FIFA वर्ल्ड कप 2022: मेस्सीच्या अर्जेंटिनाला सौदी अरेबियाकडून धक्का

सौदी अरेबिया आणि अर्जेंटिना यांच्यामध्ये झालेल्या फुटबॉल सामन्यात अर्जेंटिनाला पराभव स्वीकारावा लागला आहे. सौदी अरेबियाने अर्जेंटिनाचा 2-1 असा पराभव केला आहे.

फुटबॉल स्टार लिओनिल मेस्सीमुळे या सामन्याकडे सर्वांचे लक्ष होते पण सौदी अरेबियाने अर्जेंटिनाला मोठा धक्का दिला आहे.

अर्जेंटिना या वेळच्या संभाव्य विजेत्यांपैकी एक असलेला संघ आहे पण त्यांचा पहिल्या फेरीत पराभव झाला आहे.

लिओनेल मेस्सीने 10 व्या मिनिटाला एक गोल करुन अर्जेंटिनाला आगेकूच करण्याची संधी दिली होती.

त्याने सौदीविरोधात पेनल्टीवर गोल केला.

या गोलमुळे अर्जेंटिना 1-0 अशी पुढे होती. 

अर्जेंटिनासाठी दुसरा गोल लोटारो मार्टिनेझने केला. मात्र पंचांनी तो बाद ठरवला. 

त्यानंतर सौदी अरेबियाने 48 व्या मिनिटाला पहिला गोल केला. हा गोल सौदीच्या सालेह अलशेहरीने केला होता. 

53 व्या मिनिटाला सौदी अरेबियासाठी सालेम अलडसारीने दुसरा गोल केला.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)