इराणमध्ये शाळकरी मुलींना विष दिल्याचं प्रकरण, सरकार म्हणतं...

प्रतिकात्मक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतिकात्मक छायाचित्र

इराणमध्ये गेल्या काही आठवड्यांमध्ये शाळकरी मुलींना विष दिल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यावर आता इराण सरकारने प्रतिक्रिया दिली आहे.

इराणचे आरोग्य उपमंत्री युनूस पनाही यांनी सांगितले की, पवित्र शहर कौम आणि बोरुजर्डमधील किमान 12 शाळांमध्ये आतापर्यंत 200 मुलींना विष दिल्याच्या घटना नोंदल्या गेल्या आहेत.

बीबीसी फारसी सेवेने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत यातील अनेक मुलींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या घटनांची चौकशी इराण सरकारने सुरू केली आहे मात्र आतापर्यंत यासाठी जबाबदार असणाऱ्या लोकांची नावं समोर आलेली नाहीत.

काय म्हणाले इराणचे मंत्री?

इराणचे आरोग्य उपमंत्री पनाही यांनी गेल्या रविवारी एक पत्रकार परिषद घेतली. ही घटना जाणूनबुजून घडवली गेलीय असं ते या परिषदेत म्हणाले.

काही लोक शाळा विशेषतः मुलींच्या शाळा बंद पाडू इच्छित होते असं त्यांनी सांगितलं.

गेल्या आठवड्यात इराणचे महान्यायवादी मोहम्मद जफर मोतंजेरी यांनीही यावर टीप्पणी केली होती. ही घटना जाणूनबुजून केली गेल्य़ाचं त्यांनी सांगितलं होतं.

आतापर्यंत या विष देण्याच्या प्रकरणात कोणालाही अटक झालेली नाही.

मात्र यामुळे इराण सरकारमध्ये खळबळ माजली आहे.

संसदीय आयोगानं काय म्हटलं?

इराणी संसदेच्या शिक्षण आणि संशोधन आयोगाचे प्रमुख अलिरेझा मनदी यांनी आपण या प्रकरणावर लक्ष ठेवून आहोत असं म्हटलं आहे.

युनूस यांनी ज्या घटना घडल्याची कबुली दिली आहे, ती काही चांगली बातमी नाही, असं ते म्हणाले.

मुलींना शाळेत जाण्यापासून रोखण्यासाठी केलेल्या या कृत्यामागील विचार अत्यंत धोकादायक आहे असं मनदी म्हणाले.

आरोग्य मंत्रालयासह आपला आयोग एक बैठक घेईल आणि अशा घटना परत घडणार नाहीत याची काळजी घेऊ असं ते म्हणाले.

फेब्रुवारी महिन्यात या मुलींच्या कुटुंबीयांना गव्हर्नरांच्या कार्यालयाबाहेर निदर्शनं केली होती.

अनुत्तरित प्रश्न

याबाबतीत आतापर्यंत काही स्पष्ट माहिती मिळालेली नाही.

काही बातम्यांनी खात्री न केलेल्या सुत्रांच्या मदतीने या घटनांसाठी धार्मिक कट्टरपंथियांना जबाबदार ठरवलं आहे.

आतापर्यंत सरकारने अशी कोणतीही माहिती दिलेली नाही.

मुलींना विष कसं दिलं आणि कोणी दिलं हेसुद्धा समोर आलेलं नाही.

महिलांच्या अधिकारांसाठी देशात हिंसक निदर्शनं होत होती त्या काळात या घटनांना सुरूवात झाली.

इराणमध्ये महसा अमिनी या महिलेचा कोठडीत मृत्यू झाल्यावर देशभरात महिलांनी आपल्या अधिकारांसाठी निदर्शनं केली होती.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)