'पठाण' चित्रपटावर चालणार सेन्सर बोर्डाची कात्री, वादग्रस्त दृश्यं बदलण्याचे निर्देश

गेल्या काही दिवसांपासून पठाण चित्रपटातील वादग्रस्त दृश्यांवरील चर्चा थांबता थांबत नाहीये. नुकताच या चित्रपटातील दृश्यांवर सेन्सर बोर्डाची कात्री चालवण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
सेन्सर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी म्हटले आहे की सेन्सर बोर्डाने पठाणला आपल्या चित्रपटातील दृश्यं बदलण्याचे निर्देश दिले आहेत.
यात ज्या दृश्यांमुळे वाद निर्माण झाला आहे ते देखील वगळण्यात येण्याची शक्यता आहे.
'सोशल मीडियातून नकारत्मकता पसरवली जात आहे'
“सोशल मीडिया अनेकदा विशिष्ट संकुचित दृष्टिकोनातून वापरला जातो. तो मानवी स्वभावाला त्याच्या स्वार्थापुरता मर्यादित ठेवतो,” असं अभिनेता शाहरूख खान याने म्हटलं. ‘पठाण’ सिनेमातील ‘बेशरम रंग’ या गाण्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शाहरूख खानने हे विधान केलं आहे. सोशल मीडियाचा वापर आणि त्याचा प्रभाव यावर त्यानं भाष्य केलं. शाहरुख 28 व्या आंतरराष्ट्रीय कोलकाता फिल्म फेस्टिव्हलमध्ये बोलत होता.

फोटो स्रोत, Getty Images
“काही लोक सोशल मीडियावर नकारात्मकता पसरवत आहेत. सोशल मीडिया आपल्या सामूहिक नॅरेटिव्हला आकार देत आहे. सोशल मीडिया सिनेमावर नकारात्मक प्रभाव टाकेल या धारणेला छेद देत सिनेमाला आता महत्त्वपूर्ण भूमिका बजावावी लागेल.”
शाहरुखने म्हटलं, “सिनेमा सरळसोप्या पद्धतीने गोष्टी दाखवून मानवी स्वभावातील त्रुटी दाखवून देतो. आपल्याला एकमेकांना जाणून घेण्याची संधी सिनेमामुळे मिळते. एका अर्थाने सिनेमा प्रेक्षकांच्या एका मोठ्या समूहाला काउंटर नॅरेटिव्ह तयार करण्यासाठी मदत करण्याच्या परिस्थिती आहे.”
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
दरम्यान, शाहरुख खानच्या पठाणचा टीझर जेव्हापासून रिलीज झाला आहे, तेव्हापासून या सिनेमाबद्दल काही ना काही वादही सुरू आहेत.
सोमवारी (12 डिसेंबर) या सिनेमातलं ‘बेशरम रंग’ हे गाणं रिलीज झालं. त्यानंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा शाहरुखला ट्रोल करण्यात येत आहे. केवळ शाहरुखच नाही, तर दीपिका पदुकोणलाही सोशल मीडिया युजर्सने ट्रोल केलं आहे.
एकीकडे शाहरुख आणि दीपिकाचं ‘पठाण’मधलं ‘बेशरम रंग’ हे गाणं इंटरनेटवर व्हायरल होत आहे, तर दुसरीकडे या गाण्यावर बंदी घालण्याचीही मागणी होत आहे.
या गाण्यात दीपिका अतिशय बोल्ड लूकमध्ये आहे. तिने एकेठिकाणी भगव्या रंगाची बिकिनी घातली आहे. त्यावरूनच सगळा वाद सुरू झाला आहे.
काही लोकांनी हे गाणं अश्लील असल्याचं म्हटलं आहे, तर काहींनी हा हिंदूंच्या भावना दुखावण्याचा प्रकार असल्याचं म्हटलं आहे.
या गाण्यात दीपिका भगव्या रंगाच्या बिकिनीमध्ये आहे आणि गाण्याचं नाव आहे ‘बेशरम रंग.’ त्यावरच लोकांचा आक्षेप आहे. कारण भगव्या रंगाचा संबंध हा अनेकदा हिंदू धर्माशी जोडला जातो.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
‘पठाण’ सिनेमातलं हे गाणं बॉलिवूडमध्ये चालवल्या जाणाऱ्या धार्मिक अजेंड्याचं उदाहरण आहे, असं काही ट्वीटर युजर्सचं म्हणणं आहे. काही लोक दीपिका पदुकोणला जेएनयू गँगची सदस्यही म्हणत आहेत.
एका युजरने म्हटलं आहे, “बॉलिवूडमधला सिनेमा पठाण, अभिनेत्री जेएनयू गँगची सदस्य असलेली दीपिका पदुकोण आणि शाहरुख खान, दीपिकाच्या कपड्यांचा रंग आहे भगवा आणि गाणं आहे ‘बेशरम रंग’. म्हणून या सिनेमावर मी बहिष्कार टाकतो.”
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
एका युजरने लिहिलं आहे की, “बेशरम रंग गाणं पाहिल्यानंतर दीपिका यापेक्षा सुंदर दिसू शकली असती असं वाटलं. डान्स मूव्हच्या नावाखाली दीपिका या गाण्यात जे करत आहे, ते सुंदर नाहीये.
दीपिकाने याआधीही अनेक सिनेमांमध्ये कमी कपड्यांमध्ये डान्स केला आहे आणि ती देखणीही दिसलीये. पण ‘पठाण’मध्ये तिने जे केलं आहे ते अश्लील आहे.”
