विरारमध्ये इमारत कोसळून पहिल्याच वाढदिवशी चिमुकलीचा आईवडिलांसह मृत्यू झाला
विरारमध्ये इमारत कोसळून पहिल्याच वाढदिवशी चिमुकलीचा आईवडिलांसह मृत्यू झाला
विरारमधील विजय नगर येथील रमाबाई अपार्टमेंट चार मजली इमारत होती. 26 ऑगस्टला संध्याकाळी इथेच उत्कर्षाचा पहिला वाढदिवस साजरा होत होता.
पण यानंतर काही तासातच मध्यरात्रीच्या सुमारास या अपार्टमेंटची एक बाजू अवघ्या काही सेकंदात कोसळली. यात एक वर्षाच्या उत्कर्षासह तिच्या आई वडिलांचाही मृत्यू झालाय.
तसंच 35 तासांहून अधिक काळ रेस्क्यू ऑपरेशन केल्यानंतर या दुर्घटनेत आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. तर 9 जण जखमी झालेत.
या मृत्यूस जबाबदार कोण? प्रशासनाने यावर काय म्हटलंय? आणि ज्यांनी त्यांचं सारंकाही गमावलं, ते काय म्हणतायत?
रिपोर्ट - दीपाली जगताप
शूट - शरद बढे
एडिट - अरविंद पारेकर
(बीबीसी मराठीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






