You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची चौथी यादी जाहीर, काटोलमधून अनिल देशमुखांचे पुत्र सलील यांना उमेदवारी
राष्ट्रावादी शरद पवार गटाची 7 उमेदवारांची चौथी यादी जाहीर करण्यात आलीय. यामध्ये काटोल मतदारसंघातून माजी मंत्री अनिल देशमुख यांच्याऐवजी मुलगा सलील देशमुख यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
तर दौंडमधून रमेश थोरात, माणमधून प्रभाकर धार्गेंना उमेदवारी यांचे नाव घोषित करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटानं यापूर्वी 22, 45 आणि 9 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. तर आता 7 जणांच्या नावाची यादी दिली आहे. चारही याद्या मिळून आतापर्यंत 83 जणांची नावं जाहीर करण्यात आली असून यात 12 महिला उमेदवारांचा समावेश आहे.
काटोल मतदारसंघात अनिल देशमुखांचं प्रस्थ आहे. पक्षानं त्यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, त्यांनी यावेळी मुलगा सलील यांना रिंगणात उतरवले आहे.
सलील देशमुख आज (28 ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज दाखल करणार होते. देशमुख पिता-पुत्र जोरदार शक्तिप्रदर्शन करत रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल करायला निघाले होते. मात्र, दोन मिनटांचा उशीर झाल्याने त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही.
त्यामुळे सलील देशमुख उद्या मंगळवारी (29 ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे.
पुसदमध्ये इंद्रनील नाईक विरुद्ध शरद मैंद
गेल्या पाच वर्षांत राज्यातील राजकीय समीकरणं बदलल्याचा परिणाम या मतदारसंघावरही झाला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर नाईक कुटुंबातही फूट पडली. सध्या मनोहरराव नाईकांचा एक मुलगा आमदार इंद्रनील नाईक अजित पवारांसोबत तर त्यांचा मोठा मुलगा ययाती नाईक शरद पवारांसोबत आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी पुसद मतदारसंघातून ययाती नाईक यांच्या नावाची चर्चा होती. नाईक कुटुंबातील ययाती आणि इंद्रनील या दोन्ही भावांत विधानसभेची खडाजंगी होणार का? याकडे लोकांचे लक्ष लागून होते. परंतु, पवारांनी ययाती नाईकऐवजी पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
शरद मैंद हे सलग पाचवेळा या बँकेचे अध्यक्ष राहिले आहेत. बँकेच्या माध्यमातून चांगलं नेटवर्क उभारलं असून कार्यकर्त्यांचंही त्यांना प्रबळ पाठबळ आहे. त्यामुळे ते इंद्रनील नाईक यांना टक्कर देऊ शकतात असं ज्येष्ठ पत्रकर श्री. जी. चव्हाण सांगतात.
अजित पवार गटाचे उमेदवार इंद्रनील नाईक हे विद्यमान आमदार आहेत. त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची चांगली फळी आहे. सोबतच त्यांना वडील मनोहरराव नाईक यांचीही साथ असल्याचंही सांगितलं जातं. त्यामुळं आता पुसदमध्ये इंद्रनील नाईक विरुद्ध शरद मैंद असा सामना पाहायला मिळेल.
उमेदवारांची चौथी यादी
- माण – प्रभाकर धार्गे
- काटोल – सलील देशमुख
- खानापूर – वैभव पाटील
- वाई – अरुणादेवी पिसाळ
- दौंड – रमेश थोरात
- पुसद – शरद मैंद
- सिंदखेडा – संदीप बेडसे
स्वरा भास्कर यांचे पती फहाद यांना उमेदवारी
राष्ट्रावादी काँग्रेस शरद पवार गटानं तिसऱ्या यादीत अभिनेत्री स्वरा भास्कर यांचे पती फहाद अहमद यांना अणुशक्तीनगरमधून उमेदवारी जाहीर केली आहे. फहाद अहमद हे समाजवादी पक्षाचे नेते आहेत.
त्यांना ANI ने विचारले की तुम्ही शरद पवार यांच्या गटाच्या पक्ष चिन्हावर निवडणूक लढवणार आहात का, "त्यावर त्यांनी उत्तर दिले की शरद पवार यांनी मला उमेदवारी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा एकच आहे. तेव्हा मी दोन्ही नेत्यांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेईल."
थोड्या वेळानंतर फहाद अहमद यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेतली आणि त्यांच्या गळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उपरणे होते.
त्यांना पत्रकारांनी पुन्हा विचारले की तुम्ही राष्ट्रवादीकडूनच लढणार आहात का, त्यावेळी फहाद अहमद म्हणाले, मी कोणत्या चिन्हावरुन लढतोय हा प्रश्न नाहीये. दोन्ही पक्षांची विचारधारा ही राज्यघटनेशी बांधिलकी असलेलीच आहे.
फहाद अहमद यांच्याविरोधात अजित पवार गटाच्या सना मलिक रिंगणात असतील. सना मलिक या नवाब मलिक यांच्या कन्या आहेत.
