मायग्रेनवर उपचार म्हणून एकेकाळी डोक्याला छिद्र पाडत असत

मायग्रेन
    • Author, लॉरेन शार्के
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

साधारणपणे पाच महिलांपैकी एकीला मायग्रेनचा त्रास होतो. वर्षानुवर्षं त्रास झाल्यामुळे पंगुत्व आणणाऱ्या आजारांमध्ये मायग्रेनचा जगात दुसरा क्रमांक आहे. मात्र या रोगावर अद्याप म्हणावं तसं संशोधन झालेलं नाही.

मला पहिल्यांदा मायग्रेनचा त्रास शाळेत असताना झाला. आधी मला हलकी डोकेदुखी झाली, मग एका बाजूला व्हायला डोकं दुखायला लागलं, माझ्या डोळ्यासमोर ओकारी आली. या चक्राचा मी आयुष्यात अनेकदा अनुभव आला. त्यामुळे मला नोकरी सोडावी लागली आणि मला हतबल वाटलं.

मायग्रेनचा अटॅक फक्त डोकेदुखी म्हणून सोडून देण्यात येतं. साधी डोकेदुखी एखाद दुसऱ्या पॅरासिटामॉलने थांबते. मात्र मायग्रेनची डोकेदुखी तीव्र असते.

ती का होते याचं अद्याप उत्तर मिळालेलं नाही. (हार्मोन आणि मेंदूच्या क्रियेत बिघाड हीच दोन कारणं दिली जातात.)

मायग्रेन

फोटो स्रोत, Getty Images

1990 ते 2016 या काळात 195 देशात एक सर्वेक्षण करण्यात आलं. त्यात असं लक्षात आलं की मायग्रेन हा जगातल्या दुसऱ्या क्रमाकांचा असा आजार आहे ज्याचा वर्षानुवर्षं त्रास होतो आणि त्यामुळे पंगुत्व येतं. या आजारावर प्रचंड खर्च येतो.

युकेमध्ये 2.5 कोटी दिवस आजाराची सुटी दिवस म्हणून गणले जातात.

ICMR ने प्रकाशित केलेल्या एका माहितीनुसार 2019 मध्ये भारतात 21.3 कोटी लोकांना मायग्रेनचा त्रास होतो. त्यात साठ टक्के महिलांचा समावेश आहे. मात्र आरोग्य आणि आर्थिक पातळीवर विचार केला तर मायग्रेनशी निगडीत संशोधनाला अतिशय कमी निधी मिळाला आहे.

बायकांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो

हा आजार बायकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतो. पाचपैकी एका स्त्रीला तर पंधरापैकी एका पुरुषाला हा आजार होतो. हा आजार का होतो याची कारण अद्याप अस्पष्ट आहेत.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

अरिझोना विद्यापीठाने 2018 मध्ये प्रकाशित केलेल्या एका संशोधनात असं समोर आलं आहे की स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेन या हार्मोनची पातळी जास्त असते आणि सोडियम प्रोटॉन एक्सचेंजर NHE1 ची पातळी कमी असते. त्यामुळे दुखणं वाढतं.

संशोधन आणि अर्थसहाय्याचा विषय जेव्हा येतो तेव्हा इतर आजारांपेक्षा मायग्रेनवर कमी संशोधन झालं आहे. युरोपमध्ये हा इतका गंभीर आजार असून त्याला सगळ्यात कमी निधी मिळाला आहे. अमेरिकेत 15 टक्के लोकांना हा आजार आहे. तिथे 2017 मध्ये 22 मिलियन डॉलर्स इतका निधी मिळाला.

अस्थमाचे रुग्ण मायग्रेनपेक्षा संख्येने अर्धे आहेत तरी त्याला 13 पट जास्त संशोधन निधी मिळाला.

डायबेटिस फक्त दोन तृतीयांश लोकांना होतो तरी त्याला पन्नास टक्के जास्त निधी मिळाला आहे. अस्थमा आणि डायबेटिस तितकेच जीवघेणे आहेत याची नोंद घेणं इथे अत्यावश्यक आहे.

