ऋषभ पंतचं दिल्लीसाठी असणं आणि नसणं...

ऋषभ पंत, दिल्ली

फोटो स्रोत, BCCI- Tata/IPL

फोटो कॅप्शन, ऋषभ पंतने दिल्ली-गुजरात लढतीला हजेरी लावली.

मंगळवारी दिल्लीच्या फिरोझशहा कोटला मैदानावर चाहत्यांना सुखद धक्का बसला. दिल्ली- गुजरात लढतीला खुद्द ऋषभ पंत उपस्थित होता. क्लचेसच्या साह्याने चालणारा ऋषभ मैदानात पोहोचताच चाहत्यांनी जल्लोष केला. सामन्यादरम्यान कॅमेरा ऋषभवर स्थिर होताच प्रेक्षकांनी मैदान डोक्यावर घेतलं. ऋषभदर्शनाने चाहते आनंदले मात्र त्याच्या नसण्याने दिल्ली संघाचं नेमकं काय नुकसान झालं आहे ते त्यांच्या पराभवातून स्पष्ट झालं. व्यावसायिक पद्धतीने गुजरातने दिल्लीने दिलेल्या 163 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग केला. ऋषभची फलंदाजी, नेतृत्व आणि विकेटकीपिंग या सगळ्याचीच उणीव प्रकर्षाने जाणवली.

ऋषभ पंत हा दिल्ली कॅपिटल्सचा चेहरा आहे. तो दिल्ली संघाचा ब्रँड आहे. तो संघाचा प्रमुख फलंदाजांपैकी एक आहे. तो कर्णधार आहे. तो विकेटकीपरही आहे. वयाच्या पंचविशीत ऋषभकडे जबाबदाऱ्यांचं गाठोडं आहे. महेंद्रसिंग धोनीचा वारसदार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. कसोटी, एकदिवसीय, ट्वेन्टी20 तसंच आयपीएल संघ अशा विविध पातळ्यांवर ऋषभ स्वत:ला सिद्ध करतो आहे. पारंपरिक फलंदाजीच्या तंत्राला छेद देत अनोख्या पद्धतीने टोलेजंग फटकेबाजीसाठी ऋषभ प्रसिद्ध आहे. कसोटी प्रकारात त्याने झळकावलेली शतकं त्याच्या कौशल्याचं प्रतीक आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 1

आयपीएलचं मायदेशी पुनरागमन होत असताना ऋषभ पंतची मनमुराद फटकेबाजी पाहणं चाहत्यांना आवडलं असतं पण नियतीच्या मनात वेगळंच काही होतं. 2022 सरायला अवघे काही तास बाकी असताना दिल्ली डेहराडून हायवेवर ऋषभचा भीषण अपघात झाला. ऋषभ एकटाच आईला भेटण्यासाठी त्याच्या गावी रुरकीला इथे जात होतं. ऋषभची गाडी डिव्हायडरला धडकली आणि गाडीने पलटी मारत पेट घेतला. सुदैवाने ऋषभ गाडीतून बाहेर पडला.

हरियाणा रोडवेज बसच्या ड्रायव्हर-कंडक्टर जोडीने ऋषभला मदत केली. त्यांनी अम्ब्युलन्ससाठी फोन केला. वेळीच उपचार झाले. डॉक्टरांनी ऋषभच्या जीवाला धोका नसल्याचं जाहीर केलं मात्र त्याला अनेक ठिकाणी लागलं होतं. काही दिवस त्याच्यावर डेहराहून इथे आणि नंतर मुंबई इथे निष्णात डॉक्टरांकडून उपचार झाले. त्याच्या पायावर एक शस्त्रक्रियाही झाली. ऋषभ आता घरी असतो, त्याची रिहॅब प्रक्रिया सुरू आहे. पण त्याला मैदानावर परतायला वेळ लागेल हे नक्की.

ऋषभ पंत, दिल्ली

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ऋषभ पंत

आयपीएलच्या 98 लढतीत ऋषभने 147.97च्या स्ट्राईक रेटने 2838 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर एक शतक आणि 15 अर्धशतकं आहेत. स्पर्धेतला ऋषभचा विकेटकीपिंग रेकॉर्डही उत्तम आहे. ऋषभच्या नावावर 64 झेल आणि 18 स्टंपिंग्ज आहेत. 2016 पासून म्हणजे आयपीएल पदार्पणापासून ऋषभ दिल्लीकडेच आहे. यंदाच्या हंगामात सर्वाधिक मानधन असलेल्या खेळाडूंच्या यादीत ऋषभचं नाव आहे. 16 कोटी रुपये खर्चून दिल्लीने ऋषभला आपल्या ताफ्यात राखलं होतं.

ऋषभ पंत, दिल्ली
फोटो कॅप्शन, ऋषभ पंतचं वाढत गेलेलं मानधन

दिल्लीने सलामीच्या लढतीत ऋषभची जर्सी डगआऊटच्या वर लावली होती. ऋषभ शारीरिकदृष्ट्या संघाबरोबर नसला तरी मानसिकदृष्ट्या तो संघाचा भाग आहे हे दाखवण्यासाठी दिल्लीने असं केलं होतं. ऋषभने लगेचच तो फोटो शेअर करत 13वा खेळाडू असल्याचं म्हटलं होतं. या फोटोला लाखो चाहत्यांनी लाईक केलं होतं.