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 4
एका युजरने लिहिलं आहे की, 2020 मध्ये दीपिका डाव्यांना पाठिंबा देण्यासाठी जेएनयूमध्ये पोहोचली होती. कोणी ऑफिसमध्ये हवन-पूजा करवून घेत आहे, तर कोणी वैष्णो देवीचं दर्शन टिळा लावून घेत आहे. या गोष्टी त्यांच्या ग्रंथात हराम आहेत.
भाजप कार्यकर्ते अरूण यादव यांनी लिहिलं आहे की, भगव्या रंगाचे कपडे घातले आहेत आणि गाण्याचं नाव ‘बेशरम रंग’ ठेवलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 5
शनावी नावाच्या युजरने लिहिलं आहे की, या गाण्यात दीपिका पदुकोणने भगव्या रंगाचे कपडे घातले आहेत आणि ती अश्लील हालचाली करत आहे. बॉलिवूडमध्ये जाणूनबुजून हिंदू धर्माच्या पवित्र रंगाची खिल्ली उडविण्यात आली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 6
सौरभ सिंह नावाच्या एका युजरने दोन फोटो शेअर केले आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, पठाण सिनेमात महिलांना असं दाखवलं आहे आणि वास्तविक आयुष्यात मात्र त्यांना असं वागवलं जातं. त्यांनी पुढं म्हटलं आहे की, आपल्याला वस्तुस्थितीच्या विपरित गोष्टी दाखवून हे लोक पैसे कमावू पाहात आहेत. इस्लामचं उदात्तीकरण आणि हिंदूंची चेष्टा करणं आता चालणार नाही.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 7
‘पठाण’च्या माध्यमातून बॉलिवूड सॉफ्ट पॉर्नचं सादर करत असल्याचा आरोप दुसऱ्या एका युजरने केला आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 8
पठाण फिल्ममध्ये हिंदू मुलींचं अश्लील पद्धतीने चित्रण करण्यात आलं आहे. त्यामुळे सेन्सॉर बोर्डाने हा सिनेमा पास करू नये, असं एका ट्विटर युजरनं म्हटलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 9
एका युजरने म्हटलं आहे की, एकीकडे शाहरुख खान वैष्णोदेवीच्या दर्शनाला जातोय, तर दुसरीकडे भगव्याला ‘बेशरम रंग’ म्हणत अश्लील चित्रीकरण करत आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 10
काही युजर्सनी दीपिका पदुकोणला पाठिंबाही दिला आहे.
ट्विटरवरील चर्चित पॅरडी अकाऊंट निमो ताईने लिहिलं आहे, “कर्नाटकात हिजाब घालण्यावरून मुलींना लक्ष्य केलं जातं. दीपिका पदुकोणला बिकिनी घातल्यामुळे टीका सहन करावी लागते. खरंतर आपल्या विचारांनुसार चालणाऱ्या प्रत्येक महिलेबद्दलच संघाला आक्षेप आहे.”
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 11
दीपिकाला ट्रोल करताना जेएनयूचा उल्लेख का?
जानेवारी 2020 दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या आवारात काही चेहरा झाकलेल्या काही लोकांनी विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ला केला होता. तोडफोड केली होती. त्यानंतर दिल्लीसह देशातील इतर भागांमध्येही विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील लोकांनी या घटनेचा निषेध करत आंदोलन केलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
त्याचवेळी दीपिका जेएनयूमध्ये गेली होती आणि तिने हल्ला झालेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतलेली. तिने डाव्या संघटनेची कार्यकर्ती आणि स्टुडंट युनियनची तत्कालिन अध्यक्षा आईशी घोष हिची भेट घेतली. आईशी या हल्ल्यात जखमी झाली होती.
तिथे तिने कोणतंही भाषण वगैरे केलं नव्हतं, केवळ काही लोकांची भेट घेऊन बोलली आणि परतली होती.
त्यावेळी दीपिकाचा ‘छपाक’ हा सिनेमा प्रदर्शित होणार होता. लोकांनी तिच्या जेएनयू भेटीचा संबंध फिल्म प्रमोशनशी जोडला आणि ‘छपाक’वर बहिष्कार टाकण्याची मागणी केली.
उमराहनंतर शाहरुख खानने घेतलं होतं वैष्णोदेवीचं दर्शन
‘पठाण’ सिनेमाच्या घोषणेपासून सतत चर्चेत राहणारा शाहरुख खान याच महिन्यात मक्का इथे उमराह करण्यासाठी गेला होता. सोशल मीडियावर अनेक युजर्सने त्याचे फोटो आणि व्हीडिओ शेअर केले होते. त्यानंतर काहीजणांनी व्हीडिओ शेअर करत शाहरुखने वैष्णोदेवीचं दर्शन घेतल्याचाही दावा केला होता. अर्थात, सोशल मीडियावर जो व्हीडिओ शेअर केला जात आहे, त्यात शाहरुखचा चेहरा दिसत नाहीये. काही सोशल मीडिया युजर्स शाहरुखचं उमराह करणं आणि नंतर वैष्णोदेवीचं दर्शन घेणं याचा संबंध सिनेमाच्या प्रमोशनशी जोडत आहेत. पठाणमधून शाहरुख खान जवळपास चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. पठाण 25 जानेवारी 2023 ला रिलीज होत आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)