जेव्हा या आजाराबद्दल संशोधन करण्यात आलं तेही दुर्दैवाने इतर आजारांसारखं करण्यात आलं. मायग्रेनशी निगडीत सर्व संशोधन नर प्राण्यांवर करण्यात आलं मात्र मायग्रेनचं प्रमाण स्त्रियांमध्ये सर्वाधिक आढळतं.

स्त्रियांमध्ये आढळणाऱ्या या आजाराकडे डॉक्टरांनी किती दुर्लक्ष केलं हे या आजारावर झालेल्या संशोधनातून कळतं.

मायग्रेनचा वेदनादायी इतिहास

मायग्रेनने होणारी तीव्र डोकेदुखी हा मानवी इतिहासातला सर्वात जुना आजार आहे. इजिप्तच्या शिलालेखांध्ये इ.स.पू 1200 पासून मायग्रेनचा उल्लेख आढळतो. हिपोक्रॅटसने या आजारामुळे होणारे दृष्टिदोष आणि ओकारी यांच्याबद्दल लिहून ठेवलं आहे.

मात्र मायग्रेनचा शोध लावण्याचं श्रेय ग्रीक डॉक्टर अरेटिअस यांना जातं. एकाच बाजूला डोकं दुखणं या मुख्य वैशिष्ट्याचा त्यांनी उल्लेख केला होता. तसंच काही काळ काहीच लक्षणं दिसत नाही. हेही त्यांनी सांगितलं. मायग्रेन हा शब्द Hemicrania या संकल्पनेवरून आला आहे. एका बाजूला होणारी डोकेदुखी असा या शब्दाचा अर्थ होतो.

मध्ययुगीन काळात मेंदूत छिद्र करणं आणि त्या छिद्रात लसूण टाकणं अशा प्रकारचे उपाय मायग्रेनवर केले जात असत.

मायग्रेन

पुरातन काळात मायग्रेनची लक्षणं आणि कारणं यांच्याबद्दल अनेक अंधश्रद्धा अस्तित्वात होत्या. मध्ययुगीन काळात मायग्रेन घालवण्यासाठी अनेक अघोरी उपाय केले जात असत. मेंदूत विविध ठिकाणी छिद्र करणं हा त्यातला एक उपाय होता. ज्यांना मानसिक आजार आहे त्यांच्या डोक्यातून भूत निघून जावं यासाठीसुद्धा हा उपाय केला जात असे. त्यातूनच मग मायग्रेन आणि मानसिक आरोग्य यांच्यात काही संबंध आहे असा अंदाज व्यक्त करण्यात आला.

स्त्रियांना मायग्रेनचा त्रास जास्त प्रमाणात होतो हा शोध 19 व्या शतकात झाला. त्यांच्या मते विविध मनोवस्थेमुळे हा रोग होतो असं काहींचं मत होतं.

काहींच्या मते निम्नमध्यमवर्गीय स्त्रियांचा हा रोग आहे. कारण सततच्या कामांमुळे. झोपेच्या अभावामुळे, सतत स्तनपान दिल्यामुळे आणि कुपोषणामुळे त्यांना मायग्रेन होतो असा शोध लावला.

ज्या स्त्रियांना जास्त डोकेदुखी होते त्यांची हेटाळणी केली जायची. त्यांना वेडसर ठरवलं जायचं. त्यांना वेडसर असल्याचं लेबल लावलं जायचं आजही तो समज अस्तित्वात आहे.

“बराच काळ मायग्रेन हा श्रीमंतांचा रोग समजला जायचा. श्रीमंत स्त्री आणि पुरुषांनाच हा रोग होतो असा एक समज होता.” असं रुटगर्स विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाचे प्राध्यपक जोआना केम्पनर यांना वाटतं. “जी लोक लाडाकोडात वाढलेली असतात, त्याचा मेंदू दुर्बल असतो. त्यामुळेच या वर्गातली माणसं कला किंवा विज्ञान क्षेत्रात करिअर करतात.” ते पुढे म्हणतात.

