ऑनलाईन की दुकानात? यंदाची दिवाळी खरेदी कुठे?

दिवाळी काही दिवसांवर आली आहे. बाजारात खरेदीचा उत्साह ओसंडून वाहात आहे. गेल्या काही वर्षात ऑनलाईन खरेदीने चांगलाच जोर पकडला आहे.

या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने त्यांच्या वाचकंना विचारलं की यंदाची खरेदी कुठे करणार? त्याला नेहमीप्रमाणेच वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

ऑनलाईन खरेदी लोकप्रिय होत असली तरी अनेक जणांचा पारंपरिक दुकांनामध्ये खरेदी करण्याकडे कल आहे. माधुरी के. एल. म्हणतात की, "खरेदी दुकानातच करण्यात मजा आहे."

कविता कोळींचं मात्र जरा वेगळं मत आहे. "जिथे चांगल्या वस्तू मिळणार तिथे मी खरेदी करणार", असं त्या म्हणतात.

सुबोध पांचाळ म्हणतात की, ते खरेदी दुकानातूच करणार आहेत कारण तिथे सगळं पारखून घेता येतं. "आजकाल ऑनलाईन शॉपिंग करताना फसवणूक झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यापेक्षा दुकानातूनच खरेदी करणं योग्य."

राहुल गडकरांनी तर कोल्हापुरातल्या महाद्वार रोडवर खरेदी करण्याचा प्लॅन पक्का केला आहे.

"यंदाची खरेदी कुठेच नाही, कारण बोनसच झाला नाही," असं चंद्रशेखर डोके सांगतात. वैभव थोरात तर खरेदी स्वप्नात करणार आहेत.

अद्वैत अष्टेकर जिथे स्वस्त मिळेल तिथे खरेदी करणार आहेत.

थोडक्यात, ऑनलाईन खरेदीला लोकांची ना नाही. पण अजूनही दिवाळीची खरेदी दुकानात गेल्याशिवाय पूर्ण होत नाही, असंच या चर्चेतून दिसतं.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)