30 वर्षांपूर्वीच्या गर्भातून अशी जन्मली जुळी मुलं

जुळे

फोटो स्रोत, NATIONAL EMBRYO DONATION CENTER

    • Author, सॅम कॅब्राल
    • Role, बीबीसी न्युज

अमेरिकेतील टेनेसी राज्यात 30 वर्षांपूर्वी एक गर्भ गोठवण्यात आला होता. आता या गोठवलेल्या गर्भातून दोन जुळी बाळं जन्माला आली आहेत.

असं म्हटलं जातंय की, आजवर सर्वात जास्त काळासाठी गोठवलेल्या अशा गर्भातून बाळं जन्माला येणं एक प्रकारचा विक्रमचं आहे. 

हा गर्भ 22 एप्रिल 1992 रोजी -128 (-200F) सेल्सिअसला गोठवण्यात आला होता.

अमेरिकेच्या ओरेगॉनमध्ये राहणाऱ्या रॅचेल रिजवेने 31 ऑक्टोबर रोजी या जुळ्या मुलांना जन्म दिला. रॅचेल आधीच चार मुलांची आई आहे. रॅचेलचे पती फिलिप रिजवे म्हणाले की, त्यांना या सगळ्याचं खूप आश्चर्य वाटलंय.

नॅशनल एम्ब्रियो डोनेशन सेंटर (NEDC) च्या म्हणण्यानुसार, लिडिया आणि टिमोथी रोनाल्ड रिजवे यांनी एका नवा विक्रम रचलाय. दान केलेल्या गर्भातून जवळपास 1,200 हून अधिक मुलांना जन्म देण्यात आला आहे.

नॅशनल एम्ब्रियो डोनेशन सेंटरचा याआधीचा रेकॉर्ड पाहायला गेलं तर 2020 मध्ये मॉली गिब्सनचा जन्म झाला होता. ती 27 वर्षांपासून गोठलेल्या गर्भातून जन्माला आली होती.

जर भविष्यात असा कुणाला निर्णय घ्यायचा असेल की गोठवलेल्या गर्भाच्या माध्यमातून पाच, दहा, वीस वर्षांनी बाळांना जन्म द्यायचा त्यांच्यासाठी ही सकारात्मक बातमी आहे, असं डॉ. जॉन गॉर्डन यांनी सांगितलं. त्यांनीच ही गर्भ स्थलांतराची प्रक्रिया पार पाडली.

'त्याचं उत्तर होय असं आहे'

आयव्हीएफच्या मदतीने एका निनावी जोडप्यासाठी हा जुळ्या मुलांचा गर्भ तयार करण्यात आला होता. या जोडप्यातील पुरुष पन्नाशीचा होता आणि तो 34 वर्षांच्या स्त्रीबीजदात्यावर अवलंबून होता.

त्यानंतर तयार झालेला गर्भ 2007 पर्यंत अमेरिकेच्या वेस्ट कोस्टवरील फर्टिलिटी लॅबमध्ये साठवून ठेवण्यात आला होता. त्यानंतर हा गर्भ भविष्यात इतर कोणत्यातरी जोडप्याला वापरता येईल म्हणून नॉक्सव्हिल, टेनेसी येथील एनइडीसीला दान केला.

एनइडीसीचं पार्टनर क्लिनिक साउथईस्टर्न फर्टिलिटीमधील एम्ब्रियोलॉजिस्टने यावर्षी एका स्त्रीच्या गर्भाशयात हा एम्ब्रियो एंप्लान्ट केला.

एनईडीसीने प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात म्हटलंय की, या बातमीमुळे इतरांनाही गर्भ दत्तक घेण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.

रॅचेल रिजवेला याआधीच चार मुलं असून ही एक ते आठ वर्षे वयोगटातील आहेत. आत्ता झालेली जुळी मुलं पहिल्यांदाच आयव्हीएफच्या माध्यमातून झालेली आहेत.

जेव्हा लिडिया आणि टिमोथी यांच्यात देवाने प्राण टाकले तेव्हा मी केवळ पाच वर्षांचा होतो, तेव्हापासून त्यांना सुरक्षित ठेवण्यात आलं होतं. असं फिलिप रिजवेनी सीएनएनला सांगितलं.

"त्यामुळे ही आमची सर्वात लहान मुलं असली तरी ती सर्वात पहिली मुलं आहेत असं म्हणायला हवं."

हे काळजाला भिडणारं असल्याचं फिलिप रिजवे म्हणाले.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)