“बायकांना तसंही फार बौद्धिक काम येत नाही त्यामुळे त्यांच्या मेंदूवर ताण येतो.” असाही एक समज असल्याचं ते पुढे म्हणतात.

डोकेदुखी विषयात पारंगत असलेल्या अमेरिकन न्यूरॉलॉजिस्ट हॅरोल्ड वुल्फ यांनी पुरुष आणि स्त्रियांमध्ये होणाऱ्या डोकेदुखीमध्ये फरक सांगितला आहे.

त्यांच्या मते पुरुष हे अतिशय महत्त्वाकांक्षी होते त्यामुळे जेव्हा थकवा यायचा तेव्हा त्यांना मायग्रेनचा झटका यायचा. मात्र स्त्रियांना सेक्स या विषयात त्यांची भूमिका काय आहे हे न समजल्याने त्यांना मायग्रेन व्हायचं.

कारण स्त्रियांना असं वाटायचं की सेक्स हे लग्न झाल्यानंतर करण्याचं कर्तव्य आहे. त्यांच्यासाठी बहुतांशवेळा हे नाखुशीने करायचं काम होतं आणि जसं सांगितलं तसं ते करायचे.”

काही शब्दकोशांमध्ये तर मायग्रेन चा समानार्थी शब्द जोडीदार असा होता.

केम्पनर पुढे सांगतात की “20व्या शतकाच्या सुरुवातीला तर मायग्रेन हा आजार वेडसर गृहिणी या शब्दाचा समानार्थी शब्द झाला होता. काही शब्दकोषांमध्ये जोडीदाराला समानार्थी शब्द म्हणून मायग्रेनचं नाव यायचं.

मनाचेही खेळ

डोकेदुखी आणि मानसिक आरोग्यामध्ये काहीतरी दुवा आहे हेही नाकारून चालणार नाही. मायग्रेन आणि मानसिक आजारांमध्ये काहीतरी संबंध आहे असं अनेक संशोधनांमध्ये सिद्ध झालं आहे.

2016 मध्ये झालेल्या एका संशोधनात बायपोलर आणि मायग्रेन यांच्यात काहीतरी नातं आहे असं सिद्ध झालं आहे. मायग्रेनचा त्रास असलेल्या लोकांमध्ये चिंता आणि काळजी हे आजार विकसित व्हायची शक्यता 2.5 टक्क्यांनी जास्त असते. ज्यांना नैराश्य आहे त्यांनाही मायग्रेनचे अटॅक वारंवार येण्याचा धोका असतो.

आणखी एका संशोधनात असं समोर आलं आहे की ज्यांना मायग्रेनचा प्रचंड त्रास आहे त्यांच्या मनात एकदा तरी आत्महत्येचा विचार येतो. दहापैकी एकाला आत्महत्येचे विचार येतात असंही एका संशोधनात सिद्ध झालं आहे.

हे सगळं इतकं सामान्य आहे की नाही हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे. असं डॅनिश हेडेक सेंटर चे मेसूद अशिना म्हणतात. “जेव्हा मायग्रेनसारखे आजार होतात तेव्हा इतर आजार होण्याचा धोका जास्त असतो..”

मायग्रेन

मायग्रेन झालेल्या लोकांचं मानसिक आरोग्य कमकुवत असतं.

“हे अगदी स्वाभाविक आहे. कारण कधी मायग्रेन होईल आणि त्याचा कामावर आणि कुटुंबावर परिणाम होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे त्याची काळजी वाटणं स्वाभाविकच आहे.” असं टोरांटो विद्यापीठातील संशोधक एस्मे थॉमसन यांचं म्हणणं आहे. मायग्रेन आणि आत्महत्येचा संबंध या विषयावर त्यांनी संशोधन केलं आहे.

मायग्रेनमुळे प्रचंड हतबल वाटतं. त्यामुळे सुद्धा नैराश्य येण्याची दाट शक्यता आहे.

