कझाकस्तान विमान अपघात प्रकरणी पुतिन यांनी रशियाची चूक मान्य न करता मागितली माफी

फोटो स्रोत, EPA
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियाच्या हवाई हद्दीत एक व्यावसायिक विमान पाडल्याच्या घटनेसाठी शेजारी देश अझरबैजानच्या राष्ट्राध्यक्षांची माफी मागितली आहे. या घटनेत 38 जणांचा मृत्यू झाला होता. मात्र यासाठी रशिया जबाबदार असल्याचं पुतिन म्हणाले नाहीत.
ख्रिसमसच्या दिवशी झालेल्या या दुर्घटनेबाबत पुतिन म्हणाले की, रशियाच्या हवाई संरक्षण यंत्रणा युक्रेनचे ड्रोन परतवून लावत असताना ही 'दुःखद घटना' घडली.
हे विमान चेचन्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न करत असताना त्यावर रशियाच्या हवाई संरक्षण दलानं हल्ला केल्याचं सांगण्यात येत होतं. त्यामुळं विमानाला कॅस्पिनयन सागराकडं वळावं लागलं होतं.
या विमानाला कझाकिस्तानमध्ये अपघात झाला, त्यात असलेल्या 67 लोकांपैकी 38 जणांचा मृत्यू झाला होता.
25 डिसेंबरला एम्ब्रेयर विमानाला अकताऊ विमानतळावरील धावपट्टीपासून 3 किमी अंतरावर कोसळून आग लागली आणि या अपघातात 38 जणांचा मृत्यू झाला गोता.
यानंतर आता अझरबैजान एअरलाइन्सनं या अपघाताला बाह्य तांत्रिक हस्तक्षेप जबाबदार आहे असं म्हटलं होतं. विशेष म्हणजे या विमानानं सुरुवातीला दक्षिण रशियातील ग्रोझनी विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न केला होता.
रशियाच्या नागरी हवाई वाहतूक संस्थेच्या प्रमुखांनी शुक्रवारी सांगितलं होतं की, चेचेन्याच्या राजधानीतील परिस्थिती अत्यंत गुंतागुंतीची आहे. येथील हवाई क्षेत्र बंद करण्यात आलं आहे.
या विमान अपघातानंतर अझरबैजान एअरलाइन्सनं रशियाच्या 7 शहरांची उड्डाणं स्थगित केली आहेत.
युक्रेनच्या गुप्तचर संचालनालयाच्या प्रमुखानेही या विमान अपघातासाठी रशियाला जबाबदार धरलं आहे.


रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांना या आरोपांबद्दल विचारण्यात आले.
यावर दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले, "या विमान अपघाताची चौकशी चालू आहे आणि जोपर्यंत तपासाच्या निकालातून काही निष्कर्ष निघत नाही, तोपर्यंत आम्ही त्यावर बोलण्यास अक्षम आहोत. चौकशी पूर्ण होईपर्यंत आम्ही त्यावर काहीही भाष्य करणार नाही."

फोटो स्रोत, Getty Images
दरम्यान, कझाकस्तानमध्ये अकतऊ भागाजवळ 67 प्रवाशांना घेऊन जाणारे प्रवासी विमान कोसळले असल्याची प्राथमिक माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली.
हे विमान अझरबैजान एरलाईन्सचे होते. हे विमान कोसळल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या आपत्कालीन मदत सेवा पुरवणाऱ्यांना या विमानाला आग लागली असल्याचं आढळून आलं.
स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या ही आग विझवण्यात आली.
या दुर्घटनेतील काही प्रवाशांचा जीव वाचला असण्याची शक्यता आहे, असं कझाकस्तानच्या इमर्जन्सी मिनिस्ट्रीने सांगितलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











