परदेशात उपलब्ध औषधं भारतात मिळण्याचा मार्ग सोपा, किमती कमी होणार? सोपी गोष्ट
परदेशात उपलब्ध औषधं भारतात मिळण्याचा मार्ग सोपा, किमती कमी होणार? सोपी गोष्ट
जगातल्या काही मोजक्या देशांमध्ये मान्यता मिळालेली औषधं आता भारतात चाचण्या झाल्या नसल्या, तरी मिळू शकणार आहेत. औषध कंपन्यांची भारतातील नियामक - ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DGCI) ने आता एका महत्त्वाच्या ऑर्डरद्वारे आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेली औषधं भारतात येण्याचा मार्ग मोकळा केलाय.
एखाद्या औषधाला जगात इतरत्र मान्यता मिळालेली असली, तरी आतापर्यंत भारतामध्ये क्लिनिकल टेस्टिंग करून, मान्यता मिळाल्यानंतरच हे औषध फार्मा कंपन्यांना भारतामध्ये विकता येत होतं. पण ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DGCI) ने काही विशिष्ट आजार आणि उद्दिष्टांसाठीच्या औषधांच्या भारतातल्या विक्रीच्या नियमांत बदल केले आहेत.
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - शरद बढे