याआधी दुसऱ्या यादीत परांडा मतदारसंघातून राहुल मोटे यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. तर, खडकवासला मतदासंघातून सचिन दोडके यांचे नाव जाहीर करण्यात आले असून पर्वती मतदारसंघातून अश्विनी कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
बारामतीत पवार विरुद्ध पवार
पहिल्या यादीतबारामतीमध्ये युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यांची लढत थेट अजित पवार यांच्याशी होणार आहे. कागलमध्ये हसन मुश्रीफ यांच्याविरोधात समरजितसिंह घाटगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
हडपसरमध्ये महाविकास आघाडीमध्ये कोणताही वाद नाही असं सांगत जयंत पाटील यांनी हडपसरमधून प्रशांत जगताप यांची उमेदवारी जाहीर केली. आमच्या बहुतेक जागांवर एकमत झालेलं आहे, उमेदवार ठरलेले आहेत असं त्यांनी सांगितलं.
युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार यांच्यात बारामती मतदारसंघात लढत होत असल्यामुळे ही लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे. युगेंद्र पवार हे अजित पवारांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत. म्हणजेच युगेंद्र पवार आणि अजित पवार हे काका पुतणे आहेत.
लोकसभा निवडणुकीवेळी युगेंद्र पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात त्यांची आत्या म्हणजेच सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचार केला होता. त्यावेळी युगेंद्र पवार यांचे सुप्रिया सुळेंनी कौतुक करताना म्हटले होते की युगेंद्र हे उच्चविद्याविभूषित आहेत.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने अहेरी मतदारसंघातून धर्मरावबाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांना तिकीट दिले आहे. इथे वडील आणि लेकीत ही लढत होणार आहे.
कर्जत-जामखेडमधून रोहित पवारांना उमेदवारी देण्यात आली आहे.
उमेदवारांची तिसरी यादी
- कारंजा - ज्ञायक पटणी
- हिंगणघाट - अतुल वांदिले
- हिंगणा - रमेश बंग
- अणुशक्तीनगर - फहाद अहमद
- चिंचवड - राहुल कलाटे
- भोसरी - अजित गव्हाणे
- माझलगाव - मोहन बाजीराव जगताप
- परळी - राजेसाहेब देशमुख
- मोहोळ - सिद्धी रमेश कदम
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) ची दुसरी यादी
- एरंडोल - सतीश अण्णा पाटील
- गंगापूर - सतीश चव्हाण
- शहापूर - पांडुरंग बरोरा
- परांडा - राहुल मोटे
- बीड - संदीप क्षीरसागर
- आर्वी - मयुरा काळे
- बागलान - दीपिका चव्हाण
- येवला - माणिकराव शिंदे
- सिन्नर - उदय सांगळे
- दिंडोरी - सुनीता चारोस्कर
- नाशिक - पूर्व गणेश गीते
- उल्हासनगर - ओमी कलानी
- जुन्नर - सत्यशील शेरकर
- पिंपरी - सुलक्षणा शीलवंत
- खडकवासला - सचिन दोडके
- पर्वती - अश्विनीताई कदम
- अकोले - अमित भांगरे
- अहिल्या नगर शहर - अभिषेक कळमकर
- माळशिरस - उत्तमराव जानकर
- फलटण - दीपक चव्हाण
- चंदगड - नंदिनीताई भाबुळकर कुपेकर
- इचलकरंजी - मदन कारंडे
उमेदवारांची पहिली यादी
- इस्लामपूर - जयंत पाटील
- काटोल - अनिल देशमुख
- राजेश टोपे - घनसावंगी
- बाळासाहेब पाटील - कराड उत्तर
- जितेंद्र आव्हाड - कळवा मुंब्रा
- कोरेगाव - शशिकांत शिंदे
- जयप्रकाश दांडेगावकर - वसमत
- गुलाबराव देवकर - जळगाव ग्रामीण
- हर्षवर्धन पाटील - इंदापूर
- प्राजक्त तनपुरे - राहुरी
- अशोक पवार - शिरूर
- मानसिंग नाईक - शिराळा
- सुनिल भुसारा - विक्रमगड
- रोहित पवार - कर्जत जामखेड
- रोहित पाटील - तासगाव
- विनायक पाटील - अहमपूर
- राजेंद्र शिंगणे - शिंदखेड राजा
- सुधाकर भालेराव - उदगीर.
- चंद्रकांत दानवे - भोकरदन
- चरण वाघमारे - तुमसर
- प्रदीप नाईक - किनवट
- विजय भांबळे - जिंतूर
- संदीप नाईक - बेलापूर
- बापु साहेब पठारे - वडगाव शेरी
- दिलीप खोडपे - जामनेर
- रोहिणी खडसे - मुक्ताईनगर
- सम्राट डोंगरदिवे - मुर्तीजापूर
- दुनेश्वर पेठे - नागपूर
- तिरोडा - रविकांत बोपचे
- भाग्यश्री आत्राम - आहेरी
- रुपकुमार बब्लू चौधरी - बदनापूर
- राखी जाधव - घाटकोपर पूर्व
- देवदत्त निकम - अंबेगाव
- युगेंद्र पवार - बारामती
- संदिप वर्पे - कोपरगाव
- प्रताप ढाकणे - शेवगाव
- राणी लंके - पारनेर
- नारायण पाटील - करमाळा
- महेश कोठे - सोलापूर उत्तर
- समरजितसिंह घाटगे - कागल
- प्रशांत यादव - चिपळूण
- प्रशांत जगताप - हडपसर
- पृथ्वीराज साठे - केज
- मेहबूब शेख - आष्टी
- मानसिंग नाईक - शिराळा
- सुभाष पवार - मुरबाड
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)