नागा साधू होण्यासाठीची 'टांगतोड' प्रक्रिया नेमकी काय असते?
नागा साधू होण्यासाठीची 'टांगतोड' प्रक्रिया नेमकी काय असते?
अंगाला भस्म, कपाळाला चंदनाचा लेप, पायात लोखंडी कडे, कंबरेला आणि डोक्याला झेंडूच्या माळा… हातात कधी डमरु, कधी शंख तर कधी कमंडलू.
मात्र बहुतेकदा असते ती गांज्याने भरलेली चिलीम. कुंभमेळा म्हटलं की सर्वांनाच काहीसा गूढ आणि गहन वाटणारा आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणजे हेच नागा साधू होय.
पण हे नग्न आणि अत्यंत विचित्र साधू नेमकं येतात तरी कुठून? शाही स्नानात दिसणारे हे शेकडो नागा कुंभमेळ्यानंतर कुठे गायब होतात? ते खरंच हिमालयात असतात का?
नव्या नागा साधूंची भरती कशी होते? त्याची प्रक्रिया काय असते? तसेच, त्यांना दीक्षा दिली जात असताना लिंग निकामी करणारी 'टांगतोड' प्रथा नक्की काय असते? त्याचाच हा शोध…
रिपोर्टर - विनायक होगाडे, बीबीसी प्रतिनिधी
शूट-एडीट - संदीप यादव
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






