अवयवदान: 'माझ्या मुलीला गोळ्या घातल्या, पण अवयवरुपात ती जिवंत आहे'

फोटो स्रोत, ANKIT SRINIVAS/BBC
गेल्या वर्षी भारतात एका सहा वर्षाच्या मुलीवर गोळीबार झाला. या दुर्देवी घटनेत त्या चिमुरडीने जीव गमावला. लेक गमावल्याचं दु:ख पदरी पडलेल्या पालकांनी एक स्तुत्य निर्णय घेतला. त्यांनी अवयवदानाचा निर्णय घेतला.
भारतात फारच कमीजण असा निर्णय घेतात. यंदाच्या वर्षी जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून भारत चीनला मागे टाकणार आहे पण अवयवदानाच्या मुद्यावर भारत जगात 62व्या स्थानी आहे.
बीबीसीने यासंदर्भात रोम गाठलं जिथे तीन दशकांपूर्वी अवयवदानासाठी एक चळवळ उभी राहिली. एका मुलाचा अंदाधुंद गोळीबारात मृत्यू झाला. त्यातूनच अवयवदानाची मोहीम सुरु झाली.
रॉली प्रजापती गेल्या वर्षी दिल्लीत एप्रिल महिन्यात भावाबहिणींसह शांतपणे झोपली होती. बाजूच्या खोलीत तिचे आईवडील स्वयंपाक करत होते. त्यावेळी एक स्फोटासारखा आवाज झाला. मग किंकाळ्या ऐकू आल्या.
ते दोघे धावत मुलं झोपलेल्या खोलीच्या दिशेने धावले, आईवडिलांचा धावा करत असलेली रॉली बेशुद्ध पडली.
तिच्या उजव्या कानातून रक्त येत असल्याचं पाहून पालकांना काहीतरी भयंकर घडलंय याची जाणीव झाली. नोएडातल्या त्यांच्या घरी एक बंदुकीची गोळी तिच्या कानात घुसली होती.

फोटो स्रोत, ANKIT SRINIVAS/BBC
रॉलीला घेऊन आईवडिलांनी रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतली. पण डॉक्टरांनी तिला ब्रेनडेड घोषित केलं.
नोएडा पोलिसांनी याप्रकरणी कोणी संशयित आरोपी नसल्याचं सांगितलं. गोळी कुठून आली आणि कोणी गोळीबार केला याचा पोलीस तपास करत आहेत.
रॉलीच्या आईवडिलांसाठी हा उद्धवस्त करणारा क्षण होता. शांतपणे झोपलेली मुलगी अचानकच निघून गेली. आयुष्यातला सगळ्यात दुर्देवी काळ अनुभवणाऱ्या रॉलीच्या आईवडिलांनी एक निर्णय घेतला, तो निर्णय म्हणजे देहदानाचा.
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अर्थात एम्स इथे अवयवदान करणारी रॉली ही सगळ्यात लहान वयाची मुलगी ठरली. रॉलीचे बाबा हरनारायण प्रजापती यांनी सांगितलं की देहदानाचा निर्णय इतका सोपा नव्हता.
त्यांनी सांगितलं, काय करावं काहीच कळत नव्गतं.अख्खी रात्र मी विचार करत राहिलो. आम्हाला विचार करायला आणखी वेळ हवा असं डॉक्टरांना सांगितलं.

फोटो स्रोत, ANKIT SRINIVAS/BBC
अखेर आम्ही तो अवघड निर्णय घेतला. माझ्या मुलीच्या अवयवांनी कोणाचं आयुष्य वाचू शकतं या विचारातून तो निर्णय घेतला. आमची मुलगी त्या युवा लोकांच्या शरीराच्या माध्यमातून जिवंत आहे. आमची मुलगी अशीच मोठी होईल.
रॉलीच्या दोन्ही किडन्या देव उपाध्याय नावाच्या 14वर्षीय मुलाला देण्यात आल्या. देवला दोन किडन्या मिळणं हा आमच्यासाठी चमत्कार होता असं त्याच्या आईवडिलांनी सांगितलं.
दोन किडन्या मिळाव्यात यासाठी ते चार वर्ष प्रतीक्षा करत होते. रॉलीच्या आईवडिलांच्या निर्णयामुळे आमचं आयुष्यच बदलून गेलं आहे. रॉलीच्या किडन्यांमुळे देवला संजीवनीच मिळाली आहे.
रॉलीचं लिव्हर सहा वर्षांच्या मुलाला देण्यात आलं. तिचं हृदय हे एक आणि चार वर्षाच्या मुलाच्या शरीरात बसवण्यात आलं. रॉलीच्या डोळ्यावरील आवरण 35 आणि 71 वर्षांच्या माणसाला देण्यात आलं.

