उस्मानाबाद लोकसभा निकाल : ओमराजे निंबाळकरांनी मिळवली मोठी आघाडी

ओमराजे निंबाळकर, अर्चना पाटील
    • Author, आशय येडगे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाच्या अर्चना पाटील यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर यांनी मोठी आघाडी घेतली आहे.

पहिल्या फेरीपासूनच ओमराजे यांनी मिळवलेली आघाडी कायम ठेवली असून प्रत्येक फेरीगणिक त्याचा आकडा वाढत चालला आहे.

धाराशिवमध्ये महायुतीकडून अनेक नावांची चर्चा केली जात होती. अखेर धाराशिव जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष अर्चना पाटील यांना उमेदवारी मिळाली. पण आतापर्यंतचा निकालाचा कल पाहता, ओमराजे यांना यश मिळत असल्याचं पाहायला मिळालं.

हे पाहण्यासाठी जावास्क्रिप्ट असलेला मॉडर्न ब्राऊजर आणि स्टेबल इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता आहे.

निकाल लागण्याची प्रतीक्षा
जिंकण्यासाठी 272 जागांची आवश्यकता
निकाल लागण्याची प्रतीक्षा
पेज अपडेट करण्यासाठी रिफ्रेश करा

काँग्रेसचा पारंपरिक गड

"हामी इंदिरामायनं दिलेल्या घरात अजुनबी ऱ्हातावं, म्हणून हातावरच शिक्का मारून घरला येताव," धाराशिवमध्ये राहणाऱ्या एका वयोवृद्ध महिलेचं अस्सल गावरान भाषेतलं हे वाक्य, या मतदारसंघाच कधीकाळी काँग्रेस पक्षावर असणारं प्रेम दाखवून देण्यासाठी पुरेसं आहे.

कदाचित यामुळेच इथल्या मतदारांनी काँग्रेसच्या अरविंद कांबळे यांना चारवेळा खासदार म्हणून दिल्लीला पाठवलं होतं. अरविंद कांबळे यांचं मूळ गाव धाराशिव जिल्ह्यात नसूनही ते चारवेळा खासदार म्हणून निवडून आले.

एकेकाळी काँग्रेसचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जिल्ह्यात काँग्रेसची परिस्थिती बिकट झाली आहे.

1996 ला काँग्रेसच्या या साम्राज्याला सुरुंग लावण्याचं काम बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने केलं. त्यानंतर इथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पीछेहाट होतच राहिली.

राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही प्रादेशिक पक्षांनी उस्मानाबाद लोकसभेवर आळीपाळीने ताबा मिळवला आणि काँग्रेस आणि भाजप या राष्ट्रीय पक्षांनासुमारे 25 वर्ष लोकसभेच्या गादीपासून दूरच ठेवलं.

हा मतदारसंघ काही अविस्मरणीय राजकीय लढतींचा साक्षीदार राहिला आहे. धाराशिवने मोठमोठे राजकीय नेते घडवले आहेत, राज्यपातळीवरच्या मातब्बर नेत्यांचे नातलगही या मतदारसंघात आहेत. पण...

हे सगळं असलं तरी हा जिल्हा विकास, रोजगार, शिक्षण आणि उद्योगापासून वंचितच राहिलाय.

सततचा दुष्काळ, राजकीय नेत्यांच्या इच्छाशक्तीचा अभाव, सरकारचं उदासीन धोरण, मतदारसंघातील राजकारण आणि उद्योगावर काही मोजक्या घराण्यांचं असलेलं नियंत्रण या कारणांमुळे आधीचा उस्मानाबाद आणि आताच धाराशिव जिल्हा मागास म्हणून ओळखला गेला.

धाराशिव लेणी, तुळजापूर, तेर, नळदुर्ग यांसारख्या ऐतिहासिक ठिकाणांचा वारसा लाभलेल्या या जिल्ह्याच्या राजकारणाचा हा आढावा.

उस्मानाबाद मतदारसंघाचा इतिहास

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

1952 ते 1991 याकाळात झालेल्या नऊ लोकसभा निवडणुकांमध्ये धाराशिवच्या मतदारांनी काँग्रेसच्या उमेदवाराला खासदार म्हणून दिल्लीला पाठवलं.

याकाळात राघवेंद्र दिवाण, व्यंकटराव श्रीनिवासराव नळदुर्गकर, तुळशीराम पाटील, टी.एस. श्रंगारे, टी.एन. सावंत, अरविंद कांबळे यांनी उस्मानाबादचं नेतृत्व केलं.

