पुण्यात लांडगा-कुत्र्याचा संकर, भटक्या कुत्र्यांमुळे लांडगे संकटात?
पुण्यात लांडगा-कुत्र्याचा संकर, भटक्या कुत्र्यांमुळे लांडगे संकटात?
पुण्यात सासवडच्या माळरानावर भारतीय लांडग्यांचा मुक्त संचार असतो. पण लांडग्याच्या सर्वात जुन्या प्रजातींपैकी एक असलेली ही प्रजाती आता संकटात आहे.
भटक्या कुत्र्यांसोबत संकरामुळे लांडग्यांचं अस्तित्व धोक्यात येत आहे.
पण आता काही संशोधक आणि नागरिक लांडग्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करत आहेत.