You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पालघर: 16 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, 8 जणांना अटक
- Author, प्रवीण नलावडे
- Role, बीबीसी मराठीसाठी,
पालघर जिल्ह्यातील सातपाटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर आठ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
या घटनेनंतर पालघर मध्ये संतापाची लाट पसरली असून सातपाटी सागरी पोलीस ठाण्यात आठ आरोपीं विरोधात पोक्सोसह विविध कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
सध्या या आठही आरोपींना सातपाटी पोलिसांनी अटक केली आहे .
16 डिसेंबर रोजी संध्याकाळी पीडित मुलगी बेपत्ता झाली. 17 तारखेला तिच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार केली.
जेव्हा आपण मुलीला फोन करतो तेव्हा ती काही बोलत नाही ती रडत असते असे तिच्या पालकांनी पोलिसांना सांगितले.
तक्रारीनंतर, अवघ्या काही वेळातच अल्पवयीन मुलीला पानेरी परिसरातून शोधण्यात यश आलं.
16 तारखेला शुक्रवारी मौजे माहीम इथल्या समुद्रकिनारी एका बंद बंगल्यात तसंच समुद्रकिनारी रात्री 8 वाजता ते 17 तारखेला शनिवारी सकाळी 11 वाजेपर्यंत एकूण 8 आरोपींनी इच्छेविरुद्ध सामूहिक पद्धतीने शारीरिक संबंध ठेवल्याचं पीडित मुलीने सांगितलं.
उपविभागीय पोलीस अधिकारी नीता पाडवी यांच्या नेतृत्वात याप्रकरणाचा तपास करण्यात आला.
आठ आरोपींपैकी एक जण मुलीला ओळखत होता, त्याने तिला बोलवले आणि तो तिला त्या ठिकाणी घेऊन गेला अशी माहिती पोलिसांनी दिली.
नीता पाडवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आठही आरोपी हे सज्ञान असल्याचे पाडवी यांनी माध्यमांना सांगितले.
पीडितेने दिलेल्या फिर्यादीनंतर सातपाटी सागरी पोलीस ठाण्यात पोक्सो सह विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.
असून या प्रकरणातील आठही आरोपींना सातपाटी सागरी पोलिसांनी अटक केली आहे आज या आठही आरोपींना पालघर न्यायालयात हजर केले जाणार असून पोलीस कोठडीची मागणी केली जाणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.