रशियात हल्ले करायला दीर्घपल्ल्याची क्षेपणास्त्रं वापरण्याची परवानगी, युक्रेनला काय फायदा होईल?

व्हीडिओ कॅप्शन, रशियात हल्ले करायला दीर्घपल्ल्याची क्षेपणास्त्रं वापरण्याची परवानगी, युक्रेनला फायदा होईल?
रशियात हल्ले करायला दीर्घपल्ल्याची क्षेपणास्त्रं वापरण्याची परवानगी, युक्रेनला काय फायदा होईल?

रशियाविरुद्धच्या युद्धामध्ये युक्रेनला अमेरिका, युकेसारख्या देशांचं पाठबळ मिळतंय. पण आता त्यांना या देशांकडून देण्यात आलेली लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रं रशियाच्या भूमीत हल्ला करण्यासाठी वापरता येणार आहेत. शिवाय अमेरिका युक्रेनला Landmines म्हणजे भूसुरुंग पुरवणार आहे.

यामुळे युद्धामधली बाजी युक्रेन पलटवू शकेल का? जो बायडन यांच्या जागी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर काय होईल?

समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये

रिपोर्ट : टीम बीबीसी

निवेदन : अमृता दुर्वे

एडिटिंग : निलेश भोसले

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)