विजय माल्ल्या असे झाले 'किंग ऑफ बॅड टाइम्स'

फोटो स्रोत, Reuters
- Author, इमरान कुरेशी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
आयुष्यभर माल्ल्यांनी मद्य उद्योगाव्यतिरिक्त इतरही उद्योगांमध्ये गुंतवणूक करत ते आपल्या पंखाखाली आणले. कारण त्यांना आपली 'मद्यसम्राट' ही ओळख बदलून मोठा उद्योगपती ही ओळख निर्माण करायची होती.
मद्य व्यवसाय हा माल्ल्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. व्यवस्थापन शिक्षण देणाऱ्या देशातल्या प्रतिष्ठित शिक्षण संस्थांमधून बाहेर पडलेल्यांना त्यांनी त्याच्या कंपनीत स्थान देत व्यवसायाला कॉर्पोरेट लूक दिला.
मात्र, एका झटक्यात नवी कंपनी खरेदी करण्याची त्यांना सवय लागली. तसंच, असे व्यवहार करताना लेखी नोंदी न करण्याचे निर्णयही त्यांनी घेतले. यामुळेच त्याची ही अवस्था झाली.

फोटो स्रोत, AFP Getty
के. गिरीप्रकाश यांनी विजय माल्ल्यावर 'द विजय माल्ल्या स्टोरी' हे पुस्तक लिहिलं आहे.
गिरीप्रकाश यांनी बीबीसीशी याबाबत बोलताना सांगितलं की, "भारतात मद्य व्यवसायाकडे चांगल्या नजरेतून पाहिलं जात नाही. आपल्याकडे लोकांनी मद्य व्यावसायिक म्हणून नव्हे तर एक मोठा उद्योगपती म्हणून पहावं अशी त्यांची इच्छा होती."
गिरीप्रकाश पुढे म्हणाले, "मद्य व्यवसायिकाच्या ओळखीपासून त्यांना दूर जायचं होतं. म्हणून त्यांनी इंजिनिअरिंग, टेलिव्हिजन आणि चार्टर विमान सेवा अशा विविध क्षेत्रात गुंतवणूक केली."
मद्य व्यवसायात 40 ते 45 टक्के नफा होतो. म्हणून माल्ल्यानं किंगफिशर एअरलाईन्स ही विमान सेवा पुरवणारी कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या व्यवसायात पैसे कमवणं अवघड बाब आहे.
यात जरी फायदा झाला तरी तो केवळ एक किंवा दोन टक्केच होतो.

गिरीप्रकाश यांनी माल्ल्याच्या विमान कंपनीबद्दल बोलताना सांगितलं की, "माल्ल्यांची विमान कंपनी सुरू झाल्यावर त्यांनी पैशाची अक्षरशः उधळपट्टी करण्यास सुरुवात केली."
"एखाद्या प्रवाशाचं विमान चुकल्यास माल्ल्या त्याला इच्छित स्थळी दुसऱ्या विमान कंपनीनं पाठवत असत. माल्ल्यांना वाटत होतं की लोक त्यांच्या विमान कंपनीचे भक्त होतील."
"प्रवाशांसाठी त्यांनी परदेशातील मोठी मासिकं मागवली. पण, ती गोदामात धूळ खातच पडली होती. अशा व्यवहारांमुळे कंपनीच्या नफ्यावर त्याचा मोठा परिणाम झाला.''
किंगफिशर विमान कंपनी ही एसबीआय कॅपिटल मार्केट आणि आंतरराष्ट्रीय विमान कंपनीच्या सल्ल्यानंतर स्थापन केली होती. हे स्पष्टीकरण माल्ल्या नेहमी देत असत.
माल्ल्यांनी एकदा सांगितलं की, ''मी स्वतःसाठी कोणतंही कर्ज घेतलेलं नाही. त्यामुळे मी डिफॉल्टर नाही''

फोटो स्रोत, Getty Images
बेंगळूरुच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स स्टडीजचे प्राध्यापक नरेंद्र पाणी यांनी याविषयी माहिती देताना सांगितलं की, ''बहुतेक सारी कर्ज ही कंपनीला डोळ्यासमोर ठेऊन घेतली जातात."
"कंपन्या कर्ज फेडण्यात जरी अयशस्वी ठरल्या तरी मालकांची स्थिती ही चांगली राहते. पण याचा फटका संपूर्ण व्यवस्थेला बसतो.''
पाणी पुढे सांगतात, "सध्याच्या व्यवस्थेत दोन प्रकारच्या लोकांमध्ये फरक करता येत नाही. पहिले जे की पैसे घेऊन पळून जातात आणि दुसरा ज्याचा व्यवसाय नफा कमवू शकला नाही. विजय माल्ल्या या समस्येचं प्रतिक बनले आहे."
किंगफिशर एअरलाईन कंपनीला आंतरराष्ट्रीय कंपनी म्हणून मान्यता मिळण्यासाठी माल्ल्यानं कॅप्टन गोपीनाथ यांची एअर डेक्कन कंपनी विकत घेतली होती.

फोटो स्रोत, OTHER
गिरिप्रकाशनी यावर एक मजेशीर किस्सा सांगितला, "आपल्या यॉटवरून माल्ल्या यांनी गोपनीथ यांना फोन केला की मला एअर डेक्कन कंपनी विकत घ्यायची आहे. गोपीनाथ यांनी सांगितल की या व्यवहाराचे एक हजार कोटी रूपये होतील."
"माल्ल्यांनी एअर डेक्कनची बॅलंस शीट न पाहता त्यांना तत्काळ डिमांड ड्राफ्ट पाठवून दिला."
हे नक्की वाचा :
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








