चंद्रयान-3 : चंद्राचा तुमच्या मूडवर काय आणि कसा परिणाम होतो?

फोटो स्रोत, Getty Images
डेव्हीड एव्हरी हे अमेरिकेतील सिअटल शहरात एक मनोविकारतज्ज्ञ आहेत. त्यांच्याकडे एक व्यक्ती आली.
तिला एक विचित्र आजार होता. तो एक अभियंता होता. त्याची आणि डेव्हिड यांची 2005 साली एकदा भेट झाली होती.
त्याच्या मनात विचित्र विचार यायचे. कधी त्याला आत्महत्या करावीशी वाटे तर कधी त्याला चंद्रावर जावंसं वाटे. त्या माणसाची झोपही नीट होत नव्हती.
कधी त्याला रात्ररात्रभर झोप यायची तर कधी त्याला दिवसात 12-12 तास झोप येई.
तो अभियंता असल्यामुळे तो या सगळ्या गोंधळाचा हिशेब ठेवत होता.
डेव्हिड एव्हरी यांनी त्याने सांगितलेल्या लक्षणांचा नीट विचार केला. तेव्हा त्याची झोप आणि मूडवर होणारा परिणाम यांचा समुद्राच्या भरती-ओहोटीसारख्या बदलांचा सरळ संबंध असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

फोटो स्रोत, Getty Images
भरती ओहोटीचा त्याच्यावर परिणाम होत होता. भरती आली की त्याला त्या रात्री झोप येत नसे.
सुरुवातीला डेव्हिड एव्हरी यांनी त्या व्यक्तीच्या सर्व गोष्टींना नाकारलं होतं. त्यानं ठेवलेल्या रेकॉर्डकडे दुर्लक्ष केलं होतं.
माणसाच्या आयुष्यावर चंद्राचा परिणाम
त्यानंतर 12 वर्षांनी प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ थॉमस वेहर यांनी अशाच प्रकारच्या 17 रुग्णांसंदर्भात संशोधनपत्रिका प्रकाशित केली होती.
हे लोक एका ठराविक अंतराने नैराश्यात जायचे तर कधी अत्यानंदाच्या पातळीवर जायचे.
त्याचं सामान्य असणं आणि नैराश्यात जाण्याचं चक्र यांचा थेट संबंध चंद्राच्या वाढण्या-कमीहोण्याशी (कलांशी) असल्याचं दिसलं.
प्राचिन काळापासून माणसावर असा चंद्राचा परिणाम होत आलेला आहे. अशास्थितीत काही लोकांच्या वागण्यावर त्याचा प्रभाव दिसत होता, ही स्थिती काही मनोविकारतज्ज्ञांसाठी फार आश्चर्यकारक नव्हती.
इंग्रजी शब्द लुनैसी (Lunacy) चा अर्थ वेडेपणा असा होता. हा लॅटिन भाषेतला शब्द लुनैटकस (lunaitcus) मधून आलेला आहे. त्याचा अर्थ चंद्राचा प्रभाव होतो अशी व्यक्ती असा होतो.
चंद्रामुळे...
युनानी विचारवंतर अरस्तू आणि रोमन अभ्यासक प्लिनी द एल्डर यांनाही वेडेपण आणि फिट्सचे अटॅक चंद्रामुळे येतात असं वाटायचं.
गर्भवती पौर्णिमेलाच मुलांना जन्म देतात असं मानलं जायचं, मात्र त्यासाठी कोणतंही रेकॉर्ड उपलब्ध नाही. तसेच मानसिक आजार असणाऱ्या रुग्णांना पौर्णिमेलाच जास्त त्रास होतो, या समजुतीवरही अभ्यास झालेला नाही.
अर्थात एका अभ्यासानुसार पौर्णिमेला घराबाहेर होणाऱ्या गुन्ह्यांत वाढ होते असं म्हटलेलं आहे. चंद्राचा आपल्या झोपेवर काय परिणाम होतो यावर भरपूर अभ्यास झालेला आहे.
पौर्णिमेच्या आसपास लोकांना झोप यायला वेळ लागतो आणि ते झोपतातही कमी असं म्हणतात.
अमावस्येची रात्र
अर्थात ऑक्सफर्ड विद्यापीठातील व्लादिस्लाव व्याजोवस्कीसारखे निद्रातज्ज्ञ या निरीक्षणांना, आकडेवारीला पुरेसे मानत नाहीत.
त्यांच्यामते यावर मोठं संशोधन होण्याची गरज आहे.
अमेरिकन मनोविकारतज्ज्ञ विल्यम वेहर यांनी संदर्भात संशोधन केलेलं होतं आणि त्यांनी रुग्णांच्या वागण्यावर दीर्घकाळ लक्ष ठेवलं.
तेव्हा त्यांना वागण्यातलं असं वर-खाली होणं हे चंद्राच्या आकाराच्या कमी-अधिक होण्याशी संबंधीत असल्याचं निरीक्षण केलं.
चंद्राचा पृथ्वीवर अनेकप्रकारे परिणाम होतो.
अमावस्येची रात्र गडद काळी, सर्वाधिक अंधारी असते. याशिवाय चंद्राच्या मोठं होणं-कमी होण्यावर भरती-ओहोटीही अवलंबून असते.
चिडचिड्या स्वभावाचे लोक
या रुग्णांचं वागणंही 206 दिवसांनी बदलल्याचं दिसून येतं. कारण प्रत्येक 206 दिवसांनी सुपरमून असतो. (चंद्र पृथ्वीच्या जवळ आला की त्या घटनेला सुपर मून म्हणतात. 14 पट जवळ आल्यामुळे तो मोठा दिसतो.)
स्वित्झर्लंडच्या बेसेल विद्यापिठातील मानसशास्त्र विभागातील तज्ज्ञ विर्ज-जस्टीस यांचाही यावर विश्वास होता. पण यामागचं कारण त्यांना माहिती नव्हतं.

