विधानसभा निवडणुकीत दलित आणि ओबीसी मतं निर्णायक ठरणार? डॉ. सुहास पळशीकरांचं विश्लेषण

व्हीडिओ कॅप्शन, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दलित, ओबीसी मतं निर्णायक ठरतील का?
विधानसभा निवडणुकीत दलित आणि ओबीसी मतं निर्णायक ठरणार? डॉ. सुहास पळशीकरांचं विश्लेषण

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्यात मराठा, धनगर आणि ओबीसी आरक्षणावरून मोठा संघर्ष झाला. लोकसभा निवडणुकांवेळी भाजपविरोधात मराठा समाजाचा रोष स्पष्टपणे दिसला.

एकीकडे काँग्रेस जातीय जनगणनेबाबत बोलून आरक्षणाची 50% मर्यादा वाढवण्याबाबत बोलत असताना भाजप जातीय ऐक्याचा नारा देत एक है तो सेफ है असं म्हणताना दिसतोय. जातीनिहाय मतदान होतं का? या निवडणुकीत दलित-ओबीसींची भूमिका निर्णायक ठरेल का?

ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. सुहास पळशीकर यांच्याशी बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळे यांनी सविस्तर चर्चा केली.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.