नेपाळ विमान दुर्घटना : 68 मृतदेह बाहेर काढले, दुर्घटनेच्या चौकशीसाठी समिती

नेपाळ विमान दुर्घटना

फोटो स्रोत, KRISHNAMANI BARAL

नेपाळमध्ये विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 68 मृतदेह हाती लागल्याची माहिती बचावकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

येती एअरलाईन्सचं हे विमान नेपाळची राजधानी काठमांडूहून पोखरा इथे जात होतं. विमान उतरत असताना कोसळलं आणि त्याला आग लागली.

नेपाळी लष्कराचे प्रवक्ते रती कृष्ण प्रसाद भंडारी यांनी सांगितले की, “सुरुवातीला असं वाटलं होतं की, बाहेर काढण्यात आलेल्यांपैकी काहीजण जिवंत असतील. पण आम्हाला कोणी जखमी मिळाला नाहीये.”

त्यांनी सांगितलं की, "पोखरा विमानतळापासून दीड किलोमीटर अंतरावर सेती नदीजवळ विमान एका खोल दरीत कोसळलं. 120 रेंजर्स आणि सुमारे 180 जवान मदतकार्यासाठी तैनात आहेत. विमानाला आग लागली, ती विझवण्याचे प्रयत्न सुरू केले गेले."

विमानाने काठमांडूहून सकाळी 10.32 वाजता उड्डाण केलं. सकाळी 10.50 वाजता विमानाशी शेवटचा संपर्क झाला. लँडिंग दरम्यान विमान कोसळलं.

विमान अपघात

फोटो स्रोत, FACEBOOK/NEPAL PRESS

नेपाळ लष्कराच्या तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अपघातग्रस्त विमानातील प्रवाशांची सुटका करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं.

अपघातात विमानाचे तुकडे झाल्याचंही नेपाळ लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितलं.

नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहाल यांनी मंत्रिमंडळाची आपत्कालीन बैठक बोलावली असून, आपत्कालीन यंत्रणांना घटनास्थळी रवाना केलं.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

जुना विमानतळ आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ यादरम्यान रनवेवर हे विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याची प्राथमिक माहिती येती एअरलाईन्सच्या सुदर्शन बारतौली यांनी दिल्याचं 'काठमांडू पोस्ट'ने म्हटलं आहे.

विमान अपघातात सापडलेल्या प्रवाशांची सुटका करण्यासाठीचे प्रयत्न सुरू असून तूर्तास विमानतळाहून अन्य विमानांची वाहतूक स्थगित करण्यात आली आहे.

नेपाळ

विमानात 5 भारतीय प्रवासी

नेपाळच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाचे प्रवक्ते जगन्नाथ निरुला यांनी सांगितलं की, प्रवाशांमध्ये नेपाळमधील 53 आणि भारतातील 5 जणांचा समावेश आहे.

याशिवाय रशियाचे चार, कोरियाचे दोन, आयर्लंड, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्सचे प्रत्येकी एक प्रवासी होते.

बचाव पथक अपघातस्थळी पोहोचल्याचे निरुला यांनी सांगितलं. ते म्हणाले, "आता आम्ही अधिक माहिती गोळा करत आहोत, बचाव कार्य वेगाने सुरू आहे."

नेपाळ

फोटो स्रोत, Getty Images

सोशल मीडियावर आलेल्या व्हीडिओत हे विमान दाटीवाटीच्या प्रदेशात अतिशय खालून जात असल्याचं दिसत आहे. त्यानंतर ते विमान फिरुन कोसळताना दिसत आहे.

नेपाळ लष्कराचे 200 सैनिक घटनास्थळी कार्यरत असून, अपघातात अडकलेल्यांची सुटका करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

विमान दुर्घटनाग्रस्त झालं त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात काळा धूर पसरला आहे आणि प्रचंड डेबरिसही दिसत आहे.

या विमानात विदेशी नागरिक असल्याचं लक्षात घेऊन हेल्पलाईन क्रमांक देण्यात येत आहेत.

काठमांडू- दिवाकर शर्मा (977-985117021)

पोखरा- लेफ्टनंट कर्नल शशांक त्रिपाठी (977-9856037699)

दरम्यान नेपाळमधील भारतीय दूतावास स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात असून परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

नेपाळमध्ये विमान उड्डाण कठीण का आहे?

हिमालयातला देश असलेल्या नेपाळमध्ये हवाई वाहतूक नेहमीच आव्हानात्मक असते. इथला लुकला विमानतळ जगातल्या सर्वांत धोकादायक विमानतळापैंकी एक मानला जातो. याआधीही नेपाळच्या पर्वतराजींत मोठे अपघात झाले होते.

गेल्या वर्षी म्हणजे 2022 साली मे महिन्यात तारा एअरच्या विमानाला झालेल्या अपघातात ठाण्यातील वैभवी बांदेकर त्यांची दोन मुलं आणि विभक्त पती यांचा मृत्यू झाला होता.

2018 साली यूएस-बांग्ला एयरलाईनच्या विमानानं काठमांडूमध्ये उतरताच पेट घेतला होता आणि त्या अपघातात 51 जणांचा मृत्यू झाला होता.

1992 साली पाकिस्तान इंटरनॅशनल एयरलाईन्सच्या विमानाची एका पर्वतशिखराशी टक्कर झाली होती आणि विमानातील सर्व 167 जणांचा मृत्यू झाला होता.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)