ऋषभ पंत पूर्णपणे फिट नसल्यामुळे खेळत नसल्याचा फटका भारतीय संघालाही बसला आहे. प्रतिष्ठेच्या बॉर्डर-गावस्कर मालिकेत तो खेळू शकला नाही. आयपीएल हंगामात तो दिसणार नाहीये. जून महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये तो खेळू शकेल का याबाबत साशंकता आहे. वर्षअखेरीस होणाऱ्या वनडे विश्वचषकात तो खेळू शकणार का याबाबतही प्रश्नचिन्ह आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 2

दिल्लीने चेतन सकारिया आणि रोव्हमन पॉवेल यांना वगळून अँनरिक नॉर्किया आणि अभिषेक पोरेल यांना संघात समाविष्ट केलं. दक्षिण आफ्रिकेसाठी खेळत असल्यामुळे नॉर्किया सलामीच्या लढतीसाठी उपलब्ध नव्हता. सलामीच्या लढतीत फलंदाज सर्फराझ खानने विकेटकीपिंगची जबाबदारी हाताळली होती. पण या लढतीसाठी त्यांनी विशेषज्ञ पोरेलला संघात घेतलं.

यंदाचा हंगाम पृथ्वी शॉ गाजवेल असं भाकीत दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग यांनी वर्तवलं होतं. पण सलग दुसऱ्या लढतीत पृथ्वी झटपट माघारी परतला. भारताविरुद्धच्या मालिकेत तडाखेबंद फॉर्मात असलेला मिचेल मार्शही 4 धावा करुन तंबूत परतला.

ऋषभ पंत, दिल्ली

फोटो स्रोत, BCCI-TATA/IPL

फोटो कॅप्शन, डेव्हिड वॉर्नर
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि सर्फराझ खान जोडीने डाव सावरला. अल्झारी जोसेफने वॉर्नरला त्रिफळाचीत केलं. त्याने 37 धावा केल्या. पुढच्याच चेंडूवर अनुभवी रायली रुसो जोसेफच्या उसळत्या चेंडूचा सामना करु शकला नाही आणि माघारी परतला. पदार्पणवीर अभिषेकने जोसेफचा तिसरा चेंडू तटवून काढला. सर्फराझने अभिषेकला हाताशी घेत धावफलक हलता ठेवला. 13व्या षटकात गोलंदाजीला आलेल्या रशीदने लगेचच अभिषेकला त्रिफळाचीत केलं. रशीदनेच सर्फराझलाही गाशा गुंडाळायला भाग पाडलं. त्याने 34 चेंडूत 30 धावा केल्या. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अक्षर पटेलने 22 चेंडूत 36 धावा करत दिल्लीला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. दिल्लीने गुजरातसमोर 163 धावांचं लक्ष्य ठेवलं. गुजराततर्फे मोहम्मद शमी आणि रशीद खान यांनी प्रत्येकी 3 विकेट्स पटकावल्या.

डाव संपताना दिल्लीने सर्फराझच्या ऐवजी डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमदला समाविष्ट केलं. दुसरीकडे गुजरातने जोशुआ लिट्लच्या जागी विजय शंकरला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून घेतलं.

शुबमन गिल आणि वृद्धिमान साहा दोघेही अँनरिक नॉर्कियाच्या भन्नाट वेगाची शिकार ठरले. दोघांना प्रत्येकी 14 धावाच करता आल्या. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या हार्दिक पंड्याला खलील अहमदने अफलातून चेंडूवर चकवलं. तो फक्त 5 धावाच करु शकला. साई सुदर्शन आणि जोशुआ लिटीलच्या जागी इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आलेल्या विजय शंकर या तामिळनाडूच्या शिलेदारांनी चौथ्या विकेटसाठी 44 चेंडूत 53 धावांची भागीदारी केली. ही जोडी धोकादायक ठरणार असं वाटत असतानाच मिचेल मार्शने शंकरला पायचीत केलं. त्याने 29 धावांची खेळी केली.

ऋषभ पंत, दिल्ली, गुजरात

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, साई सुदर्शन

दक्षिण आफ्रिकेतून भारतात दाखल होऊन काही तास झालेल्या डेव्हिड मिलरने आपली ताकद दाखवून दिली. किलर मिलर नावाने प्रसिद्ध डेव्हिडने 16 चेंडूत 31 धावांची वेगवान खेळी केली. मिलरने 2 चौकार आणि 2 षटकारांसह ही खेळी सजवली. पण गुजरातच्या विजयाचा सूत्रधार ठरला साई सुदर्शन. सुदर्शनने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने इनिंग्ज बांधत गुजरातचा विजय सुकर केला. त्याने 48 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 62 धावांची सुरेख खेळी केली.

सलामीच्या लढतीत गुजरातने चेन्नईला नमवलं होतं. या लढतीत दिल्लीला नमवत त्यांनी दुसऱ्या विजयाची नोंद केली.

केनच्या जागी दासून शनका

सलामीच्या लढतीत दुखापतग्रस्त झालेल्या केन विल्यमसनच्या जागी गुजरात टायटन्सने श्रीलंकेचा कर्णधार दासून शनकाला समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. केनच्या दुखापतीचे स्वरुप गंभीर असल्यामुळे तो हंगामात खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)