सरोज अहिरे : विधीमंडळ सभागृहात हिरकणी कक्षाचं उद्घाटन करणाऱ्या आमदार कोण आहेत?

सरोज अहिरे

फोटो स्रोत, social media

फोटो कॅप्शन, सरोज अहिरे

महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून (19 डिसेंबर) नागपूरमध्ये सुरू झालंय.

अधिवेशनाचे पहिले दोन दिवस आमदार सरोज अहिरे-वाघ यांच्या नावाची सोशल मीडियावर चर्चा आहे.

सरोज या आपल्या अडीच महिन्यांच्या चिमुकल्या बाळाला घेऊन विधान भवनात पोहोचल्या होत्या. विधीमंडळ सभागृहात हिरकणी कक्ष नसल्याचा त्यांनी मुद्दा मांडल्यानंतर तत्काळ ही सुविधा निर्माण करून त्यांच्याच हस्ते विधीमंडळात हिरकणी कक्षाचं उद्घाटन करण्यात आलं आहे.

आमदार सरोज अहिरे-वाघ या नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आहेत.

"मी आई आहेच, सोबत आमदारही आहे. त्यामुळे दोन्ही कर्तव्ये महत्वाची आहेत. बाळ माझ्याशिवाय राहू शकत नाही, सोबत मतदारसंघातील लोकांचे प्रश्नही महत्वाचे आहेत, त्यामुळे बाळाला घेऊन आले आहे,” असं सरोज यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं.

हिरकणी कक्षाचं उद्घाटन

आमदार सरोज अहिरे यांनी मागणी केल्यानंतर विधीमंडळ सभागृहात तत्काळ हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात आली. विशेष म्हणजे, याचं उद्घाटन त्यांच्याच हस्ते करण्यात आलं.

याविषयी माहिती देताना महाराष्ट्राच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने सांगितलं, "कर्तृत्व आणि मातृत्वाच्या सन्मानार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कक्षाची स्थापना करण्याचे निर्देश दिले होते.

त्यानुसार, नागपूर येथील विधीमंडळाच्या विस्तारीत इमारतीतील दालन क्रमांक 106 मध्ये हिरकणी कक्ष सुरू करण्यात आला आहे.

याठिकाणी स्वतंत्र खोली, पाळणा, वैद्यकीय सुविधा आहेत. या कक्षासाठी एक डॉक्टर, दोन नर्स अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत , शिक्षणमंत्री दीपक केसरकर आदी उपस्थित होते.

सरोज अहिरे कोण आहेत?

सरोज अहिरे या नाशिकच्या देवळालीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आहेत. नाशिक मधील दंतरोगतज्ज्ञ डॉ.प्रवीण वाघ यांच्याशी फेब्रुवारी 2021 ला त्यांचा विवाह झाला. अडीच महिन्यांपूर्वी त्यांनी गोड बाळाला जन्म दिला.

सरोज यांचे वडीलही आमदार होते. सरोज 2017 नाशिक महानगर पालिकेच्या नगरसेवक झाल्या आणि 2019 मध्ये आमदार म्हणून निवडून आल्या.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत सरोज यांच्यासमोर शिवसेनेचे विद्यमान आमदार योगेश घोलप यांचं आव्हान होतं.

मात्र, सरोज यांनी तब्बल 41 हजार मतांनी घोलप यांचा पराभव करीत शिवसेनेची तीस वर्षांची सत्ता काबीज केली.

सोशल मीडियावर कौतुक

आकाश पांढरे या ट्विटर यूझरनं लिहिलंय, “देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे अडीच महिन्यांच्या बाळासह विधानभवनात पोहोचल्या. हीच तर महिलांची कसोटी असते, एक आमदार आणि एक आई म्हणून कर्तव्य असल्याची त्यांनी प्रतिक्रिया दिली.”

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 1

संजय चांदणे यांनी ट्विट केलंय की, , “आज आमदार सरोज अहिरे या त्यांच्या दोन महिन्याच्या बाळाला घेऊन कामाकाजासाठी विधीमंडळात दाखल झाल्या. लोकप्रतिनिधी आणि आई या दोन्ही जबाबदार्‍यांसह असंख्य जबाबदाऱ्या एक महिला पार पाडत असते.”

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 2

सोनाली जाधव यांनी ट्विट करत म्हटलं, 'आमदार आई' (सरोज अहिरे) राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आपल्या अडीच महिन्याच्या बाळाला घेवून आलीय.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 3

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)