फोटो स्रोत, REG GREEN
रॉलीप्रमाणेच निकोलस ग्रीनचंही झालं.
इटलीतला 7वर्षांचा निकोलस घरच्यांबरोबर सुट्टीवर गेला होता. सप्टेंबर 1994 मध्ये चुकीच्या ओळखीतून त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला.
निकोलसचे पालक मॅगी आणि रेग यांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. रेग यांनी अवयवदानासंदर्भात जागृतीचं काम केलं होतं.
1993मध्ये म्हणजे निकोलसवर हल्ला झाला त्यापूर्वी एक वर्षाआधी इटलीत एक दशलक्ष लोकसंख्येपैकी 6.2 लोकांनी अवयवदान केलं होतं. 2006 पर्यंत हे प्रमाण दशलक्षामागे 20 एवढं झालं होतं.
1999मध्ये इटलीने ऑप्ट आऊट प्रणाली अंगीकारली. याद्वारे सर्व प्रौढ नागरिक दाते होतात. जोपर्यंत अवयवदान करणार नाही असं ते स्वत: सांगत नाहीत तोवर ते अवयवदानासाठी पात्र ठरतात.
सर्वसामान्य माणसांच्या मनात अवयवदानाबद्दल जागरुकता निर्माण करण्याचं महत्त्वाचं काम यातून झालं. निकोलसच्या उदाहरणातून बोध घेत अनेकांनी अवयवदान केलं.
भारतातही अशी चळवळ उभी राहील अशी आशा आहे.

भारतीय डॉक्टर डॉ. दीपक गुप्ता हे रोमला गेले आणि त्यांनी रेग आणि अवयवदानाशी संबंधित तज्ज्ञांची भेट घेतली. डॉ. गुप्ता यांनीच रॉलीच्या पालकांना अवयवदानाबद्दल सुचवलं होतं. रॉलीच्या आईवडिलांनी याबद्दल ऐकलंही नव्हतं.
निकोलसच्या उदाहरणातून त्यांनी अवयवदानाने अनेकांच्या आयुष्यात किती निर्णायक बदल घडू शकतो हे दाखवून दिलं.
रॉलीचे आईवडील निरक्षर आहेत. त्यामुळे डॉ. गुप्ता यांनी सविस्तरपणे समजावून सांगितलं.
डोक्याला मार लागून भारतात दर तीन मिनिटाला एका माणसाचा मृत्यू होतो असं द लॅन्सेट न्यूरॉलॉजी कमिशनने म्हटलं आहे. डॉ. गुप्ता यांच्या मते अवयवदानासाठी मोठी संधी आहे.
2000 पासून भारतात दरवर्षी 700 ते 800 नागरिकांनी अवयवदान केलं आहे. भारताची लोकसंख्या 136 कोटीच्या आसपास आहे.
धर्म तसंच घरातल्या ज्येष्ठ सदस्यांनी घेतलेली कर्मठ भूमिका यामुळे अवयवदानाला परावृत्त केलं जातं असं डॉ. गुप्ता यांनी केलेल्या सर्वेक्षणात समोर आलं आहे.
रॉलीच्या मृत्यूनंतर दिल्लीतल्या एम्स इथे गेल्या पाच वर्षात झालेल्या अवयवदानांपेक्षा अधिक प्रमाणात अवयवदान झालं आहे.

