बंबल अॅप, वेबसिरीज आणि ऑनलाईन केमिकल्स, श्रद्धा वालकर प्रकरणात काय काय माहिती समोर आली?

श्रद्धा

फोटो स्रोत, ANI

श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकणात आरोपी आफताब पुनावाला याच्या चौकशीत बरीच नवीन माहिती समोर आली आहे. दिल्ली पोलिस मंगळवारी त्याला मेहरोलीच्या जंगलात घेऊन गेले.

आफताबने दाखवलेल्या जागांवर पोलीस मृतदेहाचे तुकडे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

दिल्ली पोलिसांच्या मते, आफताबने श्रद्धाच्या शरीराचे अनेक तुकडे केले आणि जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले.

आफताबने 18 मे ला त्याची प्रेयसी श्रद्धाची गळा दाबून हत्या केली होती. श्रद्धा आणि आफताब लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये होते आणि दिल्लीत राहत होते.

  • दिल्ली पोलिसांनी सांगितलं की आफताबने हत्या केल्यानंतर आफताबने श्रद्धाचा फोन फेकून दिला होता. पोलीस आता त्या फोनचा शोध घेत आहेत.
  • श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताब जूनपर्यंत तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट वापरत होता जेणेकरून लोकांना वाटेल की ती अद्याप जिवंत आहे.
  • मात्र ज्या शस्त्राने आफताबने तिच्या शरीराचे तुकडे केले ते शस्त्र अद्याप सापडलेलं नाही.
  • ·खून करण्यासाठी त्याने इंटरनेटवरून रसायनं मागवली होती, असं पोलिसांनी सांगितलं.
  • आफताब ने 18 दिवस तिच्या मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले आणि एकेक तुकडा तो जंगलात फेकत राहिला.
  • हत्या करण्याच्या आधी त्याने डेक्स्टर ही वेबसिरीज पाहिल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमात आल्यात.
  • पोलीस आता आफताब आणि श्रद्धा यांच्या मित्रमैत्रिणीचीही चौकशी करत आहे.
  • श्रद्धाची हत्या केल्यानंतरही तो डेटिंग अप्सवर सक्रिय होता.
  • इंडियन एक्स्प्रेसच्या एका बातमीनुसार आफताबने श्रद्धाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले होते तेव्हा त्याने दुसऱ्या मुलींना घरी डेटिंगसाठी बोलावलं होतं.
व्हीडिओ कॅप्शन, दिल्ली खून प्रकरण : श्रद्धाचे तुकडे करण्यापूर्वी त्याने गुगलवर काय सर्च केलं?

आतापर्यंत काय काय माहिती मिळाली आहे?

  • श्रद्धा आणि आफताब एका डेटिंग अपच्या माध्यमातून एकमेकांना भेटले होते.
  • 2018 मध्ये श्रद्धा एका कॉल सेंटर मध्ये नोकरी करत होती.
  • श्रद्धा तिच्या आईबरोबर रहायची. तिचे वडील वेगळे राहत होते.
  • 2019 मध्ये श्रद्धाने तिच्या आईला आफताब बद्दल सांगितलं आणि त्याच्याबरोबर राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र धर्म वेगळा असल्याने आईने या प्रस्तावाला नकार दिला होता.
  • श्रद्धा नाराज होऊन घर सोडून गेली आणि आफताबसोबत राहू लागली.
  • काही दिवसानंतर आफताब श्रद्धाने तिच्या आईला सांगितलं की आफताब तिच्याबरोबर मारहाण करतो.
  • काही काळाने श्रद्धाच्या आईचं निधन झालं. तेव्हा श्रद्धाने ही सगळी हकिकत वडिलांना सांगितली. त्यांची भेट घेतली आणि आफताब बद्दल सांगितलं.
  • दोन महिने श्रद्धाशी काहीच संपर्क झाला नाही तेव्हा श्रद्धाच्या मित्राने ही माहिती तिच्या भावाला दिली. त्यानंतर पोलिसांनी श्रद्धा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवून घेतली.
  • मुंबई पोलिसांच्या तपासात तिच्या फोनचं शेवटचं लोकेशन दिल्लीच्या मेहरोली भागात मिळालं होतं.
  • प्रकरण दिल्ली पोलिसांकडे गेलं आणि चौकशीची सुई आफताबकडे गेली.
  • पोलिसांनी सांगितलं की चौकशीदरम्यान आफताबने श्रद्धाची हत्या करून तिचे तुकडे केल्याची कबुली दिली आहे.
  • लग्नाच्या मुद्द्यावरून त्या दोघांमध्ये नेहमी भांडणं व्हायची. 18 मे ला रागाच्या भरात त्याने श्रद्धाची हत्या केली. तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि ते ठेवण्यासाठी एक फ्रीज खरेदी केला.
  • पोलिसांनी हा फ्रीज जप्त केला आहे.
  • मात्र ज्या शस्त्राने हत्या केली ते अद्याप मिळालेला नाही. त्याचा शोध सुरू आहे.

बंबल डेटिंग अॅपची पोलिसांना मदतीची तयारी

श्रद्धा वालकर प्रकरणात बंबल डेटिंग अॅपचं नाव समोर आलं आहे. यासंदर्भात पोलिसांना संपूर्ण मदत करण्याची तयारी बंबलच्या अधिकाऱ्यांनी दर्शवली आहे.

भारतीय तपास संस्थांना मदत करण्यासाठी आपण उपलब्ध आहोत, असं बंबलने म्हटलं आहे.

या प्रकरणात तिचा प्रियकर आफताब हा आरोपी आहे. श्रद्धा आणि आफताब यांची भेट 2019 साली बंबल अॅपच्या माध्यमातूनच झाली होती, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

ANI वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी आफताबची बंबल अॅपशी संबंधित सगळी माहिती त्यांना मागितली आहे. बंबलच्या माध्यमातून आफताब कोणकोणत्या महिलांना भेटला, याचा तपास पोलिसांना करायचा आहे.

याबाबत बंबलच्या प्रवक्त्यांनी म्हटलं, “आम्ही या प्रकरणावर बारीक लक्ष ठेवून आहोत. आमची मदत पाहिजे असल्यास आम्ही सदैव उपलब्ध आहोत. आमच्या सदस्यांची सुरक्षितता आमच्यासाठी पहिलं प्राधान्य आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर आम्हालाही मोठा धक्का बसलेला आहे.”

हेही पाहिलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)