पार्ट टाईम जॉबचं आमिष दाखवून फसवणाऱ्या वेबसाईट्सपासून कसं सावध राहायचं?

पार्ट टाईम जॉबचं आमिष दाखवून फसवणाऱ्या वेबसाईट्सपासून कसं सावध राहायचं?

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, पूर्णिमा तम्मीरेड्डी
    • Role, बीबीसीसाठी

राकेश महाविद्यालयीन शिक्ष घेतोय. स्वखर्चासाठी कुटुंबीयांवर अवलंबून राहण्याऐवजी छोटी-मोठी कामं करून त्यातून पैसे मिळवण्याचा त्याचा प्रयत्न असतो.

एकेदिवशी राकेशला व्हॉट्सअॅपवर मेसेज आला की, “आम्ही अर्धवेळ नोकरी (पार्ट टाईम जॉब) देत ​​आहोत. या लिंकवर क्लिक करा.”

अनोळखी नंबरवरून येणार्‍या मेसेजेसवर विश्वास ठेवू नये, असं राकेशनं ऐकलं होतं. त्यामुळे त्यानं सतर्कता बाळगूनच रिप्लाय दिला.

राकेशनं कंपनीचे तपशील मागितले. काही मिनिटांतच ब्रँडेड कंपनीचे नाव, नोंदणी क्रमांक आणि पत्ता यासह सर्वकाही राकेशला समोरून पाठवलं गेलं.

इतकी माहिती मिळाल्यावर राकेशला त्यात तथ्य वाटू लागलं. मग त्यानं वेबसाईट (shopperstop.com) उघडली. तिथे त्याला काही ‘टास्क’ दिले गेले, ते त्याने पूर्ण केले. त्यानंतर वेबसाइटवरील त्याच्या खात्यात पैसे जमा झाले. राकेशने हे पैसे त्याच्या वैयक्तिक बँक खात्यात ट्रान्सफर केले.

मग आणखी काही कामं दिली गेली. मात्र, ही नवी कामं करण्यासाठी आधी तुम्हाला आधी काही पैसे गुंतवावे लागतील, असं समोरून सांगितलं गेलं.

काहीशे रुपये गुंतवल्यावर दुसऱ्याच दिवशी त्याचा काही हजारांमध्ये परतावा मिळाला. दिवसातून अर्धा तास त्या वेबसाईटवर ऑर्डर तपासण्याचं काम होतं आणि त्यातून हजारोत पैसा मिळू लागला.

मोठ्या कामांसाठी आणखी पैसे गुंतवण्यास सांगितलं गेलं. राकेशनं तीन-चारवेळा त्यांच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा करण्याचं धाडस केलं. तेव्हापासून “तुमची देय रक्कम : रु. xxxx, पण ते येण्यापूर्वी रु. yyyy” असे हजारो मेसेज येऊ लागले.

चोवीस तासांपेक्षा कमी कालावधीत 1500 रुपयांचे 30 हजारांवर पोहोचले. एवढं पैसे द्यायला तुम्हाला जमत नसेल, तर तुम्ही केलेल्या कामासाठी लागणारे सर्व पैसे तुम्हाला मिळणार नाहीत, असं सांगण्यात आलं.

तेव्हा मग राकेशनं हा प्रकार मित्राला सांगितला आणि हा घोटाळा समोर आला.

आर्थिक फसवणूक, नोकरी

फोटो स्रोत, Getty Images

‘घरातून काम करा आणि पैसे मिळवा’, किंवा ‘अर्धवेळ काम करून पैसे मिळवा’, अशा प्रकारांमधून फसवणुकीचे प्रकार काही नवे नाहीत.

या बातमीच्या सुरुवातील उल्लेख केलेली वेबसाईट (Shoppers68.com) शॉपर्सस्टॉप नामक दुकानाशी साधर्म्य साधणारं आहे. पण कंपनीला याबाबत विचारलं असता, त्यांच्याकडे या वेबसाईटचा तपशील सापडत नाही.

उलट शॉपर्सस्टॉपची वेबसाईट लॉग इन केल्यास ती बनावट साईट असल्याचे दिसून येते.

आर्थिक फसवणूक

फोटो स्रोत, PURNIMA T

विश्वास संपादन करण्याची पद्धत

बनावट वेबसाईट्सवरील इंग्रजी भाषाही विश्वासार्ह वाटावी इतकी योग्य आणि त्रुटीमुक्त असते.

या वेबसाईट्सवरून दिले गेलेले टास्कसुद्धा त्या कंपनीच्या वस्तूंशी संबंधितच असतात.

पैसे जमा करण्याच्या सर्व सुविधा त्या वेबसाईटवरच असतात. परिणामी बँक खात्याचा आपला तपशील त्यांना सहज मिळतो. त्यामुळे आपल्या खात्यातील शिल्लक रक्कम त्यांना कळत असते आणि नवनी ‘टास्क’ निवडण्याचे पर्याय देणं, हे त्यांना शक्य होतं.

शिवाय, कुणी शंका उपस्थित केलीच, तर त्यांची उत्तरं देण्यासाठी त्यांचे लोक व्हॉट्सअॅपवर उपलब्ध असतात. ते एखाद्या व्यावसायिकाप्रमाणे काम करतात. त्यामुळे शंका घेण्यास वावच उरत नाही.