2022 मध्ये देशात अवयवदानाची संख्या 846 आहे. आतापर्यंतचा हा सर्वाधिक आकडा आहे असं नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशनने स्पष्ट केलं. डॉ. गुप्ता यांच्या मते हा निर्णायक टप्पा आहे.
अवयवदान करणाऱ्यांची संख्या वाढेल याची मला खात्री आहे. मी न्यूरोसर्जन आहे आणि आत्मविश्वास माझ्या रक्तात आणि पेशींमध्ये आहे. बदल घडवून आणण्याची क्षमता आपल्या सगळ्यांमध्ये उपजतच असते.
बदल घडवून आणण्याच्या प्रक्रियेतला मी एक छोटा ठिपका आहे असं डॉ. गुप्ता म्हणाले.
94वर्षीय रेग जेव्हा लॉस एंजेलिसहून इटलीला जातात तेव्हा ते निकोलसने अवयवदान केलेल्या लोकांना भेटतात. अवयवदानामुळे नवं आयुष्य मिळालेल्या महिलांना भेटले.
शाना पारिसेला यांचा भाऊ डेव्हिडे याचा मार्च 2013मध्ये गाडीच्या अपघातात मृत्यू झाला. त्याचं हृदय अना इक्विंटा यांना प्रत्यार्पित करण्यात आलं.
प्रत्यापर्णाला 9 वर्ष झाल्यानंतर अनाने हृदय देणाऱ्या कुटुंबाचा शोध घ्यायला सुरुवात केली. तिची शानाशी भेट झाली. त्यांचे ऋणानुबंध घट्ट झाले. शाना अनाची बहीणच झाली.
शाना 140 किलोमीटरचं अंतर पार करुन फोंडीहून रोमला गेल्या. अनेकांसाठी अनुकरणीय ठरलेल्या व्यक्तीला भेटणं खूपच प्रेरणादायी आहे असं तिने सांगितलं.
अना म्हणाली, हृदय मिळालेल्या व्यक्तीसाठी भावनिक आंदोलनं होतात कारण ज्यांचा माणूस गेलाय त्यांच्यासाठी ते दु:ख खूपच असतं. ज्याच्या शरीरात नवा अवयव प्रत्यार्पित झाला आहे त्याच्यासाठी ही संजीवनी असते.
मला ते सहजतेने भेटले आणि माझं त्यांच्याशी जवळचं नातं निर्माण झालं. माझ्यासाठी तो आयुष्यातला सर्वोत्तम असा सुखद धक्का होता आणि अनोखी भेटही.
मला त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करायची होती. मी त्यांच्याप्रती ऋणी आहे, मला आयुष्यभरासाठी जो ठेवा मिळाला आहे त्याची मी उतराई होऊ शकत नाही.
अवयवदानात स्पेन अग्रणी आहे. याचं कारण स्पेनमध्ये अनेक डॉक्टरांनी प्रत्यार्पण समन्वयवक म्हणून प्रशिक्षण घेतलं आहे. ते देशातल्या आघाडीच्या रुग्णालयांमध्ये कार्यरत आहेत.
समाजातील बहुसंख्य लोकांचा सहभाग नसेल तर अवयवदान कठीण होऊन बसतं असं माद्रिदमधल्या ग्रेगोरिओ मॅरानॉन विद्यापाठीचे ट्रान्सप्लांट संचालक जोस ल्युईस एस्कलांटे यांनी सांगितलं.
2021 मध्ये दोन दशकात पहिल्यांदाच अमेरिकेने अवयवदानाच्या बाबातीत स्पेनला मागे टाकलं. अमेरिकेत एक लाखाहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. अवयवदानात इटली नवव्या तर युके 13व्या स्थानी आहे. मे 2020 मध्ये युकेने ऑप्ट आऊट पद्धती अंगीकारल्याने आता तिथला प्रत्येक प्रौढ अवयवदानासाठी पात्र आहे.
नवी प्रणाली लागू झाल्यानंतर जवळपास 300 लोकांनी अवयवदान केलं. स्कॉटलंडनेही ही पद्धती अंगीकारली. वेल्सने 2015 मध्ये ही व्यवस्था स्वीकारली होती.
रोमला भेट झाल्यानंतर रेग मेसिना इथे गेले. 24 वर्षीय निकोलसला भेटले. मारिया पिआ पेडला यांचा तो मुलगा. तो कोमात असताना त्याला निकोलसचं लिव्हर देण्यात आलं. 29 वर्षांपूर्वी हे प्रत्यारोपण झालं होतं.
मी मरेन तेव्हाच यामुद्यावर बोलायचा थांबेन. मी 94 वर्षांचा आहे, मी अवयवदानाविषयी काम उशिराने सुरु केलं.
बोलून बोलून घशाला टॉन्सिल्सचा त्रास होईल असं वाटतं पण फक्त बोलून जर कोणाचं आयुष्य बदलणार असेल तर तो विचार मला रोज प्रेरित करतो.
अतिरिक्त वृत्तांकन अंकित श्रीनिवास
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








