UPSC 2022: काश्मिरा संखे- प्रिलिममध्ये दोनदा अपयश, तिसऱ्या प्रयत्नात थेट 25 वा रँक

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2022 च्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, पहिल्या तिन्ही क्रमांकावर मुलींनी बाजी मारलीय.
पहिल्या क्रमांकावर इशिता किशोर, दुसऱ्या क्रमांकावर गरिमा लोहिया, तर तिसऱ्या क्रमांकावर उमा हराथी उत्तीर्ण झाली आहे.
महाराष्ट्रातून काश्मिरा संखे प्रथम आलीय. काश्मिरा संखेने देशात 25 वा क्रमांक मिळवला.
भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय परराष्ट्र सेवा (IFS), भारतीय पोलीस सेवा (IPS) आणि केंद्रीय सेवा गट 'A' आणि गट 'B' या पदांसाठी यूपीएससीने उमेदवारांची शिफारस केली आहे.
या निकालात एकूण 933 जण असून, त्यातील 345 जनरल, 99 ईडब्ल्यूएस, 263 ओबीसी, 154 एससी, 72 एसटी गटातील आहेत.
तसंच, यापैकी IAS पदासाठी 180, IFS पदासाठी 38, IPS पदासाठी 200, केंद्रीय सेवेच्या गट A साठी 473, तर केंद्रीय सेवेच्या गट B साठी 131 जणांची निवड करण्यात आलीय.

महाराष्ट्रातून काश्मिरा संखे प्रथम

महाराष्ट्रातून काश्मिरा संखे हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
रिचा कुलकर्णी (54), जान्हवी साठे (127), सुरभी पाठक (156), ऋषिकेश शिंदे(183), वगिशा जोशी (199) अर्पिता ठुबे (214), दिव्या अर्जून गुंडे (265), किर्ती जोशी (274) अमर राऊत (277), अभिषेक दुधाळ (278) ही काही इतर यशस्वी विद्यार्थ्यांची नावं आहेत.
प्रिलिममध्ये दोनदा अपयश, तिसऱ्या प्रयत्नात थेट 25 वा रँक
काश्मिरा संखे या व्यवसायाने डॉक्टर आहेत. हा त्यांचा तिसरा प्रयत्न होता.
पहिल्या दोन प्रयत्नात त्या प्रिलिमचा टप्पा ओलांडू शकल्या नव्हत्या.
बीबीसी मराठीने त्यांच्याशी संवाद साधला.
“पहिल्या दोन प्रयत्नात माझा अप्रोच चुकला होता. दुसऱ्या प्रयत्नात थोडक्यात प्रिलिमची परीक्षा हुकली होती. तिसऱ्या प्रयत्नात मी त्या सगळ्या चुका सुधारल्या आणि दणक्यात मेहनत केली. मेन्ससाठी मी रोज 14-15 तास अभ्यास केला. लिहायचा भरपूर सराव केला. सादरीकरणावर भर दिला. त्यामुळे मेन्सही चांगली झाली.”
काश्मिरा यांना लहानपणापासूनच आयएएस व्हायची इच्छा होती. दंतवैद्यकाचं शिक्षण घेता घेता त्यांना या सेवेची व्यापकता आणखी मोठ्या प्रमाणावर कळली. शिक्षण होताच त्यांनी या परीक्षेचा अभ्यास करायला सुरुवात केली.
त्यांच्या मते परीक्षेचा प्रत्येक टप्पा महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक टप्प्याचं वेगळं महत्त्व आहे. मेन्समध्ये उमेदवाराचं खरं व्यक्तिमत्त्व कळतं. मुलाखतीत अतिशय संयत राहणं आवश्यक आहे असं त्या म्हणतात.
काश्मिरा यांची पहिली पसंती IAS ही आहे.
भारतातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या इशिता किशोर यांनी ट्विटरवर त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. हे यश अपेक्षित होतं. पण पहिली येईन असं वाटलं नव्हतं असं त्या म्हणाल्या.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
शुभाली परिहार यांनी सुद्धा या परीक्षेत यश मिळवलं. हा त्यांचा पाचवा प्रयत्न होता. सध्या त्या राज्य कर निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. 2015 मध्ये इंजिनिअरिंग झाल्यावर त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. आधीच्या काही प्रयत्नांमध्ये त्यांचा अभ्यास कमी पडला. तरीही त्यांनी जिद्द सोडली नाही. याचदरम्यान त्यांच्या आईचं कॅन्सरने निधन झालं. या यशाचं क्रेडिट त्यांच्या आईचं आहे असं त्या सांगतात.

फोटो स्रोत, Shubhali Parihar
शुभाली परिहार यांचा नवरा सुद्धा फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये आहे. सासर आणि माहेर दोन्ही कुटुंबाचा त्यांना पाठिंबा मिळाल्याचं त्या आवर्जून सांगतात. प्रवास मोठा होता पण चिकाटीने त्यांनी तो पूर्ण केला.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








