बशर अल-असद सीरिया सोडून पळाल्यानंतर त्यांच्या घरात घुसून लोकांनी काय केलं, पाहा
बशर अल-असद सीरिया सोडून पळाल्यानंतर त्यांच्या घरात घुसून लोकांनी काय केलं, पाहा
बशर अल-असद यांनी सीरिया सोडल्यानंतर राजधानी दमास्कसमधील राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानात सीरियन नागरिकांनी घुसून नासधूस केली.
या ठिकाणी बीबीसीला रिकाम्या खोल्यांमध्ये सामान आणि फर्निचर फेकलेले दिसले.
राष्ट्राध्यक्ष असद यांनी देश सोडल्याची पुष्टी रशियाने केली आहे आणि त्यांनी सरकारचा राजीनामा दिल्याचा दावा केला आहे. त्यांचा सध्याचा ठावठिकाणा माहीत नाही.