फोटो स्रोत, Getty Images
एन विर्ज- जस्टिस यांच्यामते पौर्णिमेच्या रात्री लोकांना योग्यप्रकारे झोप येत नाही आणि ते चिडचिडे होतात.
आपल्या शरीराच्या जैविक घड्याळावर चंद्राच्या कला वाढणं किंवा कमी होणं यांचा खोल परिणाम असतो त्यामुळे त्याचं 24 तासाचं घड्याळ प्रभावित होत असतं.
झोप न आल्यामुळे अनेक लोक नैराश्यात जाऊ शकतात.
अर्थात वेहर यांच्यामते आजच्या काळात इतका कृत्रिम प्रकाश उपलब्ध असतो की त्यामुळे चंद्राचा शरीराच्या त्या जैविक घड्याळावर एवढा परिणाम होणं संयुक्तिक वाटत नाही.
पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र
अशा स्थितीत कदाचित चंद्राचं गुरुत्वाकर्षण लोकांच्या वागण्यावर अधिक परिणाम करत असावं. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रावर परिणाम होतो असं मानलं जातं.
काही लोक याबाबतीत अधिक संवेदनशील असतात. त्यांच्या वागण्यावरही चंद्राचा प्रभाव पडतो.
लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजचे रॉबर्ट व्हिक्स सांगतात, समुद्राच्या पाण्यात क्षार असतात, त्यामुळे विद्युत तरंग प्रबावित होतात. त्याचा संबंध पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी असतो.

फोटो स्रोत, Getty Images
काही संशोधनात सूर्याच्या भ्रमणाचा हृदयरोगाचा झटका, फिट्स, भिती, आत्महत्येशी असल्याचं दिसलं आहे. कारण त्यामुळे विद्युत तरंग निर्माण होतात.
काहीवेळा त्यामुळे पॉवर ग्रीडही बंद पडतात. त्यामुळेच त्याचा हृदय आणि डोक्यावर परिणाम होतो असं काही तज्ज्ञ मानतात.
क्रिप्टोक्रोमची महत्त्वाची भूमिका
अर्थात यावर आतापर्यंत फारच मर्यादित संशोधन झालं आहे. काही किडे, पक्षी, मासे यांच्यावरही चुंबकीय संवेदना असतात, मात्र माणसांमध्ये हा गुण नसतो.
मात्र एका संशोधनानुसार माणसांवरही चुंबकीय क्षेत्राचा प्रभाव होतो असं दिसलं आहे. त्याचं आपल्या आयुष्यात किती महत्त्व आहे याबद्दल विशेष माहिती उपलब्ध नाही.

फोटो स्रोत, Getty Images
चुंबकीय तरंगांनी आपल्या मेंदूच्या क्रियांवर किती प्रभाव होतो हे निश्चित. वेहरसुद्धा या चुंबकीय क्षेत्राचा विचार करतात. एका माशीच्या आत विशिष्ट प्रोटिन असतं. त्याला क्रिप्टोक्रोम असं नाव आहे.
हे प्रोटिन चुंबकीय सेन्सरचं काम करतं. आपल्या शरीरात जे जैविक घड्याळ असतं त्यातही क्रिप्टोक्रोमची महत्त्वाची भूमिका असते.
चंद्राचं गुरुत्वाकर्षण
प्रत्येक पेशीत असलेलं हे जैविक घड्याळ मेंदूतल्या मुख्य घड्याळाद्वारे संचलित होतं.
जेव्हा क्रिप्टोक्रोम प्रोटिन फ्लेविन नावाच्या घटकाशी संयोग करतं तेव्हा आता दिवस असल्याचा संदेश आपल्या शरीरातल्या जैविक घड्याळाला जातो. काही माशांवर चुंबकीय किरण टाकली तेव्हा त्यांच्या जैविक घड्याळात बदल झालेला दिसला, त्यांची झोपही विस्कटली. मात्र माणसात क्रिप्टोक्रोम हे माश्यांपेक्षा वेगळ्या पद्धतीने काम करतं.

फोटो स्रोत, Getty Images
जर असं मानवाशीही होत असेल तर वेहर आणि एव्हरी यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या रुग्णांचं निरीक्षणाबद्दलचं अनुमान यशस्वी झालं म्हणता येईल.
अशा स्थितीत वेहर आणि एव्हरी यांच्या रुग्णांवर चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव होतो आणि त्याने त्यांचा मूड प्रभावित होत होता असा तर्क मांडला जाऊ शकतो.
रुग्णांच्या डोक्यावर प्रभाव
अराबडॉप्सिस थॅलियाना नावाच्या एका झाडावर केलेल्या संशोधनात त्याच्या मुळांचा विकास चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या फिरण्यानुसार होतो असं दिसलं आहे.
कारण ते पाण्यात वाढतं. पाण्याच्या प्रवाहावर चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा प्रभाव असल्याचं दिसलं आहे.
आता जर झाडाच्या पेशींवर चंद्राच्या चक्राचा परिणाम होतो तर माणसाच्या पेशींवरही परिणाम होत असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा त्यांच्या रुग्णांच्या मेंदूवर परिणाम होतो असं वेहर मानतात, आणि यात दुमत नाही. यावर अधिक संशोधन व्हावं असं त्यांना वाटतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