चारवेळा खासदार राहिलेले अरविंद कांबळे हे मूळचे लातूर जिल्ह्यातल्या उदगीरचे रहिवासी होते. 1984 ला ते पहिल्यांदा निवडून आले त्यानंतर झालेल्या तीन लोकसभा निवडणुकींमध्ये त्यांनी विजय मिळवला.

1996 साली शिवसेनेचे शिवाजी कांबळे विजयी झाल्यानंतर मालिका खंडित झाली पण तरीही 1998 ला झालेल्या निवडणुकीतही ते खासदार म्हणून निवडून आले.

अरविंद कांबळे प्रत्येकवेळी निवडून आल्यानंतर लगेच उदगीर गाठायचे आणि थेट पुढच्या निवडणुकीतच उगवायचे.

1984 ते 2009पर्यंत उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातींच्या उमेदवारासाठी राखीव होता. या पंचवीस वर्षांमध्ये काँग्रेसचे अरविंद कांबळे, शिवसेनेचे शिवाजी कांबळे आणि कल्पना नरहिरे यांनी उस्मानाबादचं खासदार म्हणून नेतृत्व केलं.

2009 ला हा मतदारसंघ खुला झाला आणि राज्याच्या राजकारणात दबदबा असणाऱ्या डॉ. पद्मसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेची पहिली निवडणूक लढवली.

त्या निवडणुकीत शिवसेनेच्या प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांनी त्यांना आव्हान दिलं. महाराष्ट्राचे गृहमंत्री राहिलेल्या पद्मसिंह पाटील यांनी त्या निवडणुकीत 6,787 मतांनी निसटता विजय मिळवला.

डॉ. पद्मसिंह पाटील

फोटो स्रोत, Dr. Padmasinha Patil/FACEBOOK

2014च्या निवडणुकीत मात्र रवींद्र गायकवाड यांनी या पराभवाची परतफेड करत पद्मसिंह पाटील यांचा 2,35,325 मतांनी पराभव केला.

त्या निवडणुकीत संपूर्ण देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेची लाट पाहायला मिळाली होती आणि त्या लाटेवर स्वार होत रवींद्र गायकवाड यांनी पद्मसिंह पाटील यांचा पराभव केला.

अनेक वर्ष महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात महत्त्वाचे मंत्री राहिलेल्या पद्मसिंह पाटील यांच्या प्रस्थापित राजकारणाला छेद देणारी निवडणूक म्हणून 2014च्या निवडणुकीकडे पाहिलं गेलं.

2019मध्ये शिवसेनेने रवींद्र गायकवाड यांचं तिकीट कापलं आणि पद्मसिंह पाटील यांचे कौटुंबिक विरोधक असलेल्या ओमराजे निंबाळकर यांना लोकसभेची उमेदवारी दिली.

राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील यांनी निवडणूक लढवली. त्या निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांनी 1,27,566 मतांनी विजय मिळवला.

मागच्या पाच वर्षांमध्ये काय घडलं?

2019 ते 2024 या पाच वर्षांच्या काळात धाराशिवच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे.

2019पर्यंत धाराशिवच्या राजकीय पटलावर फारसा प्रभाव नसलेल्या भारतीय जनता पक्षाने दुसऱ्या पक्षांमधून आयात केलेल्या मातब्बर राजकीय नेत्यांच्या जोरावर अचानक मुसंडी मारली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शरद पवारांचे नातलग असणाऱ्या राणा जगजितसिंह पाटील यांना पक्षात घेऊन भाजपने त्यांची ताकद वाढवली. पुढे 2019च्या विधानसभा निवडणुकीत राणाजगजितसिंह पाटील तुळजापूरचे आमदार म्हणून निवडून आले.

धाराशिव लोकसभा मतदारसंघात लातूर जिल्ह्यातील औसा, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, धाराशिव जिल्ह्यातील उमरगा-लोहारा, परांडा, धाराशिव आणि तुळजापूर असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत.

धाराशिव लोकसभेतील विधानसभा मतदारसंघ

यापैकी औसा आणि तुळजापूर हे भाजपकडे, उमरगा आणि परांडा हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आणि उस्मानाबाद विधानसभा ही उद्धव ठाकरे गटाकडे आहे.

बार्शीमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेल्या राजेंद्र राऊत यांनी निवडून आल्यानंतर भाजपला पाठिंबा दिला होता.

थोडक्यात महायुतीकडे सहापैकी पाच आमदार हे महायुतीचे आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या गटात राहिलेल्या कैलास पाटील यांच्या रुपाने मविआचा एकच आमदार इथे आहे.

धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे मात्र ठाकरे गटातच राहिले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपने बसवराज पाटील यांच्या रुपाने काँग्रेस नेत्याला आपल्या गोटात घेण्यात यश मिळवलं आहे.

हेही नक्की वाचा