त्यात पहिल्या दोन दिवसांच्या कामाचे पैसे लगेच आपल्या बँक खात्यात जमा होतात. त्यामुळे विश्वास बसू लागतो.

बनवाट कंपन्यांच्या संशयास्पद हालचाली

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

कुठल्याही कंपनीने अर्धवेळ नोकरीची ऑफर दिली, तर त्यावेळी काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवायला हव्यात, ज्यात पुढील गोष्टींचा समावेश होतो :

जरी अर्धवेळ नोकरी असली, तरी पगार कंपनीला द्यावा लागता. त्यामुळे अतिरिक्त कागदपत्रे आणि पडताळणीची आवश्यकता असतेच. त्यामुळे कुणीही केवळ नेट बँकिंगचे तपशील घेऊन त्यावर पगार पाठवत असेल, तर त्याबाबत सतर्क राहावं.

काम करण्यासाठी कुठलेही पैसे द्यावे लागणार नाहीत, असा नियम सांगितला जातो किंवा तुम्ही जितके काम कराल, तितका पैसा मिळेल, असं सांगितलं जातं. इथंच धोक्याची घंटा असते. तसंच, त्याही पुढे जाऊन सांगायचं झाल्यास, तुम्हाला पैसे गुंतवायला सांगितलं जातं, मग त्याचा परतावा मिळतो, मग आणखी पैसे गुंतवायला सांगितलं जातं आणि मग कमावलेले पैसेही गमावण्याची वेळ येते. अशा प्रकारांपासून सावध राहणं.

अनेकदा या बनावट कंपन्याच्या त्यांचे संपर्क क्रमांक आणि बँकेचे तपशील वारंवार बदलतात. संबंधित संपर्क क्रमांत आणि बँक खात्यावर घोटाळा म्हणून सिद्ध झाल्यावरही, ते नवीन क्रमांकानं पुन्हा कार्यरत होतात. या बदलत्या माहितीकडे डोळेझाक करू नये.

आर्थिक फसवणूक, नोकरी

फोटो स्रोत, PURNIMA T

फसवणूक टाळण्यासाठी काय केले पाहिजे?

Google/YouTube वर त्या विशिष्ट कंपनीबद्दल माहिती शोधा. गुगलवर हल्ली कंपन्यांना रेटिंग्ज असतात. कुणाची फसवणूक झाली असेल तर त्याबाबतही लिहिलेलं (फिडबॅक) असतं. ती माहिती जाणून घ्या.

आपल्याला कधी कधी अशा कंपन्या आकर्षक वाटू शकतात. पण हे मित्रांसोबत शेअर करा. ते तुम्हाला सावध करू शकतात. परिणामी संभाव्य धोक्यापासून वाचू शकता.

तुम्हाला जास्त पैसे जमा करण्यास सांगितलं जाईल, तेव्हा धोका ओळखून थांबण्याचा निर्णय घ्या. कारण या बनावट कंपन्या तुमचा विश्वास संपादन करण्यासाठी तुमच्या खात्यात 1500 ते 3000 रुपये टाकण्यास मागे-पुढे पाहत नाहीत.

आर्थिक फसवणूक, नोकरी, सायबर क्राईम

फोटो स्रोत, Getty Images

तरीही फसवणूक झाली तर...

  • इथे फसवलं जातंय, याच कुणकुण जरी लागली, तरी लगेच तिथून बाहेर पडा.
  • आपण किती पैसे पाठवले, किती समोरून येणं बाकी आहे, अशा आकडेवाडीत पडू नका. पुढचे नुकसान टाळण्यासाठी ते काम तिथंच थांबवा.
  • नंतर तुमच्या जवळच्या पोलिस स्टेशन/सायबर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवा. यामुळे हरवलेले पैसे परत येतील की नाही, हे सांगता येत नसले, तरी त्याची नोंद रेकॉर्डमध्ये होईल.
  • कोणताही विलंब न करता तुमचे सर्व बँक/फोन/सोशल मीडिया खात्याचे पासवर्ड त्वरित बदलणे. अशा गुन्हेगारांसाठी सर्वेक्षण करून फोन जप्त करणे हे मोठे काम नाही. म्हणून प्रथम ‘डिजिटल क्लीन्सिंग’ म्हणजे प्रत्येक खात्याचा पासवर्ड बदला, ब्राउझरमधील कॅशे (कॅशे) काढून टाका आणि स्थापित अॅप्स, असल्यास, काढून टाका आणि संपूर्ण गोष्ट साफ करा.
  • या संपूर्ण घटनेत तुम्ही बळी आहात हे विसरू नका. फसवणूक झाल्याची लाज बाळगण्याची गरज नाही.
  • कितीही सुरक्षित राहण्याचा प्रयत्न केला, तरी अनेकदा आपण या गोष्टींमध्ये अडकतो. पण जर हे लपवून ठेवले नाही आणि आणखी काही लोकांना कळवले तर आणखी काही निष्पाप लोकही सावध होतील.

हे वाचलंत का?