धोनीचे आडाखे आणि अश्विनचं भाकीत ठरलं खरं, चेन्नईच विजयी!

महेंद्रसिंग धोनी, चेन्नई सुपर किंग्स, गुजरात टायटन्स

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, महेंद्रसिंग धोनी

कोणत्याही मोठया स्पर्धेच्या फायनलमध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारावी. मोठी धावसंख्या पटावर नोंदवावी आणि नंतर त्या धावसंख्येचा बचाव करावा हे पारंपरिक तत्व. असंख्य फायनलमध्ये हे तत्व सिद्धही झालं आहे.

पावसामुळे तिसऱ्या दिवसापर्यंत गेलेल्या आयपीएलच्या 16व्या हंगामात महेंद्रसिंग धोनीने वेगळा विचार करुनही जिंकता येतं हे सिद्ध केलं.

धोनीने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या निर्णयाबद्दल बोलताना धोनी म्हणाला, पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पाऊस नेमका कधी येईल माहिती नाही. पण पाऊस येऊ शकतो हे लक्षात घेऊनच गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

रविवारी लढत रद्द होऊनही सोमवारी पुन्हा मैदानात पाठिंबा द्यायला आलेल्या चाहत्यांचे धोनीने आभार मानले.

धोनीच्या निर्णयाने अनेकांच्या भुवया उंचावल्या. इतक्या महत्त्वपूर्ण लढतीत गोलंदाजी कशी स्वीकारली अशी चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली.

गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने मला फलंदाजीच करावी असं वाटत होतं. चेन्नईने गोलंदाजीचा निर्णय घेतल्याने माझ्या मनासारखं झालं आहे असं नाणेफेकीवेळी बोलताना सांगितलं.

महेंद्रसिंग धोनी, चेन्नई सुपर किंग्स, गुजरात टायटन्स

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रवींद्र जडेजा

भरीस भर म्हणजे चेन्नईचं क्षेत्ररक्षण लौकिकाला साजेसं झालं नाही. दुसऱ्याच षटकात तुषार देशपांडेच्या गोलंदाजीवर दीपक चहरने प्रचंड फॉर्मात असलेल्या शुबमन गिलचा झेल सोडला. त्यानंतर दीपक चहरने स्वत:च्याच गोलंदाजीवरही एक झेल सोडला. रवींद्र जडेजासारख्या अफलातून क्षेत्ररक्षकाकडून रनआऊटची एक संधी हुकली.

गुजरातला शुबमन गिल आणि वृद्धिमान साहा यांनी दमदार सलामी दिली. गिल धोनीच्या अफलातून स्टंपिंगमुळे माघारी परतला. पण यानंतर साहाला साई सुदर्शनची साथ मिळाली. अनुभवी साहाने अर्धशतक पूर्ण केलं. सुरुवातीच्या टप्प्यात 9 चेंडूत 6 धावा करणाऱ्या साई सुदर्शनने उत्तरार्धात चेन्नईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला.

गुजरातने 20 षटकांत 214 धावांचा डोंगर उभारला. सुदर्शनने 47 चेंडूत 8 चौकार आणि 6 षटकारांसह 96 धावांची खेळी केली. कर्णधार हार्दिक पंड्याने 12 चेंडूत 21 धावा केल्या. एवढं प्रचंड लक्ष्य कसं पेलणार ही चिंता चेन्नईच्या चाहत्यांच्या मनात होती. पावसाचं आगमन झालं आणि दोन तास खेळ खंडित झाला. पाऊस थांबून आणि खेळपट्टी आणि परिसर खेळायला सुरक्षित होईपर्यंत बराच वेळ गेला. खेळ सुरू झाला तेव्हा चेन्नईला 15 षटकात 171 धावांचं सुधारित लक्ष्य मिळालं.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

पावसामुळे गोलंदाजांना बॉलवर ग्रिप पकडणं कठीण होतं. कारण चेंडू ओलसर असतो. पावसाची शक्यता असताना लक्ष्य किती आहे हे माहिती असणं फायदेशीर असतं. धोनीने या दोन्हीचा पुरेपूर विचार केला होता. संपूर्ण स्पर्धेत सातत्याने चांगली कामगिरी करणारे गुजरातचे गोलंदाज फायनलमध्ये मात्र असहाय्य ठरले. चेन्नईच्या प्रत्येक फलंदाजांने गुजरातच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. डावखुरा फिरकीपटू नूर अहमद आणि मोहित शर्माच्या काही चेंडूचा अपवाद वगळता गुजरातच्या गोलंदाजांसाठी फायनल निराशाजनक ठरली.

भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू आणि राजस्थान रॉयल्सतर्फे खेळणाऱ्या रवीचंद्रन अश्विनने चेन्नईच्या विजयासंदर्भात अचूक भाकीत केलं होतं. पावसामुळे षटकं कमी झाली, सगळ्या विकेट्स हातात, ओला चेंडू आणि निसरडं आऊटफिल्ड- याचा अर्थ चेन्नई पाचव्या जेतेपदाच्या दिशेने असं सूचक ट्वीट अश्विनने सोमवारी रात्री 10.24 मिनिटांनी केलं होतं. तीन तासात अश्विनची भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)