You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कॅनडा : व्हँकुव्हरमध्ये भर गर्दीत कार घुसली, 9 जणांचा मृत्यू
कॅनडामधील व्हँकुव्हर शहरात गर्दीच्या ठिकाणी धावती कार घुसल्यामुळे 9 जणांचा मृत्यू झाला आहे.
कॅनडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत.
पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. व्हँकुव्हरमध्ये एक स्ट्रिट फेस्टीव्हल सुरू असताना ही घटना घडली.
कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी याबाबत लवकरच बोलणार असल्याची माहिती आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीत म्हटलं आहे की, कार्यक्रम सुरू असताना रात्री 8 वाजेच्या सुमारास (स्थानिक वेळेनुसार) 30 वर्षीय ड्रायव्हरने गर्दीत कार घुसवली.
अपघातानंतर या व्यकतीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आरोपीच्या गुन्हेगारी गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत काहीही बोलण्यास व्हँकुव्हरच्या पोलीस प्रमुखांनी नकार दिला आहे.
याठिकाणी वार्षिक लापु-लापु फेस्टिव्हल सुरू होता. फिलिपानो संस्कृतीचा उत्सव याद्वारे साजरा केला जातो. त्यावेळी रसत्याने चालणाऱ्यांना कारने उडवल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली.
सोशल मीडियावरील एका व्हीडिओमध्ये घटनेच्या ठिकाणी पोलिसांच्या गाड्या, रुग्णवाहिका आणि बचाव पथकाची गर्दी आणि खाली जखमी लोक पडलेले पाहायला मिळत आहे. मात्र त्या व्हीडिओची पुष्टी होऊ शकलेली नाही.
व्हँकुव्हरच्या महापौर केन सिम यांनी या घटनेचा प्रचंड धक्का बसल्याची प्रतिक्रिया एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये व्यक्त केली. या घटनेतील पीडितांप्रती संवेदना असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
पोलिसांनी काही जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती दिल्याचंही सिम यांनी सांगितलं आहे.
(ही बातमी अपडेट होत आहे.)
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)