सोनेरी कोल्हे : मुंबई आणि नवी मुंबईत या प्राण्यांचा वावर भीतीचं कारण ठरतोय का?
सोनेरी कोल्हे : मुंबई आणि नवी मुंबईत या प्राण्यांचा वावर भीतीचं कारण ठरतोय का?
मानवी वस्तीजवळील भटके कुत्रे आणि golden jackal म्हणजेच सोनेरी कोल्हे यात गल्लत केली जाते. मुंबईत आणि नवी मुंबईजवळील खारफुटीच्या जंगलामध्ये या सोनेरी कोल्ह्याचं वास्तव्य आढळतं.
पण गेल्या काही वर्षांमध्ये अन्नाच्या शोधात कचराकुंडीकडे येणाऱ्या या कोल्ह्यांचा भटक्या कुत्र्यांशी त्यांचा संपर्क होऊ लागला आहे.
या कोल्ह्यांना रेबीजची लागण होणं हे चितेंच कारण असल्याने वनविभागाने आणि पालिकेने यावर उपाययोजना सुरू केली आहे. रेबीजचा संसर्ग माणसांना होण्याची शक्यताही तपासून पाहिली जात आहे.
रिपोर्ट- ओंकार करंबेळकर, शूट- शार्दुल कदम
व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर, राहुल रणसुभे
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