इतका गंभीर आजार असुनसुद्धा त्यावर अतिशय कमी संशोधन झालं आहे. “मेंदूविकारतज्ज्ञ आणि समाजातल्या लोकांना हा फारसा गंभीर आजार वाटत नाही. हा काही कॅन्सर किंवा पार्किन्सन आजार नाही मात्र त्याचा लोकांवर आणि समाजावर होणारा परिणाम पाहता ही एक मोठी समस्या आहे.”

मायग्रेन

त्यातही स्त्रियांना हा आजार मोठ्या प्रमाणात होतो हा आणखी वेगळाच मुद्दा झाला. कारण स्त्रिया त्यांच्या आजाराची लक्षणं गांभीर्याने घेत नाहीत आणि पुरुषांपेक्षा जास्त प्रमाणात निदान करण्यात करण्यात त्या मागे असतात.

इतक्या लोकांना मायग्रेन होतो याचाच अर्थ असा की तज्ज्ञांनासुद्धा या आजाराच्या तीव्रतेची कल्पना असावी.

केम्पनर यांनी त्यांच्या पुस्तकासाठी एका व्यक्तीची मुलाखत घेतली तेव्हा ते म्हणाले, “सगळ्या मेंदूविकारतज्ज्ञांकडे येणाऱ्या लोकांकडे डोकेदुखी ही नेहमीची लक्षणं असतात. त्यामुळ न्युरॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनाही याबाबात फारसं शिकवलं जात नाही. हे म्हणजे इलेक्ट्रिशियनला प्रशिक्षण द्यायचं आणि त्याला बल्ब म्हणजे काय हेच सांगायचं नाही असं झालं.

सुदैवाने एक नवीन उपचारपद्धती मायग्रेनवर काम करू शकते. ती म्हणजे Erenumab नावाचं एक इंजेक्शन. ते महिन्यातून एकदा दिलं जातं. मायग्रेनचा अटॅक कार्यान्वित करणारं जे रिसेप्टर असतं त्याला ब्लॉक करण्याचं काम हे इंजेक्शन करतं.

मायग्रेनचा उपचार करण्यासाठीचं हे इंजेक्शन फक्त मायग्रेनसाठीच शोधलं नव्हतं. ते मायग्रेनसाठी जास्त प्रभावी ठरलं. असं स्टर्लिंग म्हणतात. एखाद्या विशिष्ट रोगासाठी तयार केलेल्या औषधामुळे साईड इफेक्ट कमी होतात आणि ते जास्त प्रभावी ठरतं.

मला सध्या मायग्रेनसाठी बिटा ब्लॉकर दिले आहेत त्यामुळे मला वरचा युक्तिवाद पटतो. मी गेल्या तीन महिन्यापासून जी औषधं घेत आहे ती उच्च रक्तदाब आणि अंजायना वर उपचारासाठी होत्या.

डॉक्टरांच्या लक्षात आलं की त्यामुळे मायग्रेनलाही आळा बसतो. मात्र ही औषधं मायग्रेनसाठी तयार केलेली नव्हती.

बिटा ब्लॉकर्सचे साईड इफेक्टही मोठ्या प्रमाणात असतात. या गोळ्या घेतल्याने प्रचंड थकवा आणि झोप येते. जर या गोळ्या घेणं अचानक थांबवलं तर हार्ट अटॅक येण्याचा धोकाही उद्भवतो.

याशिवाय काही अत्याधुनिक उपचारपद्धती आहेत. ज्यात इलेक्ट्रिकल आणि चुंबकीय उपचारांचा समावेश आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून मला मायग्रेनपासून मुक्ती मिळाली आहे.

आता मी बिटा ब्लॉकर्सचा डोझ कमी करत आहे. माझं शेवटी उद्दिष्ट काय आहे? शून्य औषधं. नुकताच मला एक अटॅक येऊन गेला.

काही महिन्यानंतर मला हार्ट अटॅकच्या संशयाच्या कारणावरून मला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तसं काही झालं नाही.

त्याने एक झालं की मायग्रेनच्या औषधाचा माझ्या महत्त्वाच्या अवयवांवर परिणाम होऊ नये. मला अपेक्षा आहे की असं संशोधन येत्या काळात होईल.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)