सत्येंद्र जैनः ‘आम’ आदमीच्या मंत्र्याला तुरुंगात ‘खास’ सेवा, दिल्लीत गोंधळ

सत्येंद्र जैन
फोटो कॅप्शन, सत्येंद्र जैन

दिल्ली सरकारमधील मंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र जैन यांना तिहार जेलमध्ये मसाजसेवा मिळत असल्याचा व्हीडिओ सोशल मीडियात प्रसारित झाला आहे. 

जैन यांना मनी लाँन्ड्रिंगच्या प्रकरणात ई़डीने 30 मे रोजी अटक केलं होतं. 

तिहार जेलमध्ये सत्येंद्र जैन यांच्या खोलीच्या सीसीटीव्ही चित्रिकरणात ते एका खाटेवर झोपून कागदपत्रं पाहात असल्याचं आणि एक माणूस मालिश करत असल्याचं दिसतं. 

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 1

विशेष म्हणजे याच आठवड्यात सत्येंद्र जैन यांना व्हीआय़पी वागणूक दिल्याबद्दल तिहारच्या तुरुंग अधीक्षकांना निलंबित करण्यात आलेलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 2

 सत्येंद्र जैन यांचा व्हीडिओ प्रसिद्ध झाल्यावर भाजपाने आम आदमीवर जोरदार टीका सुरू केली आहे. तर ते आजारी असून डॉक्टरांनी त्यांना फिजिओथेरपीचा सल्ला दिला होता असा बचाव आम आदमी पक्षाने केला आहे. 

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 3

आम आदमी पक्षाने तिहार जेलचा मसाज पार्लर करुन टाकलाय अशी टीका भाजपा आयटीसेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी केली आहे. 

ते ट्वीटमध्ये लिहितात, “अरविंद केजरीवालांनी तिहारचं मसाज पार्लरमध्ये रुपांतर केलंय. त्यांचे जेलमध्ये बंदी असलेल्या मंत्री सत्येंद्र जैन यांना मसाज करणारा माणूसही मिळतो. तो सर्व नियमांचे उल्लंघन करुन दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या जवळचे असल्याने एका कैद्याची सेवा करतो. दिल्ली सरकार तिहार जेलची व्यवस्था पाहाते. हे लोक राजकारणातला भ्रष्टाचार संपवायला आले होते.” 

X पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 4

भाजपाचे प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी ट्वीट मध्ये म्हटलंय, “सजा मिळण्याऐवजी सत्येंद्र जैन यांना व्हीव्हीआय़पी मजा मिळत आहे. तिहार जेलमध्ये मसाज. हवालाबाज व्यक्तीला पाच महिने जामीन मिळाला नाही पण तिला हेड मसाज मिळतोय. आम आदमी पक्ष तुरुंगाचे नियम तोडत आहे. याप्रकारे आपल्या पदाचा वसुली आणि मसाजसाठी दुरुपयोग होत आहे. केजरीवाल यांना धन्यवाद.” 

X पोस्टवरून पुढे जा, 5
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 5

काँग्रेस नेते म्हणाले हे 'आपचे ठग' 

भाजपापाठोपाठ काँग्रेसनेही आम आदमी पक्षावर टीका केली आहे. 

काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनीही सत्येंद्र जैन यांच्या व्हीडिओवर प्रश्न उपस्थित केला आहे. "आप चे ठग दिल्लीच्या तिहार तुरुंगात व्हीव्हीआयपी उपचार आणि सुविधांचा गैरफायदा घेत आहेत.", असं ट्वीट त्यांनी केलं आहे. 

X पोस्टवरून पुढे जा, 6
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 6

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

दुसर्‍या ट्वीटमध्येे अलका लांबा यांनी व्हीडिओ प्रसिद्ध करत आम आदमी पार्टीवर गंभीर आरोप केले आहेत. सत्येंद्र जैन यांना कारागृहात पंचतारांकित सुविधांचा लाभ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. केजरीवालांवर निशाणा साधत त्यांनी सत्येंद्र जैन यांना तातडीने मंत्रिपदावरून हटवावे, असे म्हटले आहे.

 मनिष सिसोदियांनी मांडली बाजू आम आदमी पक्षावर चौफेर टीका सुरू झाल्यावर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी आम आदमी पक्षाची बाजू मांडली आहे. ते म्हणाले, "पंतप्रधान असोत किंवा तुरुंगातील व्यक्ती, कोणीही आजारी असू शकतो. कोणालाही उपचाराची गरज भासू शकते, पण कोणाच्या आजारावर असे राजकारण करणे हे भाजपचे अत्यंत खालच्या दर्जाचे कृत्य आहे." 

मनीष सिसोदिया यांनी सांगितले की, सत्येंद्र जैन तुरुंगात असताना पडले होते, त्यामुळे त्यांच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाली होती. त्यंाना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. ऑपरेशननंतर नर्व्ह ब्लॉक टाकण्यात आला असून त्यांना नियमित फिजिओथेरपीची गरज असल्याचे डॉक्टरांनी अहवालात लिहिले आहे. 

X पोस्टवरून पुढे जा, 7
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 7

सिसोदिया म्हणाले, "भाजप एमसीडी आणि गुजरातमध्ये निवडणुकांत पराभूत होणार आहे, त्यामुळे सत्येंद्र जैन यांच्या आजारपणाची खिल्ली उडवून त्यांना निवडणुका जिंकायच्या आहेत. यापेक्षा वाईट काहीही होऊ शकत नाही. भाजपकडून अशी अपेक्षा करता येणार नाही. आधी सत्येंद्र जैन यांच्यावर खोटे गुन्हे दाखल झाले." आणि तुरुंगात टाका. तुम्ही जबरदस्तीने त्याला तुरुंगात डांबत आहात. सर्व हातकड्या निकामी झाल्या असताना आता उपचाराचे व्हीडिओ व्हायरल होत आहेत.”

अरविंद केजरीवाल आणि सत्येंद्र जैन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अरविंद केजरीवाल आणि सत्येंद्र जैन

ईडीचे आरोप 

गेल्या सुनावणीत, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एसव्ही राजू, कोर्टात ईडी तर्फे बाजू मांडताना, सत्येंद्र जैन यांना तुरुंगात विशेष सुविधा मिळत असल्याचा आरोप केला होता.

 राजू यांनी कोर्टात सांगितले होते की, " काही अज्ञात लोक जैन यांच्या पायाला मसाज करताना दिसले होते. भेटण्याची निश्चित वेळ नसताना ते त्यावेळी दिसले होते. त्यांना खास जेवणही देण्यात आले होते."

 ईडीच्या वकिलांनी सत्येंद्र जैन यांचे काही व्हीडिओही कोर्टात शेअर केले होते. 

भाजपने हे व्हीडिओओ ईडीकडून घेतल्यानंतर प्रसारित केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.

हे वाचलंत का ?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)