'या' मराठी माणसामुळे तुम्हाला मिळते रविवारची सुटी

व्हीडिओ कॅप्शन, रविवारची सुटी आपल्याला कुणामुळे मिळते?
'या' मराठी माणसामुळे तुम्हाला मिळते रविवारची सुटी

कामगारांना साप्ताहिक सुट्टी मिळावी यासाठी भारतातील कामगार चळवळीतील नेत्यांना अनेक वर्षं संंघर्ष करावा लागला होता. ही चळवळ कुणी केली?

महाराष्ट्रच नाही तर संंपूर्ण देशाच्या कामगार चळवळीचा श्रीगणेशा मुंबईत झाला. आणि ही चळवळ सुरू करणारे होते - नारायण मेघाजी लोखंडे. 23 सप्टेंबर 1884 साली देशातील पहिली कामगार संघटना नावारूपाला आली. या संघटनेचे नाव होते 'बॉम्बे मिल्स हँड्स असोसिएशन'. नारायण लोखंडे याचे अध्यक्ष होते.

कामगारांसाठी साप्ताहिक सुटी, जेवणासाठी अर्धा तासाची सुटी या सूचना लोखंडेंनीच मांडल्या होत्या. 10 जून 1890 रोजी कामगारांना दर रविवारी सुट्टी देण्याचा निर्णय मिल मालक संघटनेतर्फे जाहीर करण्यात आला. तेव्हापासून आपल्याला रविवारी किंवा साप्ताहिक सुट्टी मिळणं सुरू झालं.

आजची सोपी गोष्ट रविवारच्या सुटीच्या या इतिहासाबद्दल

  • लेखन : तुषार कुलकर्णी, अमृता दुर्वे
  • निवेदन : अमृता दुर्वे
  • एडिटिंग : शरद बढे