बदलापूरचा शिंदे गटाचा नेता महिला पत्रकाराला म्हणतो, 'तुझ्यावर रेप झालाय का?'

व्हीडिओ कॅप्शन, बदलापूरच्या शिंदे गटाच्या नेत्यावर महिला पत्रकाराचे गंभीर आरोप
बदलापूरचा शिंदे गटाचा नेता महिला पत्रकाराला म्हणतो, 'तुझ्यावर रेप झालाय का?'

ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूरच्या शाळेमधील लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर वातावरण संतप्त असताना, शिंदे गटाचा नेता आणि माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रेवर महिला पत्रकाराने गंभीर आरोप केले आहेत.

'तुमच्यावर रेप झालाय का, तर तुम्ही बातमी करायला आला आहात' - हे वाक्य आहे एकनाथ शिंदेंच्या गटाचा नेता आणि बदलापूरचा शहरप्रमुख वामन म्हात्रे याचं.

बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचाराची घटना घडल्याची बातमी करायला मोहिनी जाधव गेल्या होत्या.

पत्रकार मोहिनी जाधव यांच्याकडूनच ऐका, त्यांच्यासोबत घडलेल्या प्रसंगाचा सविस्तर वृत्तांत.