, असं मला वाटतं."

'बझफीड इंडिया' वेबसाइटच्या संपादक रेघा झा यांनीही ट्विट केलं - "अनेक वर्षांपासून अत्याचारविरोधी चांगल्या धोरणांची आवश्यकता आम्हाला भासत असताना ट्विटरने यात फारसं काही चांगलं केलं नाही. एक दिवसासाठी महिलांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. बघूयात काय होतं."

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

पत्रकार आणि लेखिका सागरिका घोष यांनी रिट्विट करत या मोहीमेत सहभाग दर्शविला.

लेखिका अर्पणा जैन ट्वीटमध्ये म्हणतात, "हे आता जगभरात सुरू होत आहे, आणि आपल्याला त्यात आता सहभागी व्हायलाच हवं. पुरुषांनो, तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकाल का? ऑनलाईन छळवणूक थांबवण्यासाठी आपल्याला कडक धोरणांची आवश्यकता आहे."

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

या मोहिमेचा परिणाम होताना दिसत आहे. अनेकांनी तर चोवीस तासांसाठी ट्विटर अकाऊंट बंद ठेवणार असल्याचं म्हटलं आहे. जगभरात हा हॅशटॅग आता ट्रेंड होऊ लागला आहे.

महिलांनी ट्विटरवर बहिष्कार टाकण्याचा घेतलेला निर्णय अगदी वैध असल्याचं लेखिका आणि दिग्दर्शिका इरावती कर्णिक म्हणतात.

"सोशल मीडियावरचा माझा अनुभव वाईट आहे. बऱ्याचदा तुम्ही न पटणारी विधानं केली की त्याला खोडून काढण्याऐवजी तुम्ही बाई आहात म्हणून हल्ला केला जातो. माझ्याबाबतीत अनेकदा हे घडलं आहे."

"अनेकवेळेस विखारी अनुभव आलेत. निदान माझ्यवर तरी उजव्या विचारांच्या कडव्या समर्थकांकडून असे हल्ले झाले आहेत. महिलांकडूनही अनेकवेळेस, 'हे खरं आहे का?' असे प्रश्न विचारले जातात. संशय घेतला जातो," असंही त्या पुढे म्हणतात.

पत्रकार स्मृती कोप्पीकर म्हणतात, "हा हॅशटॅग जगभरात वापरला जात आहे. तो यशस्वीही ठरला आहे. एक हॅशटॅग कुठल्याही समस्येवर उपाय ठरू शकत नाही. पण हा ट्विटरला दिलेला एक संकेत आहे."

"महिलांना द्वेष, धमक्या आणि शिवीगाळींचा कायम सामना करावा लागतो. त्याविषयी ट्विटरने विचार केला पाहीजे."

कॉम्प्युटर

फोटो स्रोत, Getty Images

"रोझनं एक खाजगी क्रमांक ट्विट केला म्हणून तिचं अकाऊंट ब्लॉक केलं गेलं. कोणाचा तरी नंबर ट्विट केला म्हणून ब्लॉक केलं, अस कारण त्यांनी सांगितलं. मग इथं तर रोज इतकी माणसं घाण शिवीगाळ करतात, बलात्कार करण्याची आणि मारून टाकण्याची धमकी देतात मग अशांची अकाऊंट रद्द का केली जात नाहीत?"

ज्येष्ठ पत्रकार नीता कोल्हटकर यांना ट्विटरवरून सामूहिक बलात्काराची धमकी देण्यात आली होती. 2016 मध्ये आलेल्या या ट्वीटमागच्या गुन्हेगाराचा अजूनही छडा लागलेला नाही.

बीबीसीशी बोलताना नीता कोल्हटकर सांगतात "ट्विटर पूर्णपणे बायस्ड आहे. ते सरकारच्या कलानं वागतात. पोलिसांनी सर्व माहिती देऊनही ट्विटर इंडिया धमकीचं ट्वीट करणाऱ्याची माहिती देत नाही आहेत. पोलिसांनी माहिती दिली नसल्याचं ते सांगतात. मला पोलिसांवर विश्वास ठेवावाच लागेल."

"संघ आणि इतर लोकांना थ्रेट ट्वीट आले तर लगेच माहिती दिली जाते. माझ्या प्रकरणात वेगळा न्याय का?" त्या विचारतात.

याच दरम्यान ट्विटर सेफ्टीच्या अधिकृत हॅण्डलवरून रोझ यांच्या ट्वीट बद्दल एक अपडेट देण्यात आला.

X पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 4

"आम्ही रोझ मॅकगोवन यांच्या टीमच्या संपर्कात आहोत. त्यांनी त्यांच्या हॅण्डलवरून खाजगी नंबर ट्विट केला म्हणून आम्ही त्यांचं हॅण्डल तात्पुरतं लॉक केलं होतं, हे आम्ही स्पष्ट केलं होतं. हे आमच्या धोरणांच्या विरूद्ध होतं."

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)