युक्रेन युद्ध : 'रशियन क्षेपणास्त्र' पोलंडमध्ये पडलं, 7 राष्ट्राध्यक्षांची आपात्कालीन बैठक

फोटो स्रोत, Getty Images
रशिया -युक्रेन युद्धादरम्यान एक रशियन क्षेपणास्त्र शेजारी देश पोलंडमध्ये पडल्याने जगात खळबळ माजली आहे. याच मुद्द्यावर G-7 देशांच्या समूहातील 7 देशांच्या प्रमुखांनी एक आपात्कालीन बैठक घेतल्याची माहितीही समोर आली आहे.
रशियन मिसाईल पोलंडच्या सेरेवोडो गावात पडल्यानंतर त्यामुळे 2 जण ठार झाल्याची माहिती मिळाली होती.
पोलंडच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (15 नोव्हेंबर) दुपारी 3 वाजून 40 मिनिटांनी सेरेवोडो गावात रशियन मिसाईल पडलं. मात्र हे मिसाईल नेमकं कुणी डागलं, याचे सबळ पुरावे उपलब्ध नाहीत, असं पोलंडने म्हटलं आहे.
या युद्धात दोन्ही देशांकडून रशियन शस्त्रास्त्रांचा वापर सुरू आहे, हे विशेष.
7 राष्ट्राध्यक्षांची आपात्कालीन बैठक
इंडोनेशियात सध्या G-20 परिषद सुरू आहे. या बैठकीदरम्यान G-7 देशांच्या प्रमुखांनी पोलंडवर पडलेल्या रशियन मिसाईलसंदर्भात चर्चा केली.
या बैठकीत अमेरिकेसह, इटली, जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन, जपान, स्पेन आणि नेदरलँड्स या देशांच्या प्रमुखांनी सहभाग नोंदवला.
त्यांच्याव्यतिरिक्त या बैठकीला युरोपीय परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल आणि युरोपीय महासंघाचे कमिशनरसुद्धा उपस्थित होते.
रशियन मिसाईल पोलंडमध्ये पडल्याच्या घटनेचे गंभीर पडसाद उमटण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे. पोलंड हा देश नेटो देशांच्या संघटनेचा सदस्य आहे. त्याच्यावरील हल्ला हा संपूर्ण नेटोवरील हल्ला मानला जाऊ शकतो.
त्यामुळे या घटनेनंतर नेटोचं सैन्य पोलंडमध्ये दाखल होतं का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
रशियाने आरोप फेटाळले
पोलंडच्या सेरेवोडो गावात मिसाईल पडल्याच्या घटनेची चर्चा सुरू असताना त्याचा आरोप रशियावर करण्यात येत होता. मात्र रशियाने असा हल्ला केल्याचं वृत्त फेटाळून लावलं आहे.
युक्रेन-पोलंड सीमा परिसरात रशियाने कोणत्याच प्रकारचा हल्लला केला नाही, असं त्यांनी म्हटलं.
या सर्व बातम्या परिस्थिती आणखी चिघळवण्यासाठी तसंच उचकवण्यासाठीचं पाऊल आहेत, असंही रशियाने म्हटलं.
दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेंस्की यांनी पोलंडचे राष्ट्राध्यक्ष डुडा यांच्याशी फोनवरून चर्चा केली.
ते म्हणाले, "मी पोलंडचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेजेज डुडा यांच्याशी फोनवरून बोललो. रशियाच्या दहशतवादामुळे मारल्या गेलेल्या दोन पोलिश नागरिकांच्या मृत्यूबाबत मी शोक व्यक्त केला आहे. आम्ही आमच्याकडील माहितीची देवाण-घेवाण केली. तसंच याबाबत तपास करत आहोत."

फोटो स्रोत, Office of President of Ukraine
कीव्हवर पुन्हा एकदा हल्ला
रशियाने युक्रेनची राजधानी कीव्हवर पुन्हा एकदा जोरदार हल्ला केला आहे. शहरात स्फोटाचे आवाज ऐकू येत आहे आणि सगळीकडे धूर पसरला आहे.
शहराचे महापौर विटाली किच्छको यांनी दिलेल्या माहितीनुसा पेश्रेक भागातील दोन निवासी इमारती या हल्ल्याला बळी पडल्या आहेत.
सध्या जागतिक पातळीवरचे सर्व महत्त्वाचे नेते G-20 परिषदेसाठी इंडोनेशियामध्ये आहेत. तिथे सर्वांनी एकत्रितपणे युक्रेन युद्धाचा निषेध केला आहे.
गेल्या आठवड्यात खेरसोन भागातून रशियाने सैन्य परत घेतले होते. त्यानंतर एका आठवड्यात हा मोठा हल्ला झाला आहे.
युक्रेनने अनेक क्षेपणास्त्र हाणून पाडले आहेत आणि बचावपथक त्यांचं काम करत आहे, असं महापौर पुढे म्हणाले.
रशियाने तीन दिशांना क्षेपणास्त्र डागल्याची माहिती मायक्लोविवचे महापौर विटाली किम यांनी दिली.
खारकीव्ह च्या नैऋत्य भागात स्फोटाचे आवाज ऐकू येत आहेत अशी माहिती इंटरफॅक्स युक्रेन या वृत्तसंस्थेने दिली आहे.
खारकीव्हचे महापौर इगोर तेरेखोव्ह यांनी हा क्षेपणास्त्र हल्ला असल्याची माहिती दिली आहे आणि बळींची संख्या अद्याप समजलेली नाही.
या हल्ल्यामुळे शहरात वीजेची मोठी समस्या निर्माण झाली आहे. मेट्रोवरही त्याचा प्रभाव पडला आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलिदिमीर झेलेन्स्की यांनी ट्विट केलं आहे की हा हल्ला म्हणजे झेलेन्स्की यांच्या
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








