पुणे महानगरपालिका मतदार यादीत 3 लाख दुबार मतदार, पण 'या' कारणामुळे नावं होणार नाही डिलीट
पुणे महानगरपालिका मतदार यादीत 3 लाख दुबार मतदार, पण 'या' कारणामुळे नावं होणार नाही डिलीट
पुणे मनपाची निवडणूक अजून जाहीर झाली नसली तरी मतदारयाद्यांवरून वातावरण चांगलंच तापलेलं दिसतंय.
मतदारयादीत 3 लाख दुबार मतदार असल्याचं खुद्द जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितलं.
या लोकांनी दोन वेळा मतदान करू नये यासाठी पावलं उचलली जातील, पण ही नावं डिलीट करता येणार नसल्याचंही ते म्हणाले.
याबाबत विरोधी पक्ष तसंच माजी प्रशासकीय अधिकारी काय म्हणतात? प्राची कुलकर्णी यांचा रिपोर्ट.
टीप : नवल किशोर राम पुणे मनपा आयुक्त आहेत, त्यांचा उल्लेख नजरचुकीने जिल्हाधिकारी झाला आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






