बंजारा आणि आदिवासी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आमने-सामने, नेमकं काय प्रकरण आहे?

व्हीडिओ कॅप्शन, आरक्षणाच्या मुद्द्यावरून बंजारा आणि आदिवासी आंदोलने का होत आहेत?
बंजारा आणि आदिवासी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आमने-सामने, नेमकं काय प्रकरण आहे?

हैदराबाद गॅझेट नुसार बंजारा समाजाचा उल्लेख आदिवासी असल्यामुळे बंजारा समाज आक्रमक झाला आहे, या मागणीसाठी राज्यभरात ठिकठिकाणी महामोर्चे काढले जातायेत.

आमचा समावेश हा आदिवासींमध्ये अर्थात एसटी प्रवर्गात करावा अशी मागणी या समाजाची आहे, तर दुसरीकडे आदिवासी समाजामधून मात्र या मागणीला जोरदार विरोध होत आहे.

आदिवासी समाजाच्या आरक्षणात कोणालाही येऊ देणार नाही, या मागणीसाठी आज राज्यभरातून मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आदिवासी आंदोलक आले होते. त्यामुळे आता आदिवासी समाज आणि बंजारा समाज आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे.