You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
BBC मराठीचा 'राष्ट्र महाराष्ट्र' कार्यक्रम, महायुती सरकारच्या 100 दिवसांचा लेखाजोखा
महाराष्ट्रातील महायुती सरकारला 100 दिवस पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने BBC न्यूज मराठी 'राष्ट्र महाराष्ट्र' हा विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे.
या कार्यक्रमात मंत्री आणि नेते निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता, तसेच आगामी योजनांबाबत चर्चा करत आहेत.
शिवाय, विरोधी पक्षातील नेतेही विद्यमान सरकारच्या कामकाजाबाबत आपलं म्हणणं मांडत आहेत.
हा कार्यक्रम दुपारी 12 ते रात्री 9.30 या वेळेत मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे होत आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल लागून राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले. भारतीय जनता पार्टी, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी एकत्र येऊन हे सरकार स्थापन केलं.
आता या सरकाचे सत्तेत 100 दिवस पूर्ण झाले असल्यानं, या शंभर दिवसात केलेल्या कामाचा लेखाजोखा बीबीसी मराठीच्या या कार्यक्रमात मांडत आहेत. तसंच विरोधक त्यावर आपलं म्हणणं मांडत आहेत.
'राष्ट्र महाराष्ट्र' कार्यक्रमात राज्याच्या मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्री आणि विरोधी पक्षातील नेतेही उपस्थित आहेत.
- एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
- चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री
- उदय सामंत, उद्योगमंत्री
- पंकजा मुंडे, पर्यावरण मंत्री
- आदिती तटकरे, महिला बालकल्याण विकास मंत्री
हे राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्री उपस्थित आहेत. तर,
- जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते
- आदित्य ठाकरे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते
हे विरोधी पक्षाकडून आपलं म्हणणं मांडत आहेत.
बीबीसी न्यूज मराठीच्या सर्व सोशल प्लॅटफॉर्म, तसंच वेबसाईटवर हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येईल आणि अपडेट्स वाचता येतील.
तुम्हाला इथे पाहता येईल कार्यक्रम :
फेसबुकवर पाहण्यासाठी इथे क्लिक करा
युट्यूबवर पाहण्यासाठी इथे क्लिक करा
वेबसाईटवर पाहण्यासाठी आणि अपडेट वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या श्रोत्यांना थेट प्रश्नही विचारण्याची संधी मिळत आहे. शिवाय, सोशल प्लॅटफॉर्मवरूनही कमेंट्समधून प्रेक्षक, वाचकांना प्रश्न विचारता